पै वसंतराव पाटील दादा
सामाजिक,शैक्षणिक व कुस्तीसारख्या मर्दानी खेळात वाहून घेऊन भाईंदर (मुंबई) याठिकाणी अमरदीप शिक्षण संस्थेची व अनेक संस्था संघटनांची स्थापना करून महाराष्ट्रात नावलौकिकास पात्र ठरले आहेत. तसेच त्यांनी श्री.गणेश आखाड्याची उभारणी करून गोरगरीब,होतकरू मल्लांना दत्तक घेऊन मदत करत असतात. श्री.गणेश आखाड्यात त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट आणून मल्लांच्यासाठी कुस्ती प्रशिक्षण व संस्कार शिबीराचे आयोजन करतात. त्याठिकाणी मल्लांना मोफत प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शंभरच्यावर मुलं- मुली कुस्तीचा सराव करतात. पाटील हे मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ, 'आम्ही सांगलीकर' यांसह अनेक संस्था व संघटनांमध्ये कार्यरत आहेत. श्री.वसंतराव पाटील यांना आतापर्यंत अनेक मानसन्मान मिळाले आहेत. त्यांनी अनेक स्पर्धा व मैदाने घेऊन ते यशस्वीरित्या पार पाडली आहेत. अशा या कुस्तीप्रेमी पैलवानास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
मनोज मस्के ( पत्रकार)
तालुका अध्यक्ष शाळा तालुका
कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य
Comments
Post a Comment