*श्री.आण्णासाहेब पठारे यांना 'महाराष्ट्र गौरव पुरस्कार' जाहीर..*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
पुणे जिल्ह्यातील खराडी गावचे सुपुत्र,सामाजिक,शैक्षणिक व कुस्तीसारख्या मर्दानी खेळासाठी संपूर्ण आयुष्य वेचून गोकुळ वस्ताद तालीम व आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मल्ल निर्माण केले.ते नेहमी नवनवीन उपक्रम राबवून यशस्वी करतात. त्यांनी अनेक महाराष्ट्र केसरी,राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडविले. खराडी येथे गेली अनेक वर्षे काळभैरवनाथ जोगेश्वरी माता व वाडेबोल्हाई देवाच्या यात्रेनिमित्त कुस्ती मैदानात अनेक महाराष्ट्र केसरी व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मल्लांचा व जुन्या काळातील वस्तादांचा स्पर्श झाला आहे,हे फक्त आण्णांमुळेच शक्य झाले.
त्यांनी खराडी गावचे पंधरा वर्षे अविरत सरपंच पद भूषवले व खराडी गावाला प्रगतीच्या शिखरावर नेले. महाराष्ट्राची कुस्ती परंपरा देशभर पोहोचवून खराडी चंदननगरची 'कुस्तीपंढरी' म्हणून ओळख निर्माण केली. त्यांनी केलेल्या या अतुलनीय कार्याबद्दल ज्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली व देशभर इतिहास निर्माण केला असे कुस्तीसम्राट स्वर्गीय पैलवान युवराज पाटील यांच्या नावाने दिला जाणारा २०२२ चा 'महाराष्ट्र गौरव पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे.
🔶 *स्थळ - घोरी मंगल कार्यालय,जुने शिरोली हायस्कूल जवळ, शिरोली(पुलाची),कोल्हापूर.*
🔶 *रविवार दि. ९ जानेवारी २०२१ - सकाळी ११ वाजता*
Comments
Post a Comment