*एक तरुण… एक नेता… एक सच्चा मित्र – विशाल भाऊ नाईकवडी**(संस्थापक – 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन, अध्यक्ष – दोस्ती ग्रुप ठाणे)*


*एक तरुण… एक नेता… एक सच्चा मित्र – विशाल भाऊ नाईकवडी*
*(संस्थापक – 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन, अध्यक्ष – दोस्ती ग्रुप ठाणे)*
*मनोजकुमार मस्के, मांगरूळ*

  शिराळा तालुक्यातील चरण या छोट्याशा गावातून उगम पावलेला, सामान्य कुटुंबातून येणारा पण असामान्य स्वप्न पाहणारा एक युवक – *विशाल भाऊ नाईकवडी*. कमी वयात मोठी झेप घेत, स्वतःच्या कष्टाच्या जोरावर अनेक युवकांचा आदर्श बनलेला हा नेता, आज हजारो तरुणांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण करून आहे.
विशाल भाऊंचं बालपण ग्रामीण वातावरणात गेलं. गरिबीची झळ सोसत, शिक्षण पूर्ण करत त्यांनी आपला प्रवास सुरू केला. 2007 साली मुंबईत एका फार्मासिटिकल कंपनीत नोकरी करून सुरुवात केली आणि पुढे स्वतःची *फार्मासिटिकल कंपनी उभारून एक यशस्वी उद्योजक म्हणूनही स्वतःची ओळख निर्माण केली*.

पण केवळ व्यवसाय नव्हे, तर समाजसेवेची खरी ओढ त्यांच्या मनात होती. त्यामुळे *त्यांनी "भुंख फाउंडेशन, ठाणे" या संस्थेची स्थापना करून*, गरजूंना आधार देण्याचं काम हाती घेतलं. विशेषतः अशा वृद्ध दाम्पत्यांना – *ज्यांना मुलं नाहीत* – त्यांना आधार देण्याचं काम ते आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने करत आहेत. *आतापर्यंत अनेक कुटुंबांना त्यांनी प्रेमाचं आणि माणुसकीचं बळ दिलं आहे*.

आज 32 शिराळा *क्रिकेट असोसिएशन*, मुंबई चे संस्थापक म्हणून त्यांनी शिराळा तालुक्यातील तब्बल 32 युवकांना मुंबईसारख्या महानगरात क्रिकेटसाठी एक व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे. ही केवळ खेळाची संधी नसून, एका नव्या जीवनाची सुरुवात आहे.
त्याचबरोबर ते *महाराष्ट्र राज्य प्रतिष्ठान कामगार सेनेचे* उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. दस्ती ग्रुप ठाणे या युवा संघटनेच्या माध्यमातून ते सतत युवकांमध्ये नेतृत्वाची ज्योत प्रज्वलित करत असतात.

*आज विशाल भाऊ नाईकवडी हे नाव केवळ शिराळा तालुक्यात नव्हे तर ठाणे-मुंबई परिसरातही एक विश्वासाचं आणि प्रेरणादायी नाव बनलं आहे. त्यांची गोड वाणी, खरी मैत्री, समाजासाठी झटणारी वृत्ती आणि झेप घेण्याची तयारी* – *ही त्यांची खरी ताकद आहे*.

*या तरुणाच्या कार्याला सलाम*! *वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा*

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि आलेला अनुभव*....