महाराष्ट्राच्या राजकारणाचा चालता बोलता इतिहास म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते माझे गुरुवर्य पितृतुल्य असे मधुकर भावे साहेब आज त्यांचा ८५ वा वाढदिवस*.
साक्षात महाराष्ट्राच्या इतिहासाचे चालतेबोलते रूप — माझे गुरुवर्य मधुकर भावे साहेब!
आज एका अशा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे, ज्यांच्या बोलण्यात इतिहास आहे, लेखणीत सत्य आहे, आणि मनात माणुसकीचा सागर आहे.
माझे गुरुवर्य, पितृतुल्य, मधुकर भावे साहेब — आज ८६ व्या वर्षात पदार्पण करत आहेत!
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, आणि सांस्कृतिक जीवनावर ज्यांनी पाच-सहा दशकांहून अधिक काळ प्रभाव टाकला, अशी ही युगपुरुषाची मूर्ती. यशवंतराव चव्हाणांसारख्या थोर नेत्यांपासून ते आजच्या गढूळलेल्या राजकारणापर्यंत त्यांनी साक्षीदार म्हणूनच नव्हे, तर मार्गदर्शक, विचारवंत आणि मार्गशोधक म्हणून भूमिका बजावली आहे.
मी 2003 साली भावे साहेबांच्या ऑफिसमध्ये काम करायला सुरुवात केली, आणि तेव्हापासून मी एक गोष्ट सतत पाहिली — बुद्धिमत्तेचा खरा खजाना म्हणजे मधुकर भावे. कोणताही कागद, टिपणं, फाईल हाती न घेताही महाराष्ट्राचा जन्म, त्याची वाटचाल, चळवळी, नेते, निर्णय, चुकलेली वळणं आणि घडवलेले परिवर्तन… हे सगळं त्यांच्या मेंदूत एक संगणकासारखं साठवलेलं आहे.
ते नेहमीच हसतमुख, साधे, लोकलने प्रवास करणारे, सर्वसामान्य माणसाच्या वेदना समजून घेणारे आणि त्यांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवणारे. योग्य पद्धतीने, मुद्देसूदपणे प्रश्न कसे मांडावेत हे मला आणि माझ्यासारख्या अनेकांना त्यांनी शिकवलं.
त्यांचे मूळ गाव रोहा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आचार्य अत्रे यांचे भाषण ऐकून प्रेरीत झालेले भावे साहेब त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मुंबईत आले आणि पत्रकार म्हणून कारकिर्द सुरू केली. अत्रे साहेबांनी त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकल्या आणि त्या प्रत्येक जबाबदारीचं सोनं केलं गेलं.
त्यांची लेखणी तितकीच सडेतोड, धारदार आणि परिणामकारक होती. म्हणूनच ते दैनिक लोकमतचे संपादक झाले. ‘उत्तर-दक्षिण’ या सदरातून त्यांनी महाराष्ट्राच्या असंख्य समस्यांवर बोट ठेवून शासनालाही हादरवलं. त्यांच्या लेखणीतून मराठी समाजाला दिशा देणारी अनेक पुस्तकं निर्माण झाली.
माझं वैयक्तिक आयुष्यही त्यांनी स्पर्शून गेलं. 2006 मध्ये माझं लग्न होतं. मी त्यांच्याकडे काम करत होतो. एका सामान्य कामगाराच्या लग्नासाठी त्यांनी स्वतः मुंबईहून माझ्या गावात — मांगरुळला येणं स्वीकारलं. हे केवळ त्यांच्या माणुसकीचं दर्शन नव्हे, तर माझ्यासाठी ती कृपा होती. माझ्या लग्नासाठी आलेल्या त्या क्षणाने माझं आयुष्य उजळून निघालं.
आज ८६ वर्षांचे होऊनही भावे साहेब तेवढ्याच तेजस्वी, तेवढ्याच सजग आणि सामाजिक प्रश्नांवर तेवढ्याच तडफेने लिहित आहेत. हा जिवंत इतिहास, हा माणुसकीचा पुतळा, हा बुद्धीचा महासागर — अजून अनेक वर्ष महाराष्ट्रासाठी झगडावा, लिहावा, बोलावा हीच मनोभावे प्रार्थना.
साईनाथाच्या चरणी एवढीच विनंती –
या थोर विभूतीला शंभरी गाठण्याचं आयुष्य, उत्तम आरोग्य आणि सदैव सक्रिय राहण्याचं वरदान लाभो!
🙏 भावे साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा! 🙏
आपण आमच्यासाठी गुरू आहात, मार्गदर्शक आहात आणि जिवंत प्रेरणा आहात!
– मनोज मस्के, मांगरूळ
ता. शिराळा, जिल्हा सांगली
📞 9890291065

Comments
Post a Comment