शाहुवाडी तालुक्यातील सोंडोली गावचे सुपुत्र *मा दिलीप कुंभार यांचा आज वाढदिवस*

*वाढदिवस एका मुर्तीकाराचा*
..... ...................... 
✍ *पै अशोक सावंत/पाटील* - सोंडोलीकर

शाहुवाडी तालुक्यातील सोंडोली गावचे सुपुत्र  *मा दिलीप कुंभार यांचा आज वाढदिवस* 

‌दिलीप कुंभार यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला अनेक दशके गरीबीत असणारे हे कुटुंब त्यांचे वडील *आनंदा (पोपट) कुंभार आपल्या गणपती मुर्ती*
 *बनविण्याच्या कौशल्यावर, त्यातुन मिळेल त्या तुटपुंज्या कमाई वर आपला संसाराचा गाडा चालवत होते*, सर्व काही ठिक चालले असताना काळाला याची पर्वा कुठे, आळवावरचा पाण्याचा थेंब कसा अलगद जावा तसा आनंदा  कुंभार नावाचा एक प्रसिद्ध मुर्तीकार देवाने उचलून नेला, आणि एका हाडाच्या मुर्तीकाराला दिलीप पोरका झाला

 या हाडाच्या मुर्तीकारामुर्तीकाराचा मी स्वतः अनुभवलेला किस्सा (आठवण) सांगतो २९ वर्षापुर्वीची गोष्ट..आमचं एक छोटे दुर्गामाता मंडळ होते आम्ही दुर्गामातेची मुर्ती शाहुवाडी तालुक्यातील कापशी या गावात मुर्ती ठरवली आणि घटस्थापनेच्या दिवशी मंडळातील काही कार्यकर्ते मुर्ती आणण्यासाठी गेलो असता आम्हाला त्याठिकाणी मुर्ती मिळाली नाही आम्ही हताश होऊन घरी परतलो आणि आनंदा (पोपट) कुंभार यांच्या घरी गेलो आणि त्यांना आम्ही सर्व हकीकत बोललो, त्यांनी आम्हा मुलांना सांगितले की काही काळजी करु नका मी तुम्हांला पाच ते सहा तासांत मुर्ती बनवुन देतो आणि त्यांनी बोलल्या प्रमाणे आम्हाला वेळेत मुर्ती बनवुन (कलरसहित) दिली आणि त्यानंतर आम्ही त्या मुर्ती ची स्थापना केली अशा या हाडाच्या मुर्तीकाराला सर्व गणेश भक्त, दुर्गामाता भक्त पोरके झाले

 त्यावेळी आपल्या वडिलांच्या जाण्याने वयाने खुप लहान असणारे दिलीप राव  पुरते खचून गेले पण पुन्हा त्याच जोमाने आपल्या वडिलांचा मुर्ती बनवण्याचा व्यवसाय चालू करायचाच हा एकच विचार त्यांच्या मनात घर करु लागला आणि ठराविक कालावधी गेल्यावर *दिलीप कुंभार हे एक पश्चिम महाराष्ट्रातले एक प्रसिद्ध मुर्तीकार म्हणून नावारूपाला आले*, त्याचबरोबर आचारी म्हणून सुद्धा ते पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत
पण हे सर्व करत असताना दिलीप राव यांना बर्याच अडचणी समोर आल्या त्या सर्व अडचणी वर मात करून दिलीप कुंभार हे एक वेगळं नाव त्यांनी आपल्या प्रबळ इच्छाशक्ती च्या जोरावर कमवले आहे 
*अलिकडे काही वर्षापूर्वी त्यांचा मुर्ती बनविण्याचा कारखाना त्यांनी स्वत :च्या गावात उभा केला आहे* आणि इथूनच वर्षाला  हजारो मुर्ती ची महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात  निर्यात केली जाते 
म्हणूनच म्हणतो की त्यांनी अथक परिश्रम आणि प्रबळ इच्छाशक्ती च्या जोरावर त्यांनी शुन्यातून विश्व निर्माण केले आहे

*तसेच ते सोंडोली गावच्या सेवा सोसायटी चे विद्यमान व्हा चेअरमन म्हणून कार्यभार सांभाळत आहेत* 
आणि खासकरून सोंडोली गावचे कुस्ती मैदान यशस्वी पार पाडण्यासाठी त्यांचा खुप मोठा वाटा असतो

अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा आज वाढदिवस आहे त्यांना *कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य* परिवाराकडुन जन्म दिवसाच्या या छोट्याशा शुभेच्छा
••••••••••••••••••••••••••••
धन्यवाद
*पै अशोक सावंत/पाटील* कुस्ती संघटक
*कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य*
शाहुवाडी तालुका अध्यक्ष
९७०२९८४००६

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि आलेला अनुभव*....