बनाबाई केशव पाटील भावपूर्ण श्रद्धांजली
*मंगरूळ गावातील 70 टक्के मुलांना आईच्या अगोदर जिणे आपल्या तळहातावर घेतलं. आणि त्या मुलाच्या आईच्या स्वाधीन केलं. बऱ्याचशा मुलांना आणि आईला जीणे जीवदान दिलं. अशी सगळ्यांची आपलेपणाची बंनुकाकू ज्या माउलीने गावातील अनेक महिलांची बाळंतपणं अगदी हुशारीने आणि धाडसाने केली*.
*बनुकाकु ही आपल्या हातातील काम सोडून प्रत्येकाच्या मदतीला रात्री-अपरात्री सुद्धा धावून गेली. अनेकांची बाळंतपणे अगदी डॉक्टर पेक्षाही यशस्वी पार पाडली. परंतु कधीही कुणाकडे तिने हटून पैसे मागितले नाहीत. किंबहुना पैशासाठी म्हणून तिने ही जोखीम पत्करली नाही. समाजाची सेवा करत अखेरपर्यंत ती अनेकांना सेवाच देत राहिली.आणी तीही कोणती अपेक्षा न करता*.
*दि. १२/४/२०२१ रोजी अचानक कसलीही चाहूल न लागता आमच्यातुन निघुन गेली. अचानक आलेल्या दुखा:तुन शेणवी-पाटील परीवाराला सवरण्याची शक्ती मिळो. व बनुकाकुच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना*.
*बणुकाकुच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे, नातसुना, परतुंडे असा परिवार आहे.
उत्तरकार्य दि. २४/४/२०२१ रोजी मांगरूळ येथे होणार आहे*.
Comments
Post a Comment