नाना अचानक जाण्याने संपुर्ण मित्रपरीवाराला व त्यांच्या कुटूंबाला तसेच हितचिंतकांना मोठा धक्का बसला हे मात्र खरे

मांगरुळ  गावचे  प्रतिष्ठित नागरिक  आणि  श्री  अभिजित मस्के तलाठी आण्णासाहेब शिराळा  यांचे  वडील  श्री  लक्ष्मण  साधू  मस्के  यांचे आज आकस्मिक निधन झाले .
नुकतेच सेवानिवृत्त होऊन ते आपल्या मुळ गावी मांगरूळला राहत होते. दोन दिवसापुर्वी त्यांच्या मुलांनी आई - वडीलांच्या  लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. अतिशय सुखी   आसणार्या या कुटुंबावर जणु दुख्खाचा डोंगर कोसळला. 
         अतिशय मेहतीने त्यानी आपला संसार ऊभा केला. चार मुलांचे शिक्षण पुर्ण केले. मोठी मुलगी ग्रामसेवक झाली छोटा मुलगा तलाठी झाला. एक मुलगा mpsc चा आभ्यास करत आहे. मुलींची लग्न झाली असून त्यांच्या घरी त्या सुखात आहेत. मुलांची आजुन लग्न करणे बाकी होते  तोपर्यंत हा काळाने घाला घातला .
 संपुर्ण आयुष्य कुटुंबासाठी ते झटत राहीले . आत्ता कुठे बसुन खायचे दिवस आले तो पर्यंत नियतीने कानाडोळा केला. आणि आयुष्याचं गणितच बदलुन टाकले.  शेवटी परमेश्वराच्या नियतीपुढे कोणाचे चालत नसते.  जे ठरलेले असते तेच घडते. परमेश्वर लक्ष्मण साधु मस्के नाना यांच्या आत्म्यास शांती देवो व त्यांच्या परिवारास या दुखःचा सामना करण्याची शक्ती देवो हीच अपेक्षा .

नाना अचानक जाण्याने संपुर्ण मित्रपरीवाराला व त्यांच्या कुटूंबाला तसेच हितचिंतकांना मोठा धक्का बसला हे मात्र खरे

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि आलेला अनुभव*....