नवी मुंबई येथे घणसोली याठिकाणी कै वसंत चव्हाण स्मृती चषक दि २५ डिसेंबर व २६ डिसेंबर रोजी एक देखनी भव्य क्रिकेट स्पर्धा पार पडली.*

*नवी मुंबई येथे घणसोली याठिकाणी कै वसंत चव्हाण स्मृती चषक दि २५ डिसेंबर व २६ डिसेंबर रोजी एक देखनी भव्य क्रिकेट स्पर्धा पार पडली.* 
............................... 
✍️ *पै अशोक सावंत पाटील*
            सोंडोली
....................... 
 शाहुवाडी क्रिकेट असोसिएशन च्या अंतर्गत कै  *कै वसंत स्मृती चषक* ही भव्य दिव्य अशा प्रकारची क्रिकेट स्पर्धा पार पडली आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक *मा मनोज चव्हाण व मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते*. 
गोंडोली हे शाहुवाडी तालुक्यातील
एक गाव आहे. आणि याच गावातील *मा मनोज चव्हाण हे सर्व सामान्य कुटुंबातील आणि शेतकरी कुटुंबातील एक आहेत*,गोंडोली सारख्या एका खेड्यातून नवी मुंबईत येऊन आपल्या दिवंगत वडिलांच्या नावाने कै वसंत स्मृती चषक दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धा नवी मुंबई येथे घणसोली विभागात आयोजित करुन *कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्याचे नाव मोठे केले आहे.*
  खरंच सांगतो या स्पर्धेच्या निमित्ताने गोंडोली गावचे सरपंच *मा काशीनाथ माने* सह गोंडोली गावचे मान्यवर  मा.श्री.अशोक चव्हाण, श्री.संजय पाटील, श्री.अरुण पाटील, श्री.आनंदा परळेकर ,श्री.बंडु मांगरुळकर आणि गावातील काही इतर लोकं आपल्या गावच्या मुलाने या स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल *ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि आपल्याच मुलाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी खास गावावरुन मुंबईला आले होते*. 
  या स्पर्धेत शाहुवाडीतुन १६ संघ आणि इतर ८ संघ असे एकुण २४ संघ आले होते. आकर्षक बक्षिसे आणि चषक या स्पर्धेच्या निमित्ताने ठेवले होते. 

*प्रथम क्रमांकासाठी ३०००० रुपये, मा सुरेश आण्णा पुजारी व दत्ता दादा मालुसरे* यांनी पुरस्कृत केले होते, तर *द्वितीय क्रमांकासाठी १५००० रुपये मा दिपक दादा पाटील* संस्थापक काणसा वारणा फाऊंडेशन यांनी पुरस्कृत केले होते, तर *तृतीय क्रमांकासाठी ८००० हजार रुपये मा मनोज आण्णा पुजारी व अंकुश चिकणे* यांनी पुरस्कृत केले होते.. 
तसेच *आकर्षक चषक मा सुनिल दादा मस्कर साहेब यांनी* पुरस्कृत केले होते. 

या स्पर्धेत अव्वल संघ ठरला तो म्हणजे *छत्रपती इलेव्हन संघ, आणि दुसर्या क्रमांकावर मुटकलवाडीचा संघ तर तिसर्या क्रमांकवर देऊळवाडी चा संघ विजेता ठरला*. 
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ स्पर्धा संपल्यावर *मा आमदार संदीपजी नाईक साहेब आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडला*. 
उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असे काही संघातील काही खेळाडू ठरले.त्यांना गुणवंत खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. 
*या क्रिकेट स्पर्धेचे थेट प्रक्षेपण (LIVE) आर टी सी (RTC) यांच्या माध्यमातून करण्यात आले होते*. 
तगडे नियोजन आणि संयोजन करण्यासाठी *मा मनोज चव्हाण आणि मित्र परिवारातर्फे गेली काही दिवस मेहनत करुन ही स्पर्धा यशस्वी पार पडली*. 
••••••••••••••••••••••••••
धन्यवाद
*पै अशोक सावंत/पाटील* कुस्ती संघटक
*कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य*
अध्यक्ष शाहुवाडी तालुका
मो 9702984006

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि आलेला अनुभव*....