देता, देता इतुके द्यावे ...देणाºयाने ‘रामशेठ’ व्हावे...
मधुकर भावे आज एका वेगळ्या विषयावर लिहीत आहे. २७ डिसेंबरला सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज संकुलात एका भव्य इमारतीचे लोकार्पण होत आहे. ५0 वर्षापूर्वी रयत शिक्षण संस्थेमध्ये ‘कमवा आणि शिका’ या योजनेत पदवीधर झालेले, नंतर शिक्षक झालेले, नंतर व्यावसायिक झालेले, नंतर राजकारणात आलेले पण राजकारण अंगाला चिकटवून न घेतलेले, व्यवसायात सचोेटीने आर्थिक यश मिळवलेले पण पाय जमिनीवर असलेले... रामशेठ ठाकूर यांनी ही इमारत ‘रयत’ला बांधून दिली आहे. त्यासाठी ७ कोटी ४0 लाख रुपये त्यांनी खर्च केले आहेत. आनंदाने केलेले आहेत. जे केले त्याचे त्यांना फार समाधान आहे. अशी थोडी माणसं असतात, जी समाजाकरिता जगतात. समाजाकरीता केलेल्या कामात आनंद मानतात. रामशेठ त्यामधले आहेत. त्यांना घरातील सर्व कुटुंबियांचीही तेवढीच साथ आहे. महाराष्ट्राचं मोठेपण नेमकं कशात आहे? असा प्रश्न माझ्या मनात हे लिहीताना आला आणि त्याच उत्तरही लगेच समोर आलं. महाराष्ट्राच मोठेपण ‘महाराष्ट्र’ या नावातच आहे. हे राज्य खरच महान आहे. हे एकमेव राज्य असं आहे, ज्याच्या शब्दात ‘राष...