जय हनुमान कुस्ती संकुलन शाहूवाडी दिवाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिर आयोजित
जय हनुमान कुस्ती संकुलन शाहूवाडी दिवाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिर आयोजित
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*{ शालेय कुस्ती स्पर्धेसाठी खास आकर्षण शिबिराचा कालावधी 21 ऑक्टोंबर ते 12 नोव्हेंबर }*
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
जय हनुमान कुस्ती संकुलन शाहूवाडी यांच्या वतीने दिवाळी कुस्ती प्रशिक्षण शीबीर घेण्यात येणार आहे. या शिबीराचा मुख्य उद्देश म्हणजे बदललेल्या युगात आंतरराष्ट्रीय पातळीवर बदललेली . पुर्वीची मैदानी कुस्ती आणी अलीकडील स्पर्धात्मक कुस्ती यातील फरक समजुन घेऊन योग्य दिशा देण्यासाठी व महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुलांना आंतरराष्ट्रीय कुस्तीचे नियम माहित होण्यासाठी हे शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीरासाठी अनेक अनुभवी प्रशिक्षक असणार आहेत. तसेच मुलांना राहण्यासाठी प्रशस्त रुम , चांगल्या प्रतीचे जेवण, दुध, केळी आदी व्यवस्था वेळच्या वेळी असणार आहे.
खेळण्यासाठी मॅट, मातीचा आखाडा, प्रशस्त ग्राउंड, झोपण्यासाठी स्वतंत्र सुविधा, जेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असल्याने मुलांना आनंदात या शिबीराचा लाभ घेता येणार आहे.
हे शिबीर महिनाभर असल्याने यामध्ये सहा मिनटाची कुस्ती कशि लढली पाहीजेत, यामध्ये कसे टेक्निक वापरले पाहीजे, याचे नियम नेमके कसे असतिल या सर्वच बाबी या शिबीरात घेण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील मुलांना मैदानी कुस्ती एवढेच माहीत आहे. मैदानावर पैसे मिळतात या आशेवर मुलं स्पर्धा टाळतात आणी मैदाने पसंत करतात. खऱ्याअर्थाने कुस्तीत करीअर करायचे असेल तर स्पर्धा खेळणे गरजेचे आहे. नेमकी हिच कमतरता ओळखुन या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरानंतर नक्कीच तुमच्या मुलांमध्येही बदल झालेला तुम्हाला दिसेल यात शंकाच नाही. आपल्या मुलाला काय द्यायचं हे पालकांनी ठरवायचं दुसऱ्याला विचारुन मुलांचं भविष्य नाही ठरवायचं. तुमचा एक निर्णय तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करू शकतो. फक्त निर्णय घेताना मनापासुन घ्यावा
दिनांक 21 अॉक्टोंबर पासुन शिबीरास प्रारंभ होणार आहे. त्यापुर्वी नावनोंदणी करूण आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करा. जाहिरातीतील नंबरवर फोन करा माहीती घ्या.... आणि आपल्या मुलाचा प्रवेश आजच निश्चित करा..
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
👉शिबिराची वैशिष्ट्ये* --
१)तज्ञ प्रशिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन
२)आधुनिक मॅट व प्रशस्त मातीचा आखाडा
३)खेळासंबंधी व्यायाम व आहार विषयी सखोल मार्गदर्शन
४)योगासन प्रात्यक्षिके
५)आंतरराष्ट्रीय नियमांनुसार कुस्ती प्रशिक्षण
६)व्हिडिओ द्वारे कुस्तीच्या डावांचे मार्गदर्शन
७)प्रशिक्षण दरम्यान स्पोर्ट्स किट दिले जाईल.
८)शिबिर पुर्ण करणा-या खेळाडूस प्रमाणपत्र दिले जाईल.
९) वैद्यकिय व्यवस्था असणार आहे.
१०) खेळाडूंनी येताना आपले शूज, अंगावर पांघरून, बरमूडा, काश्टुम, इत्यादी घेऊन येणे.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*👉शिबिराच्या नियम व अटी* --
@ वय मर्यादा - ९ वर्ष ते १९ वर्ष
@ प्रशिक्षणादरम्यान मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे .
@ एकदा घेतलेला प्रवेश रद्द करता येणार नाही
@ कोणत्याही कारणास्तव फी परत दिली जाणार नाही.
@ प्रवेश निश्चितीवेळी फी भरणे आवश्यक
@ प्रवेश नोंदणी अंतिम तारीख - २० ऑक्टोंबर २०२२
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*👉प्रवेश फी* --*5500* रूपये
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*प्रमुख मार्गदर्शक* :-
पै. विश्वास हारुगले (वस्ताद गंगावेश तालीम)
पै. कृष्णा फिरंगे (आंतरराष्ट्रीय पैलवान सेंट्रल रेल्वे)
पै. बाळू काळे (राष्ट्रीय पंच मुंबई)
पै. चंद्रकांत पाटील (राष्ट्रीय पोलीस खेळाडू)
पै. रंगराव पाटील पेरीडकर (ऑल इंडिया चॅम्पियन)
पै. ईश्वरा पाटील, पै.सुरेश जाधव निवेदक
••••••••••••••••••••••••••••••••••
संपर्क :- १) पै. प्रकाश काळे - वस्ताद,9923555096 (२) पै. संजय पाटील - कुस्ती कोच 8623954048
Comments
Post a Comment