कर्तुत्ववान नेता मानसिंग भाऊ
महाराष्ट्रातील सर्व राजकिय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते ज्या नेत्यापुढेे आज आदराने झुकतात, नम्र होतात असे महाराष्ट्राचे आजचे सर्वश्रेष्ठ नेते दाखवता येतील यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्रात सर्वसामान्यांचा नेता म्हणून शरद पवार साहेब हेच सर्वश्रेष्ठ आहेत.
आशा या थोर नेत्याच्या हाताखाली शिराळा तालुक्यातील मानसिंगराव नाईक हा एक छोटा नेता. पक्षाचं काम करत आहे. किंबहुना शिराळ्याच्या राजकारणात मानसिंग नाईक (भाऊ) यांच्या एवढा समतोल विचाराचा दुसरा नेताच नाही. आप्पांच्यां निधनानंतर राजकारणाचा फारसा अनुभव नसताना प्रचंड जिद्द, प्रचंड अत्मविश्वास, धगधगती राष्ट्रभक्ती आणि अफाट असे व्यवहार ज्ञान या जोरावर भाऊं नी शिराळा तालुक्यात उणिपूरी आपला प्रभाव निर्माण केला. तो टिकीवला आणि वाढीवला शिराळा तालुक्यात असे एक ही क्षेत्र नाही की ज्या विषयाची भाऊंना माहिती नाही. आणि तालुक्यात एक ही गांव नाही की ज्या गावातील पन्नास- साठ कार्यकर्त्यांना भाऊ ओळखत नाहीत. नेत्यात सर्वात मोठा गुण हवा तो कार्यकर्त्यांना नावाने ओळखण्याचा, कार्यकर्ता कधीही आला तरी त्याचे म्हाणने ऐकून घेण्याचा भाऊं च्या मध्ये हे सगळे गुण शिगोशिग भरलेले आाहेत. सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याच्याजवळ जायला जरा सुध्दा भिती वाटत नाही, संकोच वाटत नाही. ते जेवत असताना सुध्दा कोणीही कार्यकर्ता अगदी घरातल्या माणसांप्रमाणे ज्याच्याजवळ सहज जाऊ शकतो, बोलू शकतो, आपला अर्ज देऊ शकतो. असे एकमेव नेते म्हणजे मानसिंगभाऊं . भाऊं आमदार आहेत. आमदारकी ही पदार्थ मानून असेल तर ठिक, नसेल तर त्याहून ठिक . आपल्याला भरपूर कामं पडले आहे. असं मानून भाऊ सहजपणे आपल्या राजकिय जिवनाचे संतूलन ठेवतात. त्यामूळे आमदार नामदार ही पदे त्यांच्यापूढे छोटी आहेत. कै. आप्पांनी सत्तेचा कधीच विचार केला नाही. फक्त जनतेचा विचार त्यांनी अखेर पर्यंत केला.
कै. आप्पांच्या नंतर सहकारी क्षेत्रात काम करीत भाऊंनी शिराळा तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम केले. मुलांच्या शिक्षणासाठी अनेक संस्था काढल्या, सहकारी साखर कारखाण्याचे जाळे विनले आणि एका व्यक्तीने जणू स्व:ताच संस्था बनून तालुक्यातील गरिबांचा भार खांद्यावर घेतला. सामान्य मानसाच्या सुख:दुख:शी पटकन समरस संवेदना हा भाऊंचा मुख्य गुण म्हणून आज ही त्यांच्याकडे माणसांची रिघ लागलेली असते. माणसं अडी-अडचणी घेऊन येतात, अर्ज देतात चार-चार पानांचे अर्ज भाऊं पूर्ण वाचत असतात. पूर्ण अर्ज वाचून त्या गरिब माणसाला काय मदत करता येते हे ते पाहतील. शिफारस पत्र देतील, फोन करतील, काम होण्यासारखे नसेल तर अरे बाबा हे अवघड आहे हे जमन्यासारखे नाही, राग मानू नको असं सागूण त्याला काम न होता सुद्दा दिलासा देतील. ‘बघतो,’ ‘करतो,’ ‘बघू,’ ‘उद्या या,’ असली लबाडी भाऊंच्याकडे अजिबात नाही. त्यांच्या खिशाला चोरकप्पा नाही, आणि मनाला ही चोरकप्पा नाही. सहसा राजकिय माणसाच्या चेहर्यावर अजिबात नसणारा समजूतदार पणा भाऊंच्या चेहर्यावर उदंड आहे. ह्यात भर शत्रुत्व केलेला माणूस त्यांच्या समोर उभा राहिला तर एका क्षणात ते त्याच्याशी इतक्या अपूलकीने बोलतील की तो शत्रु ही विरघळून जाईल भाऊंच्या बोलण्यात अस्सल ग्रामिण मन आहे. प्रेम करायचं म्हणजे ते उदंड करायचं हातचे राखून करायचे नाही. असा त्यांचा स्वभाव आहे. आणि म्हणून आमदार भाऊंच्याकडे माणसांची रिघ लागलेली आहे.
खरं तर शिराळा तालुक्यात सर्वाधिक विकास दिसून येतो तो भाऊंनी केलेल्या कामाचा. गावोगांव तालमी, आखाडे, पुलांची कामे, रस्त्यांची कामे, देवळांची कामे, एकाद्या शेतकर्याला ट्रॅक्टर घेण्यासाठी, शेतीला बैल घेण्यासाठी पैशाची मदत भाऊंनी वारंवार शेतकर्याला केली. तसेच सार्वजनीक मंडळांना सुध्दा भाऊंनी अर्थिक मदतीचा हात दिला आहे.
आज मानसिंग भाऊंनी स्वत:चे एक वलय तयार केले आहे. अनेक कागरखाने, संस्था यांच्या माध्यमातून तालुक्यातील तरूणांच्या हातातला काम दिले. तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्याला चांगला भाव दिला.
आज कोरोनासारखे संकट असताना प्रत्येक गावात जाऊन तेथिल परिस्थीतीचा आढावा घेतला. तालुक्यात प्रत्येक कंटेन्मेंट झोनला जवळजवळ 2000 चादरी भेट दिल्या, प्रत्येक गावात लोकांची प्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून अल्बम 30 या गोळ्या वाढदिवसाची भेट म्हणून वाटल्या. सरकारी दवाखान्यात जाऊन तेथिल आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. कोरोना काळात सतत तालुका पिंजुन काढणार्या आमदार मानसिंगराव नाईक भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
मनोजकुमार मस्के
9890291065

Comments
Post a Comment