गुरुमाऊली कृष्णातमामा

*गुरुमाऊली कृष्णातमामा* 
गुरूमाऊली बाळूमामा, हे एक प्रसिद्ध संत आणि योगी होते. ते त्यांच्या चमत्कारांसाठी आणि साधेपणा आणि दयाळूपणाच्या शिकवणीसाठी ओळखले जातात. त्यांचे भक्त कृष्णात पडवळे मामा यांना बाळूमामांचे व विठ्ठल बिरूदेव मामा यांचा आशीर्वाद कृष्णात मामा यांना लाभला आहे. कृष्णात मामा सतत मेंढरां सोबत तळावरच असतात. अनेक भक्त कृष्णात मामा यांना 'गुरूमाऊली' म्हणून संबोधतात. आज कृष्णातमामांचा वाढदिवस त्यानिमित्त 

कृष्णात मामा कोण आहेत?


कृष्णातमामा जन्म 20 जुन 1991 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील वाघापूर गावात झाला. त्यांचे खरे नाव कृष्णात लक्ष्मण पडवळे आहे. त्यांचे शिक्षण जेमतेमच झाले. वडिलोपार्जित मेंढपाळाचा व्यवसाय आणि बाळुमामाची भक्ती त्यांचे बालपण आणि तरुणपण मेंढपाळ म्हणनच गेले. त्यांनी लोकांची खूप मदत केली आणि त्यांच्या अडचणी सोडवल्या. 

गुरूमाऊली का म्हणतात?

कृष्णातमामा त्यांचे भक्त 'गुरूमाऊली' म्हणतात कारण त्यांनी लोकांना प्रेम, दया आणि सेवेचा मार्ग शिकवतात. ते लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या दु:खांवर उपाय सांगतात . त्यांच्या शिकवणी आणि कार्यांमुळे ते लोकांमध्ये 'गुरूमाऊली' म्हणून प्रसिद्ध झाले. 

कोल्हापूर जिल्ह्यातील वाघापूर हे कृष्णात मामा यांचे मुख्य स्थान आहे. परंतु मामा हे नेहमी आपल्या मेंढरांसोबत  सतत या गावाहून त्या गावावरती जात असतात. आठ ते दहा लोकांचा कुटुंब सोबत असतो. पावसा पाण्यात कुटुंब पाटीवर टाकून मामा मेंढरांची व भक्तांची सेवा करत पुढील प्रवास करत असतात.आजही कृष्णा मामांचे भक्त त्यांना खूप मानतात. आज मामांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त भक्तांच्या कडून अनेक ठिकाणी फळे वाटपाचा करण्यात येतो. अनेक गोरगरिबांना मदतीही केली जाते.

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि आलेला अनुभव*....