मांगरूळ येथे ग्रामपंचायत निवडणुकिची मोर्चेबांधणी.,.9 सदस्य जाणार निवडुन...सरपंच पद अनुसुचित जाती गटाकडे

मांगरूळ येथे ग्रामपंचायत निवडणुकिची मोर्चेबांधणी.,.
9 सदस्य जाणार निवडुन...सरपंच पद अनुसुचित जाती गटाकडे
मांगरूळ - मनोजकुमार मस्के 
ऐन थंडीच्या महिन्यात शिराळा तालुक्यातील गावोगावी शेकोटी बरोबरच राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. जिरवा - जिरवीच्या राजकारणाला उधान आले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिराळा तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत असलेल्या मांगरूळ येथे गाव पुढाऱ्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून गावात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सरपंच पद अनुसुचित जाती गटातील पुरूष अथवा महिला राखीव असून नव सदस्यांना तीन वार्डातून निवडून द्यायचे आहे.
ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापत आहे दिवसाला शेतकरी व मजूर शेतात राबत असल्याने रात्रीच्या बैठकीला महत्त्व आले आहे. जातीय समीकरणातून कोणत्या वर्गात कोणता उमेदवार दमदार असेल याची चर्चा जोर धरत आहे . सर्वसामान्य नागरिकांना मात्र यात उत्साह दिसत नाही. दोन गटा व्यतिरिक्त तिसऱ्या गटाची चर्चा अनेक ठिकाणी ऐकायला मिळत आहे. संपूर्ण तालुक्यातील राजकारणात मांगरूळचे वर्चस्व आजही कायम आहे. येथील कोणतीही निवडणूक चुरशीचीच होते मांगरूळ शिराळा तालुक्यातील सर्वात बऱ्यापैकी गाव आहे ग्रामपंचायत च्या निवडणुकीसाठी आता सर्वजण कामाला लागले आहेत.

विश्वासातील राजकारणाचे दिवस आता संपले:-
न्याय, निती, निष्ठा, मूलतत्त्व वर्तमानातील राजकारणात चालताना दिसत नाही. मतदार राजा सुद्धा क्षणिक लोभाला बळी पडून मतदान करतो. त्यामुळे निष्ठावान प्रामाणिक उमेदवार निवडीला अडचण होते. त्यामुळे जागरूक उमेदवार व पक्षीय प्रमुख सहजतेने बोलतो की आता विश्वासातील राजकारणाचे दिवस संपले.

तुम्ही म्हणाल तरच उभा राहतो:-
मांगरूळच्या राजकारणाचा प्रभाव जवळच्या ग्रामीण भागावर ही पडतो. छोट्याशा खेड्यातही लाखाचा खर्च केला जातो. पाच वर्षाची सेवा करून ही लागलेला खर्च निघत नसल्याची तक्रार सुरू झालेली आहे. त्यामुळे स्वतःहून पुढे येत मी सरपंच पदाकरिता इच्छुक असल्याचे  सांगितले जात नाही. तुम्ही म्हणाल तरच असे अनेक उमेदवार बोलतात.

प्रेरणादायी सरपंचाचा  शोध:-
गावच्या लोकांच्यातून सरपंच निवडण्यात येणार आहे. यासाठी गावभर चाचपणी सुरू झालेली आहे. स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार शोधणे चालू आहे. सरपंच पदाचा सक्षम उमेदवार कोण या चर्चेचे गुऱ्हाळ आताही सुरूच आहे.

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*.