*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*
*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व* *अनाथ मुलांची बातमी पुण्यनगरीने छापताच अनेक मदत करणारे हात पुढे आले*. मनोजकुमार मस्के - शनिवारी माळेवाडी येथील अनाथ मुलांची बातमी दैनिक पुण्यनगरीने छापली आणि अक्षरशः दिवसभर मदतीसाठी अनेकांचे फोन येऊ लागले. या गरीब मुलांना मदत करण्यासंदर्भात अनेक लोक घरी येऊन मदत करू लागली. अनाथ मुलांची बातमी संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली आई-वडील आजी-आजोबा कोणी नाहीत. पूर्णपणे अनाथ असणारे या मुलांना अनेक जण मायेचा उभारा देत होती. अनेकजन भेटवस्तू वह्या पुस्तक बरच काही मुलांना आणून देत होते. काहींनी शाळेचा खर्च उचलला काहींनी फोन पे, गुगल पे करून आपली मदत केली. परंतु प्रत्येक फोन हा रडक्या आणि दबक्या आवाजात येत होता. प्रत्येकाला ही कथा वाचून गहिवरून येत होतं. समाजातील माणुसकीची जाण असणारे अनेक हात या मुलांना मदत करत होते. पुण्यनगरीने दखल घेऊन ही बातमी अनेकांच्या पर्यंत पोहोचवली आणि अनेकांनी माणुसकीचे नाते जपत या मुलांना मदतीचा हात पुढे केला. अनेक नाती जागी झाली या लेकरांची विचारपूस करू लागली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फोन वाजू लागल...
Comments
Post a Comment