फटाके विरहित दिवाळी साजरी करण्याचे 'चिंचेश्वर' वाचनालयाचे आव्हान...

फटाके विरहित दिवाळी साजरी करण्याचे 'चिंचेश्वर' वाचनालयाचे आव्हान...
मांगरुळ (ता. शिराळा ) येथील श्री चिंचेश्वर वाचनालयाने बिळाशीसह परिसरातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांनी फटाकेविरहित दिवाळी साजरी करावी यासाठी विद्यार्थी, शिक्षक यांना आवाहन केले आहे. 
कोरोनावाढीला आमंत्रण नको  दिवाळीतील फटाके आणि त्यापासून होणारे वायू व ध्वनी प्रदूषण ही दरवर्षीची समस्या झालेली आहे. दरवेळी यावर चर्चा होते; पण पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ या उक्तीप्रमाणे हा प्रश्न वाढतच जातो; पण कोरोनामुळे फटाक्‍यांचा धोका यावर्षी शेकडोपटीने वाढलेला आहे. मुलांच्या नावाखाली घरात फटाके खरेदी होते; पण उडवतात ती मोठी माणसेच. फटाक्‍यांच्या धोक्‍याबाबत पालकही जागरूक नसतात. फटाक्‍यांची रंगीबेरंगी रोषणाई नजर खिळवून ठेवते; पण ही रंगांची नवलाई फुकट मिळत नाही, त्यासाठी आरोग्याच्या रूपातही मोठी किंमत द्यावी लागते. फटाक्‍यांमध्ये ॲल्युमिनियम, अँन्टिमनी सल्फाईड, बेरियम नायट्रेट; तसेच, तांबे, शिसे, लिथियम, स्ट्रॉन्शियम, अर्सेनिक यांसारख्या घटकांची घातक संयुगे वापरली जातात. फटाक्‍यांमधून निघणारा धूर अनेक व्याधींना निमंत्रण देतो. दमा-अस्थमा असणाऱ्यांसाठी तो जीवघेणा ठरू शकतो. श्वसनाचे विकार निर्माण करतो किंवा ते आधीच असतील तर त्यांची तीव्रता वाढवतो. त्यामुळे यंदा फटाक्‍यांची आतषबाजी करणे कोरोनावाढीला आमंत्रण देण्यासारखेच आहे.
सन २०१८ साली स्थापन झालेले वाचनालय प्रत्येक वर्षी शाळांमधील विद्यार्थीनी  'फटाकेमुक्त दिवाळी' साजरी करावी यासाठी जनजागृती करीत असते. पर्यावरणाच्या समतोलासाठी विविधांगी उपक्रम सातत्याने राबवत असते.

चौकट:-
 "फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पर्यावरणात वायु व ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढते. नागरिक, प्राण्यांच्या आरोग्यावर  विपरीत परिणाम होतो. नागरिकांनाही फटाक्यांच्या धुरामुळे वायु प्रदुषणाचा त्रास होण्याची भीती आहे.  हि बाब लक्षात घेता नागरिक, विशेषतः शालेय विद्यार्थ्यांनी फटाके फोडण्याचे टाळून 'फटाकेमुक्त दिवाळी' साजरी करावी."
 हिम्मतराव नायकवडी

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*