यांनी होणाऱ्या पत्नीसोबत जपला सामाजिक बांधिलकीचा वसा*
आपल्या बिळाशी गावचे *सनदी अधिकारी राहुल पाटील सो (I F S ) यांनी होणाऱ्या पत्नीसोबत जपला सामाजिक बांधिलकीचा वसा*
*मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुपयांचे सहकार्य*
आज 2 मे खरं तर सध्या कोरोना नसता तर राहुल दादा आणि तेजस्विनी वहिनी यांचा लग्नं समारंभ असता. राहुल पाटील हे भारतीय वनसेवेत (IFS) चंद्रपूर येथे कार्यरत आहेत.
अर्थात लग्न पुढे गेल्यामुळे खुप वाईट नक्कीच वाटतय पण त्याहीपेक्षा या दोघांचं कौतुक जास्त वाटतय ,त्याच कारणही तसंच आहे. आपल्या लग्नाच्या
तारखेची आठवण म्हणून आणि सध्याची सामाजिक परिस्थितीचा विचार करून या दोघांनी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाख रुपयांचे सहकार्य करून एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. तुमचा हा अनोखा अंदाज नक्कीच समाजासाठी आदर्श आहे. या दोघांनी सांगली व सातारा जिल्ह्यमध्ये स्वराज्य फाउंडेशन व माई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून मास्कसह सुमारे 700 लीटर सॅनिटीएझर व 7000 मास्क चे वितरण केले अाहे. तसेच बांबूवर आधारित रोजगार करणारे लोकांना आर्थिक झळ बसू नये म्हणून राहुल पाटील यांनी चंद्रपूरमध्ये वर्क फ्रोम होम फॉर बांबू ही कल्पना राबवली आहे. लवकरात लवकर जग कोरोनामुक्त होवो आणि तुमचे लग्न आपण आनंदात साजरे करू हीच प्रार्थना.
Comments
Post a Comment