आषाढी दिवशि शिराळा येथील गोरक्षनाथ मंदीर शांत....

 
आषाढी दिवशि शिराळा येथील गोरक्षनाथ मंदीर शांत....
नेहमी आषाढीला टाळ मृदुंगाने दुमदुमणारे शिराळा येथील गोरक्षनाथ मंदिर या वर्षी शांत होते..
 
शिराळा-   आषाढी एकादशी म्हटलं की संपुर्ण पंढरपुर टाळ मॄदुंगाने दणाणुन जाते. जीकडे पहावे तिकडे ज्ञानोबा तुकाराम गजर चालु असतो. अतिशय भक्तीमय वातावरणात विठ्ठलाचं दर्शन भाविक घेत असतात. विठ्ठलाच्या पायाला हात लावल्यानंतर पुढील वर्षभर त्यांना कशाचीही आवश्यक्ता भासत नाही . पांडुरंगाला भेटल्याने एक नविन जीवन भक्ताला मिळाल्यासारखे वाटते. 
           पंढरपुर प्रमाणेच सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात गोरक्षनाथ मंदिरास प्रतीपंढरपुर म्हणुन ओळखले जाते . अनेक भाविक पढरपुरला जाण्यास जमले नाही तर ते शिराळा येथे गोरक्षनाथ मंदिरात येऊन तेथील विठ्ठल मंदिरात दर्शन घेत असतात. सकाळी 5.00 ते 10.00 पंढरपुरचा विठुराया हा शिराळा येथील गोरक्षनाथ मंदिरात असतो असे अनेक जुनी लोकं सांगतात. त्यामुळे पहाटेपासुनच लोकं दर्शनासाठी गर्दी करतात.
  या वर्षी मात्र कोरोनाच्या संकटामुळे विठ्ठलाच्या दर्शनापासुन अनेक भाविकांना वंचीत रहावे लागले. कोरोनाचे संकट एवढे भयान आहे की देव सुद्धा भक्ताला जवळ घेण्यास तयार नाही. वर्षानवर्ष विठेवर ऊभा राहुन भक्ताला दर्शन देणारा व सर्वांची दुखः हरण करणारा पांडुरंग आज मात्र शांत उभा आहे. भक्त मात्र उरात भक्ती आणी डोळ्यात पाणी आणुन विठ्ठलाच्या भेटीची वाट पाहत आहे. विठ्ठल सुद्धा भक्ताविना राहुच शकत नाही. पण दोघांच्या मध्ये कोरोना सारखी भयंकर मोठी भिंत आहे . ही भिंत लवकरात लवकर बाजुला करून देवा तुझे दर्शन आम्हाला दे रे विठ्ला असे भक्त सांगत आहेत.
    शिराळा येथील गोरक्षनाथ मंदिर परिसर प्रत्येक वर्षी भक्तीमय वातावरणात फुलुन गेलेला असतो. ज्ञानोबा तुकाराम नावाच्या गजराने संपुर्ण शिराळा नगरी दुमदुमलेली असते. आज मात्र संपुर्ण परिसरात शांतता पसरलेली आहे. 
      शिराळा पोलीस ठाण्याचे फौजदार विशाल पाटील व सर्वच पोलीस दादा हात जोडून लोकांना सांगत आहेत. मंदीराकडे न येण्यासाठी सहकार्य करण्याची विणवनी करत आहेत. लोकंही सहकार्य करत आहेत. काही लोकं लांबुनच दर्शन घेऊन माघारी फिरत आहेत . हे कोरोनाचे संकट लवकर जावो आणी तुझी भेट होवो रे विठ्ठला. प्रत्येक वर्षीची वारी या वर्षी करता आली नसल्याने आणी आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटता न आल्याने अनेक भक्तांनी समाधानी नसल्याचे सांगीतले.

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*.