*मा सरपंच प्रकाश पाटील यांचे चिरंजीव पै साहिल पाटील वाढदिवस विशेष*...

*मा सरपंच प्रकाश पाटील यांचे चिरंजीव पै साहिल पाटील वाढदिवस विशेष*... 
••••••••••••••••••••••
शाहुवाडी तालुक्यातील सोंडोली गावचे  सुप्रसिद्ध पैलवान मा. सरपंच प्रकाश पाटील यांचे चिरंजीव *पैलवान साहिल पाटील* याचा आज वाढदिवस

माणूस कुठे जन्माला आला, कुणाच्या घरात जन्माला आला, कुठल्या गावात जन्माला आला, कुठल्या जातीत जन्माला आला, व किती जगला याच्या पेक्षा तो कसा जगला कसा लढला याला फार महत्त्व आहे.... 
आपल्या जगण्याने, आपल्या कुस्ती खेळातील अचुक डावपेचांमुळे अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेला पैलवान साहिल पाटील सोंडोलीकर.. 

आजोबा पैलवान, वडील पैलवान, चुलता पैलवान, अशा घरात जन्माला आलेल्या पोरांला लंगोट कसा नेसायचा शिकवावे लागत नाही तो आपोआपच त्या क्षेत्राकडे वळतो. घरातुनच कुस्तीचे बाळकडू मिळाले म्हटल्यावर पोरगं काय वाया जाईल.. ते पैलवानच होणार. 

साहिल चे वडिल मा सरपंच पैलवान प्रकाश पाटील हे नव्वदच्या दशकात एक नामवंत पैलवान म्हणून त्यांचे नाव होते आणि त्यांच्या पावलावर पाउल ठेऊन त्यांचा मुलगा आज मोठा पैलवान होणार यात काही शंका नाही. 
इयत्ता दहावीत शिकणार्या साहिल ला लहानपणापासूनच कुस्ती ची भारी आवड वयाच्या पाचव्या वर्षी आपल्याच गावच्या तालमीत कुस्तीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर काही दिवस गावातील तालीम मोडकळीस आल्यावर त्याचा सराव थांबला, पण तो थांबला नाही, शेडगेवाडी येथे कुस्तीचा सराव करु लागला. आणि गेल्याच वर्षी गावातील तालमीचे नुतनीकरण करुन गावची तालीम मुलांच्या साठी खुली करण्यात आली.त्याठिकाणी तो सकाळी आणि संध्याकाळी कुस्तीचा सराव करू लागला. जोड वाढु लागली, आणि लगेच वडिलांनी त्याला कोल्हापूर येथे *न्यु मोतीबाग तालमीत सरावासाठी भर्ती केले*. आता मात्र त्याला पैलवानकीतली खरी दिशा मिळाली. सोळा वर्षांच्या या पोराचं वजन ६८ किलो असुन चालु वर्षी च्या कुस्ती सिजन मधील कुस्ती मैदानातील अनेकांचा कर्दनकाळ ठरला आहे. प्रचंड ताकदीचा असणारा 'एकचाक' या डावावर त्याने अनेकांना आस्मान दाखवले आहे. अल्पावधीतच कुस्ती शौकिंनांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. 

 असा शाहुवाडी तालुक्याचा शांत संयमी *पैलवान साहिल पाटील याला कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य* संघटनेकडून *वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* 🎂🎂🎂💐💐💐
••••••••••••••••••••••••••
            धन्यवाद
*पै अशोक सावंत/पाटील* कुस्ती संघटक
*कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य*
शाहुवाडी तालुका प्रमुख
मो. 9702984006

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*