कुस्ती हेच जीवनचे संस्थापक रामदास देसाई यांची दत्तसेवा कुस्ती आखाडा व शिक्षण परीवाराला भेट

*कुस्ती हेच जीवनचे संस्थापक रामदास देसाई यांची दत्तसेवा कुस्ती आखाडा व शिक्षण परीवाराला भेट*

दत्तसेवा विद्यालय तुरुकवाडी येथे आज कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष रामदास देसाई यांनी भेट दिली. यावेळी दत्त सेवा शिक्षण संस्थेचा सर्व परिसर पाहत असताना रामदास देसाई यांनी संपूर्ण परिसराचे कौतुक केले. त्याचबरोबर येथील मुलांची राहण्याची व्यवस्था, मुलांची खाण्याची व्यवस्था, आंघोळीची व्यवस्था, त्यांची शिक्षणाची व्यवस्था, त्याचबरोबर दत्तसेवा परिवार जोपासत असलेला कुस्तीचा वारसा याचीही माहिती घेतली. एकंदरीत संपूर्ण परिसर पाहिल्यानंतर यासारखी शिक्षण संस्था महाराष्ट्रात कुठेही पाहीली नसल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. खऱ्या अर्थाने कुस्तीची परंपरा जपण्यासाठी स्वतंत्र मॅट, मातीचा आखाडा, राहण्याची सोय ,येथील मुलांना थंडाई या सर्वच गोष्टी अतिशय बारकाईने दत्त सेवा परिवार जपत असल्याचं जाणवलं.   
 यावेळी बोलताना खास करून आनंदराव माईंगडे दादा यांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. कारण त्यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेली ही शिक्षण संस्था खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील मुलांना एक पर्वणीच म्हणावी लागेल.
आज कुस्ती खेळाबरोबरच शिक्षणाची ही कास धरून मुलांनी पुढे जावं असे विचाराचे आनंदराव माईगडे दादा यांनी जवळपास फार मोठे काम केले आहे. या कामाला खऱ्या अर्थाने शासनाने दखल घेऊन पुरस्कार देणे इतपत मोठे काम त्यांचं असल्याचेही ते म्हणाले.
आज कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक रामदास देसाई यांच्यासोबत शिराळा तालुका कुस्ती जीवनचे अध्यक्ष मनोज मस्के, शाहुवाडी तालुका कुस्ती हेच जीवन चे अध्यक्ष अशोक सावंत, उपाध्यक्ष संपत पाटील, मुख्यध्यापक गणेश पाटील,वस्ताद प्रमोद पाटील, प्रणव पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*.