Posts

राजकारण गेले चुलीत... कशासाठी भांडताय...महाराष्ट्रातील ‘या’ शेतकऱ्यांना कोणी वाली आहे की नाही?- मधुकर भावे

Image
राजकारण गेले चुलीत... कशासाठी भांडताय... महाराष्ट्रातील ‘या’ शेतकऱ्यांना  कोणी वाली आहे की नाही? - मधुकर भावे पुरोगामी महाराष्ट्रात जाती-जातींमध्ये भांडणे लावण्याचा कार्यक्रम करणारे राजकीय स्वार्थाकरिता भांडत राहिले. कोणीतरी हा खेळ अर्ध्या दाराआडून गंमतीने पहात राहिले. पण, गेल्या २४ तासांत निसर्गाच्या अवकृपेने सर्व जाती-धर्मांच्या कष्टकरी माणसांना आता असे काही झोडपून काढले आहे....  विदर्भ-मराठवाड्यातील सारा शेतकरी उद्धवस्त झाला. अवकाळी पावसाने या शेतकऱ्याचे होत्याचे नव्हते झाले.  हाता-तोंडाशी आलेला घास कोणीतरी दृष्ट शक्तीने ओढून नेला. जवळपास संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा या भागातील कष्टकरी शेतकरी यात भरडला गेला. अक्राळ-विक्राळ निसर्ग जात विचारत नाही. आरक्षण मिळाले का? विचारत नाही... इथं आम्ही एकमेकांच्या उरावर बसण्याइतपत बेफाम झालेलो आहोत. त्यात सरकारात बसलेले मंत्रीही त्यांच्या जबाबदारीचे भान सोडून मैदानात उतरल्यासारखे शड्डू ठोकत आहेत. आणि एका रात्रीत विदर्भातील कापूस पावसाने बरबाद झाला. गेल्यावर्षीच्या कापसाला भाव नाही म्हणून घरात तो कोंबून ठेवला होता. यावर्षी...

वसंतदादांच्या जयंतीनिमत्ताने ‘सहकार’ चिंतन

Image
वसंतदादांच्या जयंतीनिमत्ताने ‘सहकार’ चिंतन मधुकर भावे सोमवार, दिनांक १७ नोव्हेंबर रोजी वसंतदादांची १०६ वी जयंती आहे. त्याच दिवशी महाराष्ट्रात ‘सहकार दिन’ साजरा केला जाणार आहे. १९९२ साली सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांनी दादांच्या जयंतीचा दिवस शासनातर्फे  ‘सहकार दिन’ म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले होते. काही दिवस त्या ‘सहकार दिना’ची आठवण सरकारला राहिली. मग, तीन वर्षे सहकार दिन आणि दादांचाही आठवण राहिली... मग विसर पडला. यावर्षी पुन्हा ‘सहकार दिन’ साजरा होणार आहे. म्हणजे नक्की काय करायचे, हे कोणालाच माहिती नाही. पण, वसंतदादांची त्यानिमित्ताने आठवण होईल, हेसुद्धा खूप झाले! कारण, पवारसाहेबांमुळे यशवंतराव चव्हाण यांची आठवण रोज ताजी असते. पण, दादांना महाराष्ट्र तसा विसरलाच.  दादांची २० वर्षे सेवा करणारे यशवंत हाप्पे हे दादांना विसरले नाहीत. त्यांच्या धडपडीतूनच दरवर्षी जयंती-पुण्यतिथी साजरी होते.  महाराष्ट्राच्या घराघरात सर्वांना आपलेसे वाटणारे वसंतदादा आहेत. वसंत नावापुढे ‘दादा’ हे विशेष नाम दादांनाच शोभून दिसते. ‘दादा’ या शब्दात जो प्रेमळपणा, आपलेपणा,...

खाकी वर्दीतला आपला माणूस सरूड ता. शाहुवाडी येथील नंदुरबार पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांची माणुसकी

Image
खाकी वर्दीतला आपला माणूस सरूड ता. शाहुवाडी येथील नंदुरबार पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील  यांची माणुसकी  खाकी वर्दीतील माणुसकी! अपघातातील मृत पोलीस अंमलदाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, नंदुरबार पोलीस अधीक्षक पीआर पाटील याच्या हस्ते धनादेश सुपुर्द  नंदुरबार जिल्हा पोलीस  दलातील तळोदा पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेले पोलीस अंमलदार मुकेश अशोक सावळे यांचा 18 जुलै रोजी शहरातील आरटीओ कार्यालयाजवळ अपघात झाला होता. या अपघातात मुकेश सावळे यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. मृत पोलीस अंमलदाराच्या कुटुंबासाठी स्वेच्छेने मदत करण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील  यांनी एक कुटुंब प्रमुख म्हणून जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना केले होते. पोलीस अधीक्षकांच्या आवाहनाला जिल्ह्यतील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी प्रतिसाद देत पैसे जमा केले होते. जामा झालेल्या पैशांचा धनादेश पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील याच्या हस्ते मुकेश साळवे यांच्या कुटुंबीयांकडे गुरुवारी (दि.2 नोव्हेंबर) रोजी सुपूर्द करण्यात आला. पोलीस अंमलदार मुकेश सावळे यांचा...

आरक्षण टिकेल, न टिकेल.... निर्णय हा करावाच लागणार आहे!- मधुकर भावे

Image
आरक्षण टिकेल, न टिकेल.... निर्णय हा करावाच लागणार आहे! - मधुकर भावे ‘मराठा आरक्षण’ या विषयाच्या निमित्ताने सध्या महाराष्ट्र गवताच्या गंजीवर आहे.  विषय गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांनी तो गंभीरपणे हाताळलेला आहे. सर्वपक्षीय बैठक बोलावून त्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले.  एकाबाजूला उपमुख्यमंत्री फडणवीस आहेत... दादांनी डेंग्यूच्या निमित्ताने अलगद स्वत:ला बाजूला ठेवलेय... त्यामुळे सगळा ताण येऊन पडलाय तो मुख्यमंत्र्यांवर... सर्वपक्षीय नेत्यांनी एकमताने ठराव केला... ताबडतोब तोडगा निघाला नसला तरी अशा बैठकीत यापेक्षा अधिक काही निर्णय होईल, अशी शक्यता नव्हतीच...  मुख्य दोन प्रश्न आहेत. पहिल्याप्रथम महाराष्ट्रात कायदा, सुव्यवस्था आणि शांतता निर्माण करणे हे पहिले काम...  पोलीस यंत्रणेवर पडलेला ताण कमालीचा आहे. सर्व राजकीय नेत्यांना संरक्षण वाढवावे लागले आहे. ज्यांच्या घराबाहेर पोलीस उभे आहेत... त्यांना बसायचीही व्यवस्था नाही. हे हा ताण पोलीस सहन करून दुसरीकडे मुंबईच्या वाहतुकीची व्यवस्थाही त्यांच्याकडेच आहे. या व्यवस्थेतील पोलीस ‘माणसं’ आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे...

आज शिराळा तहसील कार्यालयावर सकल मराठा समाजाचा मोर्चा

Image
आज शिराळा तहसील कार्यालयावर सकल मराठा समाजाचा मोर्चा मांगरूळ ,  : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणारे मनोज पाटील जरांगे  यांना पाठिंबा देण्यासाठी मांगरूळ येथील मराठा समाजाच्या वतीने शिराळा तहसील कार्यालयावर आज ( दि . 1 ) नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार  . मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 7 दिवसांपासून मनोज पाटील- जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत . तसेच त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून शिराळा तालुक्यातील मौजे मांगरूळ येथील निलेश मस्के पाटील हे तहसिल कार्यालयासमोर आरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन घेऊन जाणार आहेत. मांगरूळ बस स्टॉप येथून सकाळी १०.०० च्या दरम्यान मोर्चाला सुरुवात होईल . यावेळी घोषणाबाजी करत , आपल्या मागण्यांचे फलके हातात घेऊन , टाळ मृदंगाचा गजर करीत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकेल . यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने रहावे असे आव्हान निलेश मस्के पाटील यांनी केले.

मोदीजी पंतप्रधान असतानाच पवारसाहेबांना ‘पद्मविभूषण’ पुरस्कार कोणत्या कारणाने दिला?- मधुकर भावे

Image
मोदीजी पंतप्रधान असतानाच पवारसाहेबांना ‘पद्मविभूषण’ पुरस्कार कोणत्या कारणाने दिला? - मधुकर भावे देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात काही विकासकामांचे लोकार्पण झाले. ‘श्री. शरद पवार हे कृषीमंत्री असताना त्यांनी काय केले?’ असा एक राजकीय प्रश्न या विकास कामांच्या लोकार्पणात पंतप्रधानांनी विचारला. निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी सोडण्याचे लोकार्पण त्यांनी केले. विकासकामांच्या कार्यक्रमात राजकीय विषय पंतप्रधान असलेल्या नेत्याने सहसा आणू नयेत. निवडणुकीच्या भाषणात ते ठीक आहेत. परंतु, श्री. शरद पवार यांच्याबद्दल त्यांनी जो प्रश्न विचारला त्यामुळे महाराष्ट्रात चर्चा होणे स्वाभाविक आहे... कारण, पवारसाहेबांनी कृषीमंत्री असताना काय केले... त्याहीपेक्षा त्यांच्या कृषीमंत्रीपदाच्या काळानंतर २०१७ साली श्री. मोदी पंतप्रधान असताना त्यांच्याच सरकारच्या शिफारशीने राष्ट्रपतींच्या हस्ते श्री. शरद पवार यांना कृषी आणि सहकार क्षेत्रातील प्रभावी कामाबद्दल पद्मविभूषण किताब सन्मानपूर्वक देण्यात आला. याची मोदींजींना कल्पना असेलच... त्यावेळचे राष...

*मांगरूळ येथील एक तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते निलेश मस्के पाटील रविवारी सकाळी उपोषणाला बसणार*

Image
*मांगरूळ येथील एक तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते निलेश मस्के पाटील रविवारी सकाळी उपोषणाला बसणार* श्रद्धेय मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मराठी समाजासाठी अन्न पाणी त्याग करून उपोषण सुरू केले आहे. आमचेही समाजप्रती त्यांना पाठिंबा देणे कर्तव्य आहे.  राज्यसभा असो व लोकसभा असो अशा या राजकारण्यांना आम्ही मराठा समाज गाव बंद आंदोलन आमच्या पातळीवरती करू इच्छित आहे. यामध्ये गावचे स्थानिक पुढारी यांनी पुढाकार घेऊन मराठ्यांच्या पाठीशी उभा राहणे अपेक्षित होते. परंतु तेरी भी चूप मेरी चूप... या भूमिकेचे बरेच जण दिसत आहेत. म्हणूनच मी निलेश मस्के पाटील आपणा सर्वांना आवाहन करतो की मी स्वतः रविवार दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी ठीक नऊ वाजता एक दिवशीय उपोषणाला बसत आहे. मी माझे कर्तव्य पार पाडत असून आपणही आपले कर्तव्य पार पाडावे अशी माझी अपेक्षा आहे. खरतर आंदोलन करताना पाठिंबा देणे गरजेचे असताना  जेणेकरून आमच्या मराठा बांधवांच्या भावना सर्व लोकप्रतिनिधींना समजावे आमच्या मराठा समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक मागासलेपणा दूर होण्यासाठी आम्हाला किंवा आमच्या मुलाबाळांना आरक्षणाची नितांत गरज ...