डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील यांची 28 जुलै 2020 रोजी सिल्व्हर ओक वर मा.शरदचंद्रजी पवार यांच्याशी भेट

डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील यांची 28 जुलै 2020 रोजी सिल्व्हर ओक वर मा.शरदचंद्रजी पवार यांच्याशी भेट
••••••••••••••••••••••••••••••••
डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील राज्यपाल नियुक्त थेट (खेळाडू आमदार) साठी इच्छुक.
••••••••••••••••••••••••••••••
राजकारणात कुस्ती आणि कुस्तीत राजकारण या गोष्टी अपल्यासाठी नव्या नाहीत.नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कुस्तीतली वाक्ये खूपच गाजली.मात्र,खऱ्याखुऱ्या कुस्तीतला हिरो असणारा एक चेहरा आता राज्यपाल नियुक्त थेट (खेळाडू आमदार) साठी इच्छुक असल्याची माहिती मिळते आहे.
सांगली जिल्ह्या व खानापूर तालुक्यातील भाळवणी गावचे सुपूत्र,डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील हे खेळाडू आमदारकी साठी इच्छुक आहेत.दिनांक 28 जुलै 2020 रोजी त्यांनी यासंदर्भात राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा मा.श्री.शरदचंद्रजी पवार यांची सिल्व्हर ओक बंगल्यावर भेट घेतली.सदर भेट ही अर्थातच येणाऱ्या राज्यपाल नियुक्त थेट आमदारकीच्या खेळाडू आमदार पदाबाबत असल्याची माहिती मिळते.
कुस्ती क्षेत्रात हिंदकेसरी मारुती माने यांना मा.श्री.राजीवजी गांधी यांच्या कालखंडात थेट खासदार होण्याचा बहुमान मिळाला होता तर क्रिकेटचा देव असणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनाही थेट खासदार करण्यात आले होते.
कुस्तीसारख्या रांगड्या खेळातून दोन वेळा महाराष्ट्र केसरी असणारे तसेच राष्ट्रवादी च्या तिकिटावर जिल्हा परिषदेवर यापूर्वी निवडून येणारे चंद्रहार पाटील यांची यावेळी राज्यपाल नियुक्त थेट आमदार होण्याची इच्छा आहे.
मागच्या आठवड्यात चंद्रहार पाटील यांचे नातलग व सातारा जिल्ह्याचे खासदार मा.श्री.श्रीनिवास पाटील व सांगली जिल्हा पालक मंत्री,कॅबिनेट मंत्री मा.श्री.जयंतरावजी पाटील यांची सुद्धा याच कारणास्तव भेट घेतली होती.
डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील यांचा मित्रपरिवार महाराष्ट्रभर विखुरला आहे.विटा ता.खानापूर जि.सांगली येथे ते भारतातील सर्वात मोठे कुस्ती केंद्र स्थापन करत आहेत.चंद्रहार पाटील यांच्या सिल्व्हर ओक भेटीमुळे राज्यपाल नियुक्त थेट खेळाडू आमदार चर्चेला आता सांगली पंचक्रोशीत उधाण येत आहे.

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*