जय हनुमान कुस्ती संकुल शाहुवाडी संचलीत, कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने
*जय हनुमान कुस्ती संकुल शाहुवाडी संचलीत, कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने*
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*{ उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिर २०२३ }*
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
जय हनुमान कुस्ती संकुल शाहुवाडी यांच्या वतीने उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शीबीर घेण्यात येणार आहे. या शिबीराचा मुख्य उद्देश म्हणजे बदललेल्या युगात आंतरराष्ट्रीय पातळीवर बदललेली कुस्ती . पुर्वीची मैदानी कुस्ती आणी अलीकडील स्पर्धात्मक कुस्ती यातील फरक समजुन घेऊन योग्य दिशा देण्यासाठी व महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुलांना आंतरराष्ट्रीय कुस्तीचे नियम माहित होण्यासाठी हे शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीरासाठी अनेक अनुभवी प्रशिक्षक असणार आहेत. तसेच मुलांना राहण्यासाठी प्रशस्त रुम , चांगल्या प्रतीचे जेवण, दुध, केळी, थंडाई आदी व्यवस्था वेळच्या वेळी असणार आहे.
खेळण्यासाठी मॅट, मातीचा आखाडा, प्रशस्त ग्राउंड, झोपण्यासाठी स्वतंत्र सुविधा, जेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असल्याने मुलांना आनंदात या शिबीराचा लाभ घेता येणार आहे.
हे शिबीर महिनाभर असल्याने यामध्ये सहा मिनटाची कुस्ती कशी लढली पाहीजे, यामध्ये कसे टेक्निक वापरले पाहीजे, याचे नियम नेमके कसे असतिल या सर्वच बाबी या शिबीरात घेण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील मुलांना मैदानी कुस्ती एवढेच माहीत आहे. मैदानावर पैसे मिळतात या आशेवर मुलं स्पर्धा टाळतात आणी मैदाने पसंत करतात. खऱ्याअर्थाने कुस्तीत करीअर करायचे असेल तर स्पर्धा खेळणे गरजेचे आहे. नेमकी हिच कमतरता ओळखुन या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरानंतर नक्कीच तुमच्या मुलांमध्येही बदल झालेला तुम्हाला दिसेल यात शंकाच नाही. आपल्या मुलाला काय द्यायचं हे पालकांनी ठरवायचं दुसऱ्याला विचारुन मुलांचं भविष्य नाही ठरवायचं. तुमचा एक निर्णय तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करू शकतो. फक्त निर्णय घेताना मनापासुन घ्यावा
दिनांक २७ एप्रिल २०२३ पासुन शिबीरास प्रारंभ होणार आहे. त्यापुर्वी नावनोंदणी करूण आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करा. जाहिरातीतील नंबरवर फोन करा माहीती घ्या.... आणि आपल्या मुलाचा प्रवेश आजच निश्चित करा..
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
👉शिबिराची वैशिष्ट्ये* --
१)तज्ञ प्रशिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन
२)आधुनिक मॅट व प्रशस्त मातीचा आखाडा
३)खेळासंबंधी व्यायाम व आहार विषयी सखोल मार्गदर्शन
४)योगासन प्रात्यक्षिके
५)आंतरराष्ट्रीय नियमांनुसार कुस्ती प्रशिक्षण
६)व्हिडिओ द्वारे कुस्तीच्या डावांचे मार्गदर्शन
७)देशी तुपातील जेवण दिले जाईल.
८) आठवड्यातुन तीन वेळा मांसाहारी दिले जाईल.
९) प्रत्येकाला अनलीमीट थंडाई दिली जाईल.
१०) पिण्यासाठी शुद्ध अॅक्वाचे पाणी दीले जाईल.
११) वैद्यकिय व्यवस्था असणार आहे.
१२) खेळाडूंनी येताना आपले शूज, अंगावर पांघरून, बरमूडा, काश्टुम, इत्यादी घेऊन येणे.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*👉शिबिराच्या नियम व अटी* --
@ वय मर्यादा - १० वर्ष ते २० वर्ष
@ प्रशिक्षणादरम्यान मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे .
@ एकदा घेतलेला प्रवेश रद्द करता येणार नाही
@ कोणत्याही कारणास्तव फी परत दिली जाणार नाही.
@ प्रवेश निश्चितीवेळी फी भरणे आवश्यक
@ प्रवेश नोंदणी अंतिम तारीख - २७ एप्रिल २०२३
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*👉प्रवेश फी* --*४५००* रूपये
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
••••••••••••••••••••••••••••••••••
संपर्क :- १) पै. प्रकाश काळे वस्ताद, महाराष्ट्र चॉम्पीयन शाहुवाडी 9923555093/9404736369/8623954048
*स्थळ:- जय हनुमान कुस्ती संकुल शाहुवाडी, जि. कोल्हापूर*
*पंचायत समिती समोर*
धन्यवाद!
*मनोज मस्के- पत्रकार*
अध्यक्ष शिराळा तालुका
कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य,
9890291065
Comments
Post a Comment