दोस्तीच्या दुनियेतला दिलदार मित्र – पै विजय मस्के यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


दोस्तीच्या दुनियेतला दिलदार मित्र – पै विजय मस्के यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

•••••••••••••••••••••••••••••••••


मांगरूळ गावाचे सुपुत्र, कुस्ती क्षेत्रातील नावाजलेले पैलवान, मनाने अत्यंत दिलदार आणि मैत्रीतला आधारस्तंभ — पै विजय मस्के यांचा आज वाढदिवस!

*काही माणसं आपल्या बुद्धिमत्ता, कार्यकौशल्य, आणि निष्ठेच्या जोरावर आयुष्य गढून घेतात. काहीजण स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवून आपली वाट शोधतात. आणि फार थोडे लोक असतात जे स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठी जगतात. *पै विजय मस्के हे असंच एक दुर्मिळ व्यक्तिमत्त्व!*
विजय मस्के यांची मैत्री म्हणजे नात्यांची एक वेगळीच शिदोरी.

मित्राला अडचण आली की कुठलाही विचार न करता, हातातील काम बाजूला ठेवून मदतीला धावून जाणारा, कोणताही राग न धरता सर्वांसोबत हसत-खेळत नातं जपणारा विजय — हा खरं तर प्रत्येक मित्रमंडळींसाठी एक भाग्य आहे.

कुस्ती हा त्याचा आत्मा आहे. लहानपणापासूनच तालमीचं वेड, मेहनतीने अंगी बाणवलेली ताकद, आणि *महात्मा फुले व्यायामशाळेत घेतलेले प्रशिक्षण* — यामुळे तो एक *नावलौकिक प्राप्त केलेला पैलवान* म्हणून पुढे आला. आजही त्याचं कुस्तीप्रेम तसंच आहे — अफाट, निष्ठावंत आणि प्रेरणादायी!

विजय मस्के हे केवळ एक माजी पैलवान नाहीत, तर गावातील विधायक कार्यात सक्रीय भाग घेणारे, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे एक उमदे व्यक्तिमत्त्व आहेत.
ते कोणाच्या जातीचा आहे, पक्षाचा आहे, याचा विचार न करता मदतीसाठी नेहमी तत्पर असतात. लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाशी स्नेह जपणं हेच त्यांचं मोठेपण दर्शवतं.

*मा. मंत्री, मा. आमदार शिवाजीराव नाईक साहेबांचे कट्टर समर्थक असलेले विजय मस्के*, आपल्या भाऊ *भगवान मस्के* यांच्या सोबतीने सामाजिक आणि व्यवसायिक क्षेत्रातही आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवत आहेत.

आज अशा या खंबीर, मनमिळावू, लोकहितवादी मित्राचा वाढदिवस!

विजय, तुझं आयुष्य आरोग्यदायी, यशस्वी आणि समाधानकारक असो, तुझ्या पुढील वाटचालीला आमच्याकडून मन:पूर्वक शुभेच्छा!  
देव तुला उत्तम आरोग्य, भरभराट आणि यशाच्या शिखरावर पोहोचण्याची संधी देवो, हीच प्रार्थना.

शब्दरूप शुभेच्छांसहित –
पै. मनोज मस्के
पत्रकार – दै. पुण्यनगरी



Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*.