हल्ली, बोरं ही नाही, आणि बोरं, खायला पोरं ही नाही.




हल्ली, बोरं ही नाही, आणि बोरं, खायला पोरं ही नाही.

चिखली - मनोजकुमार मस्के

हिवाळा काळात मिळणारी गावरान बोरं अलीकडे दिसेनाशी झाली. त्याला कारणही तसंच आहे शेतातील बांधावरील बोराची झाड गायब झाली आहेत. परिणामी गावरान बोर खायला मिळतील का नाही असं म्हणण्याची वेळ आली आहे. एखाद्या बाजारपेठेत गावरान बोरं असलीच तर त्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. अॅप्पल बोर ही बाजारपेठेत महाग झाले आहे. ५-१०रूपये किलो मिळणारी बोरं आता 35 ते 40 रुपये किलो मिळते.
पूर्वी शेतातील बांध, नदी, ओडा या जागी गावरान बोराची झाडे दिसून येत होती त्यामुळे दिवाळीनंतर बोरं खाण्याची धमाल असे. परंतु सध्या अशी झाडे अपवादानेच पहावयास मिळतात संकरित व मोठ्या आकाराची बोरांनी  बाजारपेठ व्यापली असली तरी गावरान बोरं खाण्याची मजा यात नाही. मागील वर्षी बाजारपेठेत एप्पल बोर मोठ्या प्रमाणात दाखल झाली होती परंतु यंदा या बोरांची आवक नसल्यात जमा आहे. त्यामुळे ग्राहकांना नाविलाजाने अन्य संकरित बोराची खरेदी करावी लागत आहे. अशा बोरांचे दरही अधिक आहेत आणि दुसरीकडे गावरान बोर ही मिळत नाही.

शेतकरी म्हणतात
आमच्या शेतातील बांधावर पाच सहा वर्षांपूर्वी बोराची पाच ते सहा झाडं होती गावातील पोरं आवर्जून बोर खाण्यासाठी येत होते. परंतु शेतीची वाटणी झाल्यानंतर हा बांध काढून घेण्यात आला त्यामुळे झाडेही तोडावी लागली. आजच्या घडीला आम्हालाही गावरान बोर खायला मिळत नाहीत


गावात होती एक बोरं, बोरीला १०-५ पोरं... पोरांची नावं सांगरं गड्या, वाऱ्यानं दुनिया गेली गड्या...
पुर्वी आम्ही बोरं खाण्यासाठी गावातील पोरं एकत्र जात होतो. जाताणा आमचं हे ठरलेलं गाणं असायचं. हल्ली गाणंही नाही, आणी बोरं ही नाही.

- सुनिल डीगे मोरेवाडी

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि आलेला अनुभव*....