*कुस्ती खेळाला राजाश्रय देणारे राजर्षी शाहू महाराज*….ii
बहुजनांचा राजा राजर्षी शाहू महाराज खास लेख…
*कुस्ती खेळाला राजाश्रय देणारे राजर्षी शाहू महाराज*….ii
शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. ६ मे १९२२ रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
*राजर्षी शाहू महाराज आणि कुस्तीचं एक अतूट नातं*. ज्याच्या मुळे कोल्हापूर नगरी म्हणजे कुस्ती पंढरी म्हणून लोक ओळखू लागले. शाहू महाराजांनी कुस्ती कला वाढण्यासाठी व जोपासण्यासाठी तिला राजाश्रय दिला गेला त्यामुळे *गावोगावी आखाडे चालू केले** आणि त्या आखाड्यामध्ये चांगले मल्ल तयार होऊ लागले.शाहू महाराज विदेशात रोम दौऱ्या वर गेल्यानंतर तेथील कुस्ती मैदान पहिल्या नंतर राजर्षी शाहू महाराजांना पण वाटले कि ह्या प्रकारचे मैदान आपल्या कोल्हापूर संस्थान मध्ये पण असले पाहिजे, अशी कोल्हापुरात कुस्ती मैदान साकारण्याची कल्पना सुचली व महाराज कोल्हापुरात परत आल्यानंतर त्यांनी मिरजकर तिकटी येथील बागेत अर्थात खासबागेत इ.स. १९०७ साली हे खासबाग कुस्ती मैदान बांधण्यास सुरवात केली. जसे महाराजांनी विदेशमध्ये मैदान पहिले होते त्याच पद्धतीचे मैदान उभारण्याचे काम सुरू झाले व इ.स. १९१२ मध्ये संपूर्ण आखाडा ६ वर्षाच्या अथाग प्रयत्ना नंतर बांधून पूर्ण झाला. मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसले तरी प्रत्येकाला कुस्ती दिसते, हेच या मैदानाचे वैशिष्ट्य आहे.
शाहू महाराज भागातील होतकरू व चांगल्या मल्लास हेरून त्यास आपल्या न्यू पॅलेस राजवाड्या मधील तालमी मध्ये ठेवत असे. त्याचा सर्व खुराक त्याला संस्थांना मार्फत दिला जाई. त्याच्या व्यायामाकडे व खुराकाकडे विशेष लक्ष दिले जाई. महाराजांनी विदेशातील खेळाची व डावाची माहिती आपल्याकडील मल्लास होण्यासाठी महाराजांनी अनेक देशी-विदेशी मल्लांना या खासबाग कुस्ती मैदानात आणून स्थानिक मल्लांबरोबर कुस्त्या लावल्या. कि जेणे करून त्याचा कुस्ती मध्ये चांगला विकास होईल त्याची प्रगती जोमाने होईल.
१९१३ साली खासबाग मैदान मध्ये खलिफा गुलाम मोहिद्दीन विरुद्ध इमामबक्ष ( जगजेता गामा चा भाऊ ) पैलवान यांच्यात पहिली कुस्ती लावली होती. त्यात इमामबक्ष पैलवान विजयी झाला . यात इमामबक्ष ला बक्षीस म्हणून शाहू महाराजांनी चांदीची गदा बक्षीस दिली. आणि तेव्हापासून विजेत्या मल्लास चांदीची गदा देण्याची प्रथा भारतामध्ये चालू झाली. तसेच महाराजांनी पराभूत मल्लांचा पण बक्षीस देऊन सन्मान व पराभूत पैलवानचा पण बक्षीस देऊन सन्मान करण्याची परंपरेलाही सुरुवात झाली. पुढे ह्याच ऐतिहासिक मैदान मध्ये अनेक अजरामर लढती झाल्या त्यामध्ये ७ एप्रिल १९२४ ला ज्ञानू माने विरुद्ध गुलमहमद कलावाला, २१ आॅक्टो १९३६ ला जगद्विख्यात जर्मन पैलवान व्हॉन केमर विरुद्ध मल्लापा तडाखे, १७ मार्च १९४० गामा पंजाबी विरुद्ध शिवगौडा मुत्नाळे,१५ एप्रिल १९७८ ला दादू चौगुले विरुद्ध सादिक पंजाबी, १३ मार्च १९७६ युवराज पाटील विरुद्ध विजयकुमार, १ एप्रिल १९७८ युवराज पाटील विरुद्ध सतपाल, १३ एप्रिल १९७९ विष्णू फडतारे विरुद्ध रामा माने,
दादू चौगुले विरुद्ध सतपाल, १६ एप्रिल १९८३ तारिक लाहोरवाला विरुद्ध बाळू पाटील , ११ फेबु्रवारी १९८४ युवराज पाटील विरुद्ध सतपाल , लक्ष्मण वडार विरुद्ध बाळू पाटील, ७ फेबु्रवारी १९८७ विष्णू जोशीलकर विरुद्ध नामदेव मोळे, ११ फेबु्रवारी १९८९ गुलाब बर्डे विरुद्ध नामदेव मोळे अशा अनेक राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावरच्या कसलेल्या मल्लांच्या लढती शाहू महाराजांनी बांधलेल्या खासबाग मैदान मध्ये खेळल्या गेल्या.
शाहू महाराजांच्या स्मुर्तीदिन आपण कुस्तीकला वाढवण्याचा व जोपासण्याचा संकल्प करूया. सशक्त मेंदू, मन आणि मनगट असे तरुण तयार करण्यासाठी बंद पडलेल्या तालमी पुन्हा चालू करण्याचा संकल्प करूया. हेच राजर्षी शाहू महाराज याना स्मरण आहे.
मनोजकुमार मस्के
९८९०२९१०६५
Comments
Post a Comment