*परदेशातून मातीत… आणि मातीतून माणसांच्या मनात*
*परदेशातून मातीत… आणि मातीतून माणसांच्या मनात*
शिराळा तालुक्यातील जनसुराज्य पक्षाच्या उमेदवार साईतेजस्विनी देशमुख यांनी जवळपास ४,०७६ मताधिक्यांनी मिळवलेला विजय हा केवळ निवडणुकीचा निकाल नाही, तर तो *जनतेने दिलेल्या विश्वासाचा, प्रेमाचा* आणि स्वीकाराचा कौल आहे.
खरं तर अल्पावधीत परदेशातून थेट मायभूमीत आणि तेही ग्रामीण भागात येऊन इतक्या कमी काळात लोकांच्या मनात घर करणं, ही फार मोठी गोष्ट आहे. हल्लीच्या राजकारणात अशी उदाहरणं विरळच. पण *साईतेजस्विनी देशमुख* यांनी हे करून दाखवलं.
आजोबांचा वारसा आणि आई-वडिलांचा आशीर्वाद या दोन मजबूत पायावर उभी राहून तिने लोकांशी संवाद साधला. मात्र ती केवळ “कोणाची तरी नात” म्हणून उभी राहिली नाही, तर “तुमच्यातलीच एक लेक” म्हणून ती जनतेसमोर आली—आणि हीच तिच्या यशाची खरी गुरुकिल्ली ठरली.
अचानक परदेशातून येऊन, कुठलाही दुरावा न ठेवता, अगदी मनमुराद जनमानसात मिसळणं आजच्या राजकारणात फारसं बघायला मिळत नाही. पण *साईतेजस्विनीचा* तो हसरा, निरागस आणि आश्वासक चेहरा… लोकांशी आपुलकीने बोललेले चार शब्द… जनमानसात जमिनीवर बसून खाल्लेली भाकरी…
या सगळ्या गोष्टी एखाद्या मातब्बर, अनुभवी राजकारण्यालाही लाजवतील अशाच होत्या.
लहान मुलांसोबत मोकळेपणाने खेळणं, वयोवृद्धांच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेणं, महिलांशी मनमोकळा संवाद साधणं—या सगळ्या कृतींमधून तिने संपूर्ण शिराळा तालुक्यातील जनतेला हळूच आपल्या बाजूने वळवलं.
ती ठामपणे म्हणत होती —
“मी सत्तूभाऊंची मुलगी आहे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे मी तुमच्यातलीच एक लेक आहे. मला एक संधी द्या. मी तुमच्यासाठी, इथल्या गरीब आणि सामान्य जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करेन.”
लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून, आरामदायी आयुष्य मागे ठेवून, आपल्या शरीराला उन्हात-पावसात झोकून देत तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी शिराळा तालुक्यात येणं—हे धाडस प्रत्येकाला जमत नाही. राजकारणात येण्यामागे केवळ पद किंवा प्रतिष्ठा नव्हती, तर वडिलांना हातभार लावण्याची इच्छा, त्यांच्या सोबत राहून जनतेची सेवा करण्याचं स्वप्न आणि ग्रामीण भागातील लोकांची जीवनशैली बदलण्याची जाणीवपूर्वक भूमिका होती.
हीच प्रामाणिकता शिराळा तालुक्यातील जनतेने ओळखली. त्यामुळेच जनतेने अतिशय आनंदाने, मनापासून तिचं स्वागत केलं. नेहमी हसरा चेहरा, सामान्य माणसाशी आदराने बोलणं, कार्यकर्त्यांना भाऊ, दादा, काका, आजोबा अशी हाक मारणं—या सगळ्या गोष्टींमुळे “ही आपल्यातलीच आहे” ही भावना लोकांच्या मनात खोलवर रुजली.
आणि म्हणूनच, पहिल्याच टर्ममध्ये शिराळा तालुक्यातील जनतेने तिला भरघोस मतांनी निवडून दिलं.
आज हा विजय जितका आनंदाचा आहे, तितकाच तो जबाबदारीचा आहे. ज्या विश्वासाने, ज्या प्रेमाने आणि ज्या अपेक्षेने जनतेने तिला निवडून दिलं आहे, तो विश्वास कायम टिकवणं हेच खऱ्या अर्थाने पुढचं आव्हान आहे. मात्र तिचा आतापर्यंतचा प्रवास पाहता, ती हा विश्वास केवळ टिकवेलच नाही, तर अधिक मजबूत करेल—याची खात्री वाटते.
भावनिक ओलावा, जमिनीवरची पावलं आणि अभ्यासू दृष्टिकोन असलेलं हे नेतृत्व शिराळा तालुक्यासाठी नक्कीच आश्वासक आहे.
हा विजय केवळ साई तेजस्विनी देशमुख यांचा नाही—
तो शिराळा तालुक्यातील *सामान्य माणसाच्या विश्वासाचा विजय आहे*.
Comments
Post a Comment