शाहुवाडी तालुक्यातील सोंडोली गावचे सुपुत्र *मा दिलीप कुंभार यांचा आज वाढदिवस*
*वाढदिवस एका मुर्तीकाराचा* ..... ...................... ✍ *पै अशोक सावंत/पाटील* - सोंडोलीकर शाहुवाडी तालुक्यातील सोंडोली गावचे सुपुत्र *मा दिलीप कुंभार यांचा आज वाढदिवस* दिलीप कुंभार यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला अनेक दशके गरीबीत असणारे हे कुटुंब त्यांचे वडील *आनंदा (पोपट) कुंभार आपल्या गणपती मुर्ती* *बनविण्याच्या कौशल्यावर, त्यातुन मिळेल त्या तुटपुंज्या कमाई वर आपला संसाराचा गाडा चालवत होते*, सर्व काही ठिक चालले असताना काळाला याची पर्वा कुठे, आळवावरचा पाण्याचा थेंब कसा अलगद जावा तसा आनंदा कुंभार नावाचा एक प्रसिद्ध मुर्तीकार देवाने उचलून नेला, आणि एका हाडाच्या मुर्तीकाराला दिलीप पोरका झाला या हाडाच्या मुर्तीकारामुर्तीकाराचा मी स्वतः अनुभवलेला किस्सा (आठवण) सांगतो २९ वर्षापुर्वीची गोष्ट..आमचं एक छोटे दुर्गामाता मंडळ होते आम्ही दुर्गामातेची मुर्ती शाहुवाडी तालुक्यातील कापशी या गावात मुर्ती ठरवली आणि घटस्थापनेच्या दिवशी मंडळातील काही कार्यकर्ते मुर्ती आणण्यासाठी गेलो असता आम्हाला त्याठिकाणी मुर्ती मिळाली नाही आम्ही हताश होऊन घरी परतलो आण...