*बिळाशीच्या सिद्धेश भोसलेची मुंबई शहर कबड्डी संघात निवड*
*बिळाशीच्या सिद्धेश भोसलेची मुंबई शहर कबड्डी संघात निवड*
बिळाशी गावचा सुपुत्र सिद्धेश भोसलेची महाराष्ट्र राज्य कबड्डी स्पर्धेसाठी जूनियर मुंबई शहर कबड्डी संघात निवड. परीसरातुन कौतुकाचा वर्षाव.
महाराष्ट्राचा सांगली जिल्ह्यातील बिळाशी गावच्या सुपुत्र सिद्धेश भोसले हा सध्या आय टी डिप्लोमा विद्या अलंकार पॉलिटेक्निकल कॉलेज मुंबई येथे शिक्षण घेत आहे. त्याचबरोबर तो सिद्धी प्रभा फाउंडेशन कडून खेळणारा खेळाडू आहे.
आतापर्यंत सिद्धेशने आपल्या संघाला 15 ते 20 बक्षीस मिळवून दिलेली आहेत. यासाठी त्याचे शिक्षक अमोल पवार यांनी मार्गदर्शन केले. आई वडिलांचेही तितकेच परिश्रम असलेचे सिद्धेशने सांगितले.
मागील महिन्यामध्ये झालेल्या आय टी कॉलेज कोकण विभाग व मुंबई विभाग स्पर्धेमध्ये आपल्या कॉलेजच्या संघाला त्याने व त्याच्या टीमने सुवर्णपदक मिळवून दिले. यामध्ये टोटल 80 टीम होत्या त्यामधून सिद्धेश च्या टीमने आपल्या संघासाठी सुवर्णपदक खेचून आणले असे शिक्षक अमोल पवार यांनी सांगीतले. सिद्धेशला मिळालेले यश व त्याची झालेली निवड ही अभिमानास्पद असून बिळाशी व परिसरात त्याचे कौतुक केले जात आहे.
Comments
Post a Comment