*शिराळा तालुक्यातील मांगरूळ गावचे सुपुत्र पुढारी *मा आकाराम मस्के (बापू) यांचा आज वाढदिवस*..

मांगरूळ गावचे चाणाक्ष राजनैतिक, स्वाभिमानी नेतृत्व, व शिराळा तालुक्याचे माजी उपसभापती, सहकार शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व, प्रशासकीय पातळीवर ज्यांच्या रुबाबदारीची छाप असणारे, भरदार मिशा, अंगात नेहरू शर्ट, त्यावर धोतर पायात कोल्हापुरी पायतान, तलवारी सारख्या लांबलचक मिशा असा हा राजबिंडा दिसणारा पुढारी आकाराम मस्के  (बापू) आज त्यांचा वाढदिवस. खऱ्या अर्थाने राजकीय पुढाऱ्यांनी कसं दिसावं हे बापूंच्या कडून शिकावे. शिवाय राजकारणातील  डावपेच त्यातील अभ्यास कुठल्या वेळेत काय केलं पाहिजे याचा परफेक्ट अंदाज असणारा हा मंगरूळ गावचा पुढारी. अनेक वर्ष बापूंनी राजकारणात काढली शिवाजीराव देशमुख यांचे ते अत्यंत जवळचे सहकारी. मंगरूळ मध्ये आकाराम बापू यांच्याशिवाय देशमुख पार्टी चे पान सुद्धा हलत नव्हते. आज बापू जवळ जवळ ८५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. आज सुद्धा तोच रुबाब आणि तीच स्टाईल पाहायला मिळते. राजकारण करत करत शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर बापूंनी आपल्या चारही मुलांचे शिक्षण पूर्ण केले. किंबहुना त्यांची लग्नही केली. कुठेही नोकरीला नसणारा हा माणूस शेतीच्या जीवावर आपलं कुटुंब संभाळून तालुक्याचं राजकारणही करत होते. संपूर्ण तालुक्यात या माणसाला पुढारी म्हणून ओळखले जाईल आज याच व्यक्तीमत्वाचा 85 वा वाढदिवस त्याना उदंड आयुष्य लाभो...
श्री मनोज मस्के - मांगरूळ

Comments

Popular posts from this blog

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*.

*सोंडोलीमध्ये रंगणार दोन महाराष्ट्र केसरींची तुफानी दंगल देवा थापा स्पर्धेचे खास आकर्षण*