महाराष्ट्रात सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी नेमका नेता कोण?
महाराष्ट्रात सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी नेमका नेता कोण?
--------------------------------------
पवारसाहेब, ही चिखलफेक महाराष्ट्राला परवडणारी नाही... फक्त तुम्हीच थांबवू शकता...
- मधुकर भावे
------------------------------------
महाराष्ट्रात सध्या काय चालले आहे? गेल्या सहा महिन्यांतील वृत्तपत्रे पाहिली तर, हा ‘महाराष्ट्र’ आहे का? असा प्रश्न पडावा, असे गलिच्छ राजकारण ‘महाराष्ट्राच्या नावाने’ चालू आहे. शिवाय हे राजकारण करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले जात आहे. चिखलफेक, आरोप-प्रत्यारोप यांना ऊत आलेला आहे. सामान्य माणसांच्या प्रश्नांना कुठेही जागा नाही. त्या प्रश्नांना वाचा फोडणारा कुणीही नेता नाही. विधानमंडळात गेल्या दोन वर्षंांत महाराष्ट्राचला मोठे करणारी मदत िकती विधेयके मंजूर झाली? दुष्काळ, महापूर, यावेळी झालेले शेतकऱ्यांचे नुकसान काही प्रमाणात मदत देण्याच्या घोषणा झाल्या. प्रत्यक्षात िकती मदत झाली?
५० लाख लोकांना रोजगार देणाऱ्या
महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्राला संपवून टाकण्यासाठी सर्व बाजूंनी केंद्र सरकार टपलेले असताना, सामुदाियकपणे महाराष्ट्र सरकारने या विरोधात ठाम भूिमका घेतल्याचे कुठेही िदसले नाही. एकटे शरद पवार आिण राज्य बँकेचे बाळासाहेब अनासकर हे दोघेच बोलत आहेत. वाढलेल्या महागाईबद्दल, वाढलेल्या इंधन दरवाढीबद्दल ना विरोधीपक्ष आवाज उठवत, ना सरकारतर्फे या प्रश्नांवर लक्ष िदले जाते आहे. सगळी वृत्तपत्रे व्यक्तीवादाने भरलेली आहेत. तेच तेच चेहरे रोज पहावे लागत आहेत. मुंबईमध्ये विकास केंद्रित झालेला आहे. मग त्याचे स्वरूप समृद्धी मार्ग असेल िकंवा कोस्टल रोड असेल, त्याची जाहिरात भरपूर होत आहे, उड्डाणपूल होत आहेत, पण ते फक्त पैसेवाल्यांच्या गाड्यांसाठीच.... ग्रामीण भाग वाऱ्यावर सोडल्यासारखा आहे. ग्रामीण भागाचे कोणते प्रश्न मार्गी लावले, हे विचारणारे कोणीही नाही. उत्तर देण्याचा तर प्रश्नच येत नाही. त्यावेळच्या विरोधी पक्षातील उद्धवराव नाहीत- एन. डी. पाटील नाहीत- गणपतराव देशमुख नाहीत- मृणालताई गेल्या.... , विदर्भात जांबुवंतराव धोटे नाहीत.... लढणारे कोण आहे? आघाडीचे सरकार हवे ही ठीक... भाजपा नको हे नक्की... पण प्रश्न सुटायलाच हवेत. ते सुटत नाहीत. उलट कठीण होत आहेत. मंत्रालयातील परिस्थिती तर अिधकच भयानक आहे. कोरोनामुळे प्रवेशावर निर्बंध आहेत. आपली कमे घेवून कोणाकडे जायचे? कोणाला भेटायचे? कोण प्रश्न सोडवणार? त्याची चर्चा कोठे होते? वृत्तपत्रांत त्याला जागा कुठे आहे?.... महाराष्ट्र असा कधीही नव्हता. देशाच्या सगळ्या पुरोगामी धोरणांचा पाया महाराष्ट्र सरकार आिण त्यावेळचे विरोधीपक्ष या सर्वंांनी, एकमेकांवर वैचारिक हल्ले करतानासुद्धा, समजुतदारपणे घातलेला आहे. त्यामुळे तो यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र, वसंतदादा पाटील यांचा महाराष्ट्र आज कुठेच दिसत नाही. १९८० नंतर एकाही नवीन धरणाची निर्मिती या महाराष्ट्रात झालेली नाही. एक मेगॅव्हॅट वीज निर्माण करणारे नवीन औष्णिक केंद्र िनर्माण झाले नाही. शेतकऱ्याला आत्महत्या कराव्या लागल्या.... या सगळ्या परिस्थितीत लोकांचे प्रश्न आज बाजूला पडलेले आहेत. आिण चिखलफेक सुरू अाहे. त्याचे स्वरूप व्यक्तीगत आहे. त्यामळे ते अधिक घृणास्पद आहे.
परवा श्री. संजय राऊत यांची “पत्रकार परिषद” गाजावाजा करून झाली. पण ती “पत्रकार परिषद” नव्हतीच. संजय राऊत यांचे ते आक्रमक भाषण होते. कोणत्याही पत्रकार परिषदेत “NO Quastions - No Answers” असे नसते. पंतप्रधान मोदीजी पत्रकार परिषद घेत नाहीत, त्याचे कारण पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जायचे त्यांना धाडस नाही.. राऊत यांच्या पत्रकार परिषदेत कोणाही पत्रकाराने याबद्दल विचालेही नाही. भाषण ऐकून सगळे उठले. राऊत यांनी जे मुद्दे मांडले ते पूर्ण बरोबर आहेत. केंद्र सरकारने ई.डी., सी.बी.आय. या सर्व सरकारी संस्थांचा वापर महाराष्ट्र सरकार मोडून काढण्याकरिता उघडपणे केलेला आहे. जे मोदी सरकारविरुद्ध बोलतील-िलहीतील त्यांना ‘देशद्रोही’ ठरवेपर्यंत मजल गेलेली आहे. राऊत, त्यांचे कुटुंबीय यांना छळण्याचा प्रकार झालाच. तो कोणी अमान्य करत नाही. पण त्याच्याकरिता पत्रकार परिषदेचा वापर अप्रस्तुत आहे. तुमच्या हातात वृत्तपत्र आहे. तुम्हाला झोडपता येणार आहे. तुम्ही रज्यसभेत आहात, तिथे बॉम्ब टाका ना.... राऊत आज बोलत आहेत. पण याच भाजपाबरोबर त्यांचा पक्ष सत्तेत राहीला त्यावेळी असे अनेक ‘किरीट सोमय्या’ आिण असे अनेक ‘कंबोज’ त्या सरकारचे मध्यस्थ म्हणून वावरतच होते. कोणतेही सरकार असो, त्या सरकारात असे दोन-तीन ‘कंबोज’ लपून छपून असतातच. भाजपाच्या राजवटीत ते उघड झाले. कारण फडणवीस यांनी त्यांच्या सत्ताकाळात अशी अनेक प्रकरणे हाताळली की, ती अक्षेपार्ह होती. त्यांच्या मंित्रमंडळातील प्रकाश मेहता, एकनाथ खडसे यांना मंित्रमंडळातून का जावे लागले? फडणवीस यांचे त्यावेळचे खास आवडते मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी परळीच्या बैद्यनाथ सहकारी बँकेकडून ७८ कोटी कर्ज घेतले होते. ते फेडले गेले नाही म्हणून फडणवीस सत्तेवर येण्यापूर्वी त्याची चौकशी सुरू झाली होती. सी.बी.आय पर्यंत बँकेची तक्रार गेली. दरम्यान फडणवीस आले.... केंद्रात मोदी आले... संभाजी पाटील-निलंगेकर हे फडणवीस यांच्या सरकारात आले. फडणवीस यांनी उलट-पलट करून २५ कोटींत तडजोड करून घेतली. आिण हे प्रकरण मिटले. असे एक प्रकरण नाही. अनेक प्रकरणे आहेत. भाजपा सगळ्या बाजूंनी बरबटलेला आहे. आता तर त्यांच्या पायाखालची सत्ता िनसटू लागल्यामुळे ते हैराण आहेत. बंगालमध्ये मोदींची फटफजिती झाली. हा पराभव भाजापाचा नव्हता... मोदी-शहा यांचा होता. आताही उत्तर प्रदेशात सपाटून मार पडेल. आिण २०२४ च्या लोकसभा िनवडणुकीत मोदी आिण भाजपाला पळता भुई थोडी होईल. लोक सर्व काही उघड्या डोळ्यांनी पाहात आहेत. त्याचा हिशोब मतदारच योग्यवेळी चुकता करतील. पर्यायी नेता कोण? असे आता कोणी म्हणत नाही. पर्याय िनघेल...
मात्र, महाराष्ट्रात सध्या जे चाललेले आहे, ती िचखलफेक महाराष्ट्राला शोभा देणारी नाही. केंद्र सकरार ईडी-बीडी-सीडी ला जेवढे वापरेल तेवढे अधिक बदनाम होईल. आिण तो िदवस फार दूर नाही. ज्या िदवशी मोदींची राजवट कोसळेल...
राऊत यांचा कालचा आरोप आहे की, ‘मोदींना महाराष्ट्रातील सरकार पाडायचे आहे....’ राऊत यांनी यात नवीन काही सांिगतलेच नाही. आजच पाडायचे आहे, अशी िस्थती नाही. हे सरकार स्थापन झाले, त्या िदवसांपासून, सरकार पाडायचेच बेत होते. त्याच्या तारखा कधीपासून िदल्या गेल्या... याच जागेवर २ वर्षे मी हेच िलहीतो आहे. पण सरकार न पाडण्याचे कारण वेगळे आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना महाराष्ट्रात भाजपाला बहुमत िमळवून देता आले नाही. सध्याचे महाविकास आघाडीचे सरकार पाडून, जेव्हा केव्हा निवडणुका होतील तेव्हा आजचा १०५ कौरवांचा महाराष्ट्रातील भाजपा ५० वर येवून पोहोचेल, हे मी दोन वर्षांपासून िलहीतो आहे. िशवाय कर्नाटकातील आमदार फोडले, मध्यप्रदेशातील काँग्रेसचे आमदार फोडले, मोदी-शहा-फडणवीस-चं.पा. हे सगळे एक झाले तरी, पोत्याने पैसे ओतले तरी महाराष्ट्रातील आमदार फोडणे यांना शक्य होणार नाही. तो प्रयोग करायचा प्रयत्न झाला होता. ‘आमदार फोडडण्याचा प्रयत्न करून’ ते फुटत नाहीत. सरकार पडत नाही, राष्ट्रपती राजवट लावली तर, सहा महिन्यांनी होणाऱ्या िनवडणुकीत भाजपा साफ होईल. हे सांगायला जोितषाची गरज नाही. पण सरकार पाडण्याच्या भीतीने एवढ्या आक्रमकपणे त्या विदुषक सोमय्याला एवढे महत्त्व देण्याची गरज नाही. महाराष्ट्रात हा माणूस काल उगवला आिण आज आरोप करतोय, अशी िस्थती नाही. कैक वर्षे त्याचे हे धंदे चालु आहेत. महाराष्ट्राने त्याला कधीही गांभीर्याने घेतले नाही. भाजपावालेही त्याला गांभीर्याने घेत नाहीत.... वापरत आहेत...
मात्र श्री. कंबोज यांनी खुलासा करताना श्री. राऊत यांच्यावर जो आरोप केला आहे.... त्याची बाहेर चर्चा होईल आिण ते पक्षासाठी, आघाडीसाठी जास्त हानीकारक आहे. एवढेच आता सांगतो.
सध्याच्या आघाडी सरकारला तसा कोणताच चेहरा नाही. पवारसाहेबांचा पक्ष सत्तेत भािगदार आहे म्हणून आघाडीने तग धरलेला आहे. परंतु संजय राऊत यांनी आक्रमक होवून व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप करत बसण्यापेक्षा, सामान्य माणसांचे प्रश्न राज्यसभेत, त्यांच्या वृत्तपत्रात लावून धरले तर त्याची आज जास्त गरज आहे. आज सामान्य माणसांसाठी कोणतेच वृत्तपत्र नाही.... सगळ्या वृत्तपत्रांत फक्त पुढाऱ्यांचेच फोटो आहेत. तीच-तीच नावे रोज आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रोजच आहेत. ‘कोर्टात खेचतो’, ‘अब्रू नुकसानीचा दावा दाखल करतो’, ही शिर्षके जास्त आहेत. एकमेकांना धमकावण्याचे काम सुरू आहे. पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील कष्टकरी माणसांच्या प्रश्नांची स्थिती काय आहे? त्यांच्यासाठी कोणता नेता आहे? त्याचे उत्तर मिळत नाही. कोणत्याही परिस्थितीत भाजपा सत्तेवर नको, हे शंभर टक्के खरे आहे... जनसंघ आिण भाजापाच्या विरुद्ध ६० वर्षे लेखणी चालवणारे आिण प्रामाणिकपणे मनाला योग्य वाटेल ते िनर्भिडपणे लिहीणारे पत्रकार आहेत.... राऊत यांची भूमिका बदलल्यामुळे ते आज भाजपाविरुद्ध आक्रमक आहेत. पण त्या अाक्रमकपणाला सामािजक प्रश्नाचे स्वरूप द्या. ‘उज्ज्वला गॅस वितरण’ या प्रकरणात सामान्य माणसांना कसे फसवले, जाहिराती करून प्रतिमा कशा मोठ्या केल्या गेल्या, त्यावर तुटून पडा... सामािजक प्रश्न हाच पत्रकाराचा आशय आिण विषय असला पाहिजे. व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप आिण कोण माणूस कितीही आिण कसाही असला तरी, चांगल्या माणसांनी आपली भाषा सभ्यपणेच वापरली पाहिजे. कारण आपण वरच्या पायंडीवर आहात. तुमचे सत्य आहे तर िशवीगाळ करण्याची गरजच नाही. त्यांना दलाली करू द्या. तुम्ही सामान्य माणसांच्या प्रश्नांचे आधार व्हा... मग सरकारबद्दल लोकांचे कसे मत होतेय ते बघा... आज भाजपा नको म्हणून आघाडी मान्य झालेली आहे. प्रेमामुळे नाही. ती प्रेमापोटी व्हायला हवी. हे सूत्र लक्षात ठेवा... यशवंतराव च्ाव्हाण राज्यावर आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने राज्य सांभाळले... त्याचा अभ्यास करा.... त्यांना एकदा िकसनवीर म्हणाले, ‘साहेब, सरकार खूप चांगले चालले आहे...’ यशवंतराव म्हणाले, ‘आबा, हे तुम्ही म्हणून उपयोग नाही... लोकांनी म्हटले पाहिजे....’ महाराष्ट्र राज्य झाले तेव्हा यशवंतरावांनी मधुकरराव चौधरी यांना बोलावून घेतले... त्यांना ते म्हणाले, ‘बाळासाहेब, महाराष्ट्राच्या राज्यात नगरविकास खात्याचे काम तुमच्याकडे सोपवले आहे... तुम्ही धनाजीनानांचे पुत्र आहात... नगरविकास खाते तुम्हाला दिले आहे. नवीन राज्यात सामािजक क्रांती करणारे कोणते विधेयक तुम्ही विधानसभेत आणू इच्छिता...? ते विचार करून सांगा....’
मधुकररावांनी दोन दिवस घेतले... यशवंतरावांना ते भेटले आिण सांिगतले की, ‘डोक्यावरून मैला वाहून नेण्याच्या-माणसाने माणसांची घाण वाहून नेण्याच्या, पद्धतीला बंदी करणारे विध्ोयक आणू या...’ यशवंतरावांनी त्यांना िमठी मारली.... आिण महाराष्ट्र राज्य झाल्यावर यशवंतरावांच्या प्रेरणेमुळे ‘डोक्यावरून मैला वाहून न्यायला बंदी’ करणारे विधेयक देशात पहिल्यांदा महाराष्ट्राने आणले. महाराष्ट्र असा आहे. त्याचे नेते असे होते. िचखलफेक नव्हती... घाण आिण िचखल स्वच्छ करण्याचा विचार करणारे नेते होते. म्हणूनच महाराष्ट्राची अनेक विधेयके देशाने कायदे म्हणून स्वीकारली. मग ते मुंबई राज्यातील‘द्विभार्याबंदी’ विधेयक असो, ‘कसेल त्याची जमीन असो’, ‘खाजगी गाड्यांचे राष्ट्रीयकरण’ असो, ‘महिना बाराशे रुपये उत्पन्नाच्या कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण’ असो, महाराष्ट्र राज्य झाल्यावर ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या मुलांना एस.टी. चा मोफत पास असो, राेजगार हमी असो, किती क्रांतीकारी िनर्णय सांगू.... त्याच काळात चार कृषी विद्यापीठे, ३५ हजार खेड्यांमध्ये विद्युतीकरण, शेती स्वयंपूर्ण करणे, धान्याची कोठारे भरली... ते िदवस आठवा... जेव्हा रेशनसाठी लाईन होती. आज आपण धान्य निर्यात करतो आहेत. त्यावेळी उद्योगांची सि्थती काय होती? एम.आय.डी.सी. ने केवढी क्रांती केली.... यशवंतरावांपासून शरद पवार यांच्यपर्यंत हा महाराष्ट्र कसा घडला, सामान्य माणसांचे प्रश्न कसे सुटत होते... हे आता कोणी कोणाला सांगायचे?
सगळेच काही बदलले आहे. पैशांच्या व्यवहारांची उघडपणे चर्चा होते, उघडपणे कोट्यवधी रुपयांचे आरोप होतात.. लोकांनाही आज त्याचे काही वाटत नाही.
राजकारणात पैसा लागतो... महात्मा गांधी यांनी राजकारण सुरू केले तेव्हा राजकारणासाठी एक कोटी रुपये जमवायचे जाहिर केले. त्याला ‘पैसा फंड’ नाव होते. ९६ लाख रुपये जमले. एक कोटी जमले नाहीत तर ज्यांच्याकडून पैसे घेतले ते परत करू, असे महात्माजी म्हणाले होते... गोदरेज कंपनीचे जे एस. पी. गोदरेज यांचे पिताजी ४ लाख रुपये घेवून महात्मा गांधी यांच्याकडे गेले... १ कोटी रुपये पूर्ण झाले. एक-एक पैसा जमा करून त्यावेळचे राजकारण होत होते. एक पैशांचा हिशेब िदला जात होता. परवा उद्योगपती राहुल बजाज गेले.... त्यांचे आजोबा जमनालालजी बजाज यांना गांधीजी म्हणाले की, ‘तुम्हाला अडचणीत टाकतो आहे... सेवाग्रामचा आश्रम उभा करायचा आहे... ’ आजचा जो सेवाग्रामचा आश्रम आहे... ते जंगल होते. जमनालालजींनी त्यावेळी तीस हजार रुपये खर्च करून सेवाग्राम आश्रम बांधून िदला. ते लाद्या बसवून देणार होते. बापू म्हणाले, ‘अिजबात नाही.... हा आश्रम रोज शेणाने सारवूनच स्वच्छ केला जाईल...’ आिण आजही आश्रम शेणानेच सारवला जात आहे.
असा हा महाराष्ट्र.... असे त्यावेळचे लोक... असे त्यावेळचे निर्णय.... त्या काही पुरोगामी िनर्णयातील सहभागी आता फक्त शरद पवारसाहेब आहेत. पवारसाहेब, तुम्हाला हात जोडून विनंती आहे... तुम्हीच पुढाकार घ्या... यशवंतरावांना अपेिक्षत असलेला महाराष्ट्र पुन्हा समजुतदारपणाचा, शहाणपणाचा आिण सभ्य महाराष्ट्र हवा आहे. त्याला वळण देण्याचे काम तुम्हीच करू शकता... मेहरबानी करून वादावादी, आदळ-आपट, चिखलफेक थांबवा.... भाजपाला लोकच धडा िशकवणार आहेत. सुरुवात मोदींपासून होईल.... शेवट फडणवीसांपर्यंत असेल. तो लोकशाही मार्गाने असेल. मेहरबानी करून आताच्या आघाडी सरकारने या िचखलात उतरू नये. नकळतसुद्धा आघाडीच्या कपड्यांवर डाग पडता कामा नये.... यासाठी तुम्हालाच आता ितसरा नेत्र उघडावा लागेल. भाजपाला जे काही आरोप करायचे आहेत ते करू द्या... त्याला पत्रकार परिषदेच्या नावावर भाषणे करून उत्तरे द्यायचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्राचा बिहार-उत्तरप्रदेश व्हायला वेळ लागणार नाही....!
Comments
Post a Comment