काही माणसांना शुभेच्छा देताना मनापासून फोन करावासा वाटतो…

काही माणसांना शुभेच्छा देताना मनापासून फोन करावासा वाटतो…
कारण ती माणसं फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छांची नसतात, ती मनाच्या जवळची असतात…!

कैलासवासी शिवाजी सपकाळ यांचे चिरंजीव, रिळे गावचे सुपुत्र संजय सपकाळ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा! 💐🎂
हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणाचा वाढदिवस आहे, हे सहज समजते. मग पोस्टवर शुभेच्छा, कमेंटमध्ये शुभेच्छा आणि स्टेटसवर शुभेच्छांचा वर्षाव होतो. पण या सगळ्याच्या पलीकडे काही माणसं अशी असतात, की त्यांना शुभेच्छा देताना केवळ सोशल मीडियावर दोन शब्द लिहावेसे वाटत नाहीत… तर प्रत्यक्ष फोन करून त्यांची आठवण काढावी, दोन शब्द मनापासून बोलावे आणि त्यांच्या आयुष्यातील संघर्षाला सलाम करावा, असे वाटते.

संजय सपकाळ हे त्यापैकीच एक…!
गरिबी काय असते, परिस्थितीशी दोन हात करत जगणे काय असते आणि तुटपुंज्या उत्पन्नात संसाराचा गाडा कसा ओढायचा असतो, हे त्यांनी अगदी जवळून पाहिले आहे.
वडील कैलासवासी शिवाजी सपकाळ हे मिल कामगार. पगार तुटपुंजा; पण जबाबदाऱ्या मात्र मोठ्या. दोन मुली आणि मुलगा संजय यांच्या शिक्षणाची जबाबदारी, संसाराचा भार आणि त्यातून मोठ्या मुलीचे लग्न… हे सगळं करताना त्या वडिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणात कधी कमी पडू दिले नाही.
त्या काळात संजय यांच्याकडेही छोटीशी नोकरी होती. त्यातून स्वतःचा आणि कुटुंबाचा संसार कसाबसा चालत होता. त्यातच एका बहिणीच्या लग्नाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. ती जबाबदारी त्यांनी निभावली… आणि त्यानंतर स्वतःच्या लग्नाची जबाबदारीही त्यांनीच पेलली.

परिस्थिती कठीण होती; पण विचार कधी गरीब झाले नाहीत.
कदाचित आयुष्यातील हाच सर्वात मोठा श्रीमंतीचा भाग आहे.
परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी संजय सपकाळ कधी चुकीच्या मार्गाला गेले नाहीत. मनात नकारात्मकता येऊ दिली नाही. नेहमी सकारात्मक विचार, चांगली माणसं, चांगली पुस्तके आणि चांगले विचार यांची सोबत त्यांनी जपली.
आजही आई-वडिलांची सेवा, समाजाबद्दलची आस्था, प्रत्येकाला चांगला विचार देण्याची धडपड आणि आपल्यामुळे कोणाचे तरी भले व्हावे, ही भावना त्यांच्या वागण्यात जाणवते.
काळ बदलला… परिस्थितीही बदलली. आज आयुष्य पूर्वीपेक्षा बऱ्यापैकी स्थिर आहे. पण त्या परिस्थितीचा त्यांना कधी गर्व झाला नाही, अहंकार आला नाही.
उलट आपल्या वाट्याला आलेल्या सुखातील थोडासा भाग समाजासाठी द्यायचा, ही भावना त्यांनी जपली.
वर्षभरापूर्वी वडील कैलासवासी शिवाजी सपकाळ यांचे निधन झाले. वडिलांच्या उत्तरकार्याच्या वेळी केवळ विधी करून थांबण्याऐवजी त्यांच्या स्मृती कायम जिवंत राहाव्यात, या भावनेतून गावातील भजनी मंडळे, अभ्यासिका, पारायण मंडळे अशा विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना वडिलांच्या नावाने जवळपास दोन लाख रुपयांची मदत त्यांनी केली.
वडिलांचे ऋण फेडण्याचा यापेक्षा सुंदर मार्ग कोणता असू शकतो?
वृक्षारोपण हा तर त्यांच्या मनाच्या अगदी जवळचा विषय. अभिनेता आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करून झाडे लावणे आणि केवळ फोटो काढून थांबून न जाता ती झाडे जगवण्याचा प्रयत्न करणे, ही त्यांची मनापासूनची भूमिका आहे.
पुस्तकांशी त्यांची मैत्री आहे. विचारवंतांच्या विचारांशी त्यांचा संवाद आहे. अनेक पुस्तके वाचताना त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणला आणि आज तेच चांगले विचार इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात.
खरं तर माणूस श्रीमंत पैशाने होत नाही;
तो श्रीमंत होतो आपल्या विचारांनी, आपल्या माणुसकीने आणि इतरांसाठी काहीतरी करण्याच्या वृत्तीने…
संजय सपकाळ यांच्या आयुष्याकडे पाहिलं की हेच पुन्हा पुन्हा जाणवतं.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल मला जेवढं माहिती आहे, जेवढं अनुभवता आलं, तेवढं शब्दांत मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न.
कदाचित काही गोष्टी राहून गेल्या असतील… काही आठवणी अजून सांगायच्या असतील… काही प्रसंग पुन्हा कधीतरी शब्दबद्ध करेन.
पण आज एवढंच म्हणावंसं वाटतं—
संजुदादा, आयुष्यात कितीही पुढे जा, पण तुमच्या संघर्षातून आलेली माणुसकी, तुमच्या वडिलांनी दिलेले संस्कार आणि तुमच्या मनातली सकारात्मक विचारांची शिदोरी अशीच कायम जपा.
तुमच्यासारखी माणसं वाढदिवसाच्या दिवशी केवळ शुभेच्छा देण्यासाठी आठवत नाहीत…
तर त्यांच्या आयुष्याचा प्रवास आठवून मनापासून अभिमान वाटतो.
तुमच्या आयुष्यात सदैव आनंद, उत्तम आरोग्य, समाधान आणि समाजासाठी आणखी काहीतरी चांगलं करण्याची शक्ती लाभो.
रिळे गावचे सुपुत्र
कैलासवासी शिवाजी सपकाळ यांचे चिरंजीव
संजय सपकाळ यांना वाढदिवसाच्या
मनःपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा!
देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो…
आणि तुमच्या हातून अशीच माणुसकीची कामे घडत राहोत…!
💐🎂

Comments

Popular posts from this blog

उरीतील स्फोटात शाहुवाडीचा सुपुत्र शहीद; गोंडोली गावावर शोककळा

आटूगडेवाडीत शालेय विद्यार्थ्यांच्या वाहनाचा अपघात; पाच वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू

*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*.