मांगरूळचा पै. आदित्य मस्के हा शिराळा तालुका शालेय

*मांगरूळचा पै. आदित्य मस्के हा शिराळा तालुका शालेय कुस्ती स्पर्धेत ५५ किलो वजन गटात अव्वल ठरला*.... 
जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आदित्यची निवड........ 
-----------------
   शिराळा तालुक्यातील मांगरुळ गावचे 'कुस्ती हेच जीवन' शिराळा तालुका अध्यक्ष *पै मनोज मस्के (पत्रकार) यांचे चिरंजीव पै आदित्य मस्के* याने चिंचोली येथे संपन्न झालेल्या शालेय कुस्ती स्पर्धेत फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात मॅट विभागातुन त्याच्या गटातील अनेक  चांगल्या पैलवानांवर विजय मिळवत शालेय कुस्ती स्पर्धेतुन ५५ किलो वजन गटात आपल्या भात्यातील डावाच्या अस्त्राचा वापर करून अव्वल ठरला.  काही दिवसात सांगली मिरज येथे होणार्या जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. 

आदित्य सध्या पुणे येथे मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रात *वस्ताद ज्ञानेश्वर मांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कष्ट करतो आहे*. शिवाय 
कुस्ती कोच पै वरुन त्यागी सर, पै चंद्रशेखर धुमाळ सर, संजय खांडेकर सर, पै कृष्णा फिरंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र पुणे येथे तो कसून सराव करतो आहे. या सर्व कोचेस चे मार्गदर्शन आदित्य ला वेळोवेळी मिळते आहे. तत्पूर्वी राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते पै राम सारंग सरांच्या राष्ट्रकुल आखाडा कोल्हापूर येथे सुद्धा आदित्य ने सराव केला आहे.  

  दहावी च्या वर्गात बत्तीस शिराळा याठिकाणी न्यु इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण घेत असणारा पै आदित्य याला घरातूनच कुस्तीचे बाळकडू मिळाले आहे. आदित्य चे वडील पैलवान, आजोबा पैलवान, चुलते पैलवान त्यामुळे आदित्य ला कुस्तीचा श्रीगणेशा करायला काही अवघड गेले नाही. 
 खासकरुन सांगायचे झाले तर आदित्य चे आर्मीत असणारे चुलते पै अमर मस्के सुट्टीवर गावाकडे आल्यावर आदित्य चा स्वतः कसून सराव करून घेत असतात, शिवाय स्वतः त्याच्याशी लढत देत असतात. सर्व कोचेस तसेच वडील मनोज मस्के यांच्या बरोबर आदित्य ला घडवण्यात अमर मस्के यांचा मोलाचा वाटा आहे. 

भारतीय खेल प्राधिकरण (साई सेंटर पुणे ) याच्या मार्फत गेल्याच वर्षी इंदोर (भोपाळ) येथे नॅशनल कुस्ती स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती, त्याचा अनुभव त्याच्या पाठीशी होता. त्याचवेळी पुणे येथील साई सेंटरच्या दहा खेळाडूंची सुद्धा निवड त्याठिकाणी झाली होती. 

     नुकतीच चिंचोली येथे शालेय कुस्ती स्पर्धा पार पडली, तालुक्यातुन अनेक शाळांच्या पैलवान विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या शालेय कुस्ती स्पर्धेतील विजेत्या मल्लांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी *कुस्ती हेच जीवन कडुन खूप खूप शुभेच्छा* 
------------------
 धन्यवाद 
 ✍️✍️✍️
पै अशोक सावंत /पाटील 
 कुस्ती हेच जीवन 
 अध्यक्ष शाहूवाडी तालुका 
 मो 9702984006

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*.