*मी एक समाजसेवक आहे मी कोणताही राजकिय पुढारी नाही*
भारतीय शैली कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष मा. डी. आर. जाधव (आण्णा) यांचा वाढदिवस 2 जून ला प्रत्येक वर्षी केला जातो. महाराष्ट्राच्या लाल मातीला मिळालेला एक अश्रयदाता, आणि ग्रामिण भागातील एक दानशुर आणि दानतदार व्यक्तीमत्व म्हणजेच डी. आर. जाधव (आण्णा). आण्णांना वाढदिवस साजरा करणे हे अजिबात अवडत नाही पण मित्रांना दुखवणं हे त्यांच्या रक्तात नाही. नेहमी दुसर्याला देणारा हा कर्ण स्वत:साठी कधीच कोणाकडे काही मागत नाही. आण्णा नेहमी आपले गेलेले दिवस कुणालाही तसे दिवस येऊ नये म्हणून सतत आपल्या हातून जेवढे दान करता येईल तेवढे दान गरिब होतकरू व मेहनती मुलांना देत असतात. त्यामुळे या माणसाला अनेक चाहत्यांनी आपले दैवत मानले. आण्णांनी यशाचं शिखर गाठलं पण पाय नेहमी जमिनीवरच ठेवले . आण्णा आपली गरिबी सांगत होते. गावातील लोकांनी चिपट्या कोळव्याने आईला केलेली मदत. आणि लोकांच्या पाहुणेरावर जाऊन स्वत: न खाता आम्हा भावंडांना वडीलांनी घातलेलं जेवन. हे सांगत असताना मात्र आण्णा स्वत:हाला अश्रु डाहळण्यापासून रोकू शकले नाहीत. ओठ थरथरू लागले व आण्णांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. स्वर्गीय वसंतदादांनी आ...