*मराठीयन टीव्ही चॅनेल चे कार्यकारी संपादक, मा विठ्ठल पाटील साहेब वाढदिवस अभिष्टचिंतन*.....

*मराठीयन टीव्ही चॅनेल चे कार्यकारी संपादक, मा विठ्ठल पाटील साहेब वाढदिवस अभिष्टचिंतन*...... 
-------------------------------
     शाहुवाडी तालुक्यातील सरुड जवळच्या शिंपे  गावचे सुपुत्र *मा विठ्ठल पाटील यांचा आज वाढदिवस*.. 
............................. 
*लेखन-पै अशोक सावंत /पाटील* सोंडोली
.......................... 
 पाटील साहेब यांच्या बाबतीत बोलायचं झाले तर *मी ईतकच म्हणेन की एक अभ्यासु व्यक्ती मत्व*.... 
  पाटील साहेबांचे वडील ग्रामसेवक होते,त्यामुळे पाटील साहेबांना शिक्षण, आणि सामाजिक बांधिलकीची जाण होती. कोणत्याही सामाजिक कामासाठी पाटील साहेब कटीबद्ध होते.
पुणे याठिकाणी त्यांचे बंधू सर्व्हिस ला होते त्यांच्या जवळ पाटील साहेब पुण्याला गेले, त्याठिकाणी त्यांनी उच्च शिक्षण घेतले. शिक्षणात पण हुशार असणारे पाटील साहेब यांना नेहमी वाटायचे की आपण आपल्या लेखनीतुन बाहेर काय चालू आहे हे समाजापर्यंत पोहचवायचे, त्यातच सकाळ या वृत्तपत्रात एक जाहिरात आली की सकाळ पेपर साठी अनुभवी लोकं पाहिजेत,आणि त्यासाठी स्पर्धा परीक्षा सुद्धा द्यावयाची आहे. आणि ती स्पर्धा परीक्षा द्यायची असे पाटील साहेबांनी ठरवले, आणि ती *स्पर्धा उत्तीर्ण होऊन १९९१ ला सकाळ या दैनिक सकाळ या वृत्तपत्रात पुणे येथे ते रुजू झाले*. त्यानंतर नाशिक याठिकाणी त्यांची बदली झाली. 
आपल्या निर्भीड पत्रकारितेद्वारे १९९१ ते २००७ पर्यंत ते सकाळ वृत्तपत्रात होते, त्यानंतर २००७ ते २०१७ त्यांनी दैनिक पुढारी या वृत्तपत्रात सुद्धा कार्यकाळ सांभाळला आहे. या सर्व *पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना, पाटील साहेब यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे*. 
     आपल्या रोखठोक लिखाणाने विठ्ठल पाटील म्हणून त्यांनी वेगळे नाव मिळवले आहे. 
*२०१७ साली उच्च शिक्षित असणारे पाटील साहेब यांनी स्वतः 'मराठीयन' हे टीव्ही चॅनेल* तुमच्या आमच्या सेवेसाठी खुले केले. हे टीव्ही चॅनेल महाराष्ट्र भर घराघरात आपल्याला पहायला मिळत आहे. महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यात त्यांचे प्रतिनिधी काम करत आहेत. 
  पाटील स्वतः उच्च शिक्षित असल्याने त्यांची मुलं सुद्धा उच्च शिक्षित आहेत. 
 कोल्हापूर याठिकाणी पाटील साहेब वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा आणि सुन सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत, आणि एक मुलगी सिव्हिल इंजिनियर, आणि लहान मुलगी बी फार्मसी आहे. 

  अशा या अभ्यासु व्यक्ती मत्वाला *कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य कडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा*.... 
. . ..................... 
धन्यवाद
*पै अशोक सावंत/पाटील* कुस्ती संघटक
*कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य*
अध्यक्ष शाहुवाडी तालुका
मो 9702984006

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि आलेला अनुभव*....