*दै लोकमतचे निर्भीड पत्रकार मा सतिश नांगरे यांची 'प्रधानमंत्री जन कल्याणकारी योजना' शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी निवड*.

*दै लोकमतचे निर्भीड पत्रकार मा सतिश नांगरे यांची 'प्रधानमंत्री जन कल्याणकारी योजना' शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी निवड*. 
..................................... 
*लेखन-पै अशोक सावंत-पाटील* कुस्ती संघटक
................ 
शाहुवाडी तालुक्यातील शित्तुर गावचे सुपुत्र, एक रोखठोक पत्रकार सतिश नांगरे यांची आज प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी कोल्हापूर येथे निवड करण्यात आली. 

शासनाच्या विविध योजना, गोरगरीब जनतेपर्यंत, शोषित, पिडीत, घटकापर्यंत पोहचाव्यात यासाठी प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार व प्रसार हे अभियान राबविण्यात येते, या अभिनयाच्या शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी ही नियुक्ती करण्यात आली. 
  कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात त्यांना या अभियानाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा सुनिल मेने साहेब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र सुद्धा देण्यात आले. 
  
सतिश नांगरे यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर मी इतकंच म्हणेन की ग्रामीण भागातील एक रोखठोक बोलणारे, एक अभ्यासु पत्रकार,  आपल्या धारदार लेखनीने अनेक प्रश्न मार्गी लावणारे *दैनिक लोकमत चे पत्रकार मा सतिश नांगरे सर*..... 
  
     सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सतिश नांगरे यांची परिस्थिती तशी जेमतेमच, भाऊ बहिणी आई वडील असा परिवार, सतिश भाऊ यांना शालेय जीवनापासून तशी लेखनाची आणि वाचणाची पण आवड होती. 
शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण पत्रकारिता या क्षेत्रात करिअर करायचे असे त्यांनी ठरवले. आणि आज ते ग्रामीण भागातील एक अभ्यासु पत्र कार म्हणून ते कार्यरत आहे. 
लोकशाही चा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता, आज लोकशाही ला खर्या अर्थाने या लोकांनी बळकटी निर्माण केली आहे  
राजकीय, सामाजिक, क्रिडा या विषयावर आपल्या धारदार लेखनीने त्यांनी प्रभुत्व ठेवले आहे, १० जानेवारी रोजी संपन्न झालेल्या तुरुकवाडी येथील 'कुस्ती हेच जीवन' च्या पहिल्या ऑनलाईन कुस्ती मैदान ची बातमी लोकमतच्या वृत्तपत्रात त्यांनी लावली होती. कुस्ती खेळावर आत्मियता असणारे पत्रकार सतिश नांगरे हे एक कुस्ती प्रेमी आहेत 
 अशा या पत्रकाराची शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी निवड करुन प्रधानमंत्री जनकल्याणकारी अभियानाने एक उल्लेखनीय काम केले आहे. 
या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर सुनिल मेने साहेब राज्यध्यक्ष, मा शरद सक्रे साहेब संघटना महामंत्री,, मा शरद कांबळे साहेब महामंत्री, माबाळासाहेब मुग्धार, मा अनिल लोखंडे जिल्हा अध्यक्ष  हे उपस्थित होते
•••••••••••••••••••••••••••
धन्यवाद
*पै अशोक सावंत- पाटील* कुस्ती संघटक 
*कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य*
अध्यक्ष शाहुवाडी तालुका
मो ९७०२९८४००६

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*