*मातीसाठी नाती तोडू नका... महाराष्ट्राच्या कुस्तीला एकीची गरज आहे*..
*मातीसाठी नाती तोडू नका... महाराष्ट्राच्या कुस्तीला एकीची गरज आहे*....? मनोजकुमार मस्के :- गेले बरेच दिवस झाले महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेत फार मोठे रणकंदन चालू असलेचे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. परंतु खरे पाहता यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील तमाम खेळाडूंचे नुकसान आहे. पदासाठी आणि शासनाचे चार पैसे कसे हडप करता येतील यासाठी या परिषद नावाचं वादळ सध्या महाराष्ट्रात गाजताना दिसत आहे. पवारांची परिषद काहींच्या मते स्वच्छ काम करत नाही हे जरी खरे असले तरी तडसांची परिषद सुद्धा उत्कृष्ट काम करेल असा विश्वास तमाम महाराष्ट्रातील पैलवानांना ठाम नाही. खरं पाहता वर्षानुवर्ष जागा अडवून ठेवणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी जागा खाली करून नवीन लोकांना संधी देणे गरजेचे असताना निव्वळ पदासाठी आणि प्रतिष्ठेसाठी खिळे ठोकल्यासारखे खुर्चीसी चिकटून बसणे हे जसे धोक्याचे आहे तसेच ब्रुजभुषण यांनी महाराष्ट्रातील कुस्तीक्षेत्रात लक्ष घालने हे ही धोक्याचे आहे. आज महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करणाऱ्या ब्रुजभूषण यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेसाठी नेमकं काय केलं हा प्रश्न खऱ्या अर्थाने महाराष्ट...