शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले
💐 *शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले*
🇮🇳 *15 ऑगस्ट – त्यांच्या कार्याचा आणि प्रेरणादायी नेतृत्वाचा सन्मान*
*मनोजकुमार मस्के, मांगरूळ*
शिराळा तालुक्यातील शिरशी गावाचं नाव राज्यातच नव्हे, तर देशात गाजवणाऱ्या आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून एक नवा आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचं नाव म्हणजे स्मिताताई बापूराव भोसले. आपल्या वारकरी परंपरेचा गाभा मनात कायम राखत, दुबईसारख्या परदेशात पतीसोबत वास्तव्य करूनही मातीतल्या माणसांसाठी झटायचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या स्मिताताईंनी शिरशी गावाला नव्या दिशेने नेण्याचा निर्धार केला… आणि तो आज यशस्वी ठरताना दिसतो आहे.
🌱 *"गाव गाड्याचा रथ हाकताना*..."
परदेशातून गावात परत येऊन सरपंच पदाची धुरा सांभाळणं हे सोपं नव्हतं. गावातील राजकारण, सत्तास्पर्धा, भाऊबंदकी यामधून वाट काढत त्यांनी प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेचं उदाहरण ठेवले.
त्यांनी गल्ल्यांना ऐतिहासिक गडकिल्ल्यांची नावं देऊन गावाला एक नवाच सांस्कृतिक आयाम दिला. नवरात्रीमध्ये महिलांसाठी व्याख्यानमाला, स्त्री आरोग्य जनजागृती, आणि पाण्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी महिलांना पाणी बाटल्या वाटप यांसारख्या उपक्रमांनी त्यांनी गावात आरोग्य आणि साक्षरतेचा नवा उजेड दिला.
👫 *"नेतृत्वाला साथ देणारे कणा*..."
या सगळ्या यशामागे स्मिताताईंच्या अढळ इच्छाशक्तीइतकीच महत्त्वाची भूमिका आहे, ती म्हणजे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या मावळ्यांची.
कोणताही प्रसंग असो, कोणताही अडथळा असो – फक्त एक हाक मारली तरी तत्परतेने धावून येणारे हे सहकारी त्यांना बळ देतात. यामध्ये विशेषत: कृष्णा नलवडे यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.
त्यांची सततची उपस्थिती, कार्यातील सहभाग, आणि ‘ताईंना साथ’ हीच भावना घेऊन त्यांनीही गावकार्यात मोलाचा हातभार लावला आहे.
🔔 *“पाणी प्यावं हे भोंग्याच्या सादेने*..."
गावातील महिलांचं आरोग्य सुधारावं म्हणून त्यांनी एक अभिनव उपक्रम राबवला – ग्रामपंचायतीचा भोंगा दर तासाला वाजवायचा आणि त्यासरशी प्रत्येकाने पाणी प्यायचं!
हे नुसतं एक उपक्रम नव्हे, तर जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या नेतृत्वाचा आदर्श ठरला.
🌳 *"वाढदिवसाच्या निमित्ताने... झाडांना जीवनदान"*
15 *ऑगस्ट – देशाचा स्वातंत्र्यदिन आणि स्मिताताईंचा वाढदिवस*!
या दिवशी त्यांनी 500 झाडांची लागवड करून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या मंत्राने एक पर्यावरण पूरक संदेश दिला. स्वप्नं मोठी आहेत आणि त्या दिशेने त्यांची प्रत्येक पावलं ठामपणे वाटचाल करत आहेत.
🏆 *पुरस्काराचं नव्हे, कार्याचं वेड*!
राज्य आणि देशपातळीवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या स्मिताताई कधीच प्रसिद्धीच्या मागे धावल्या नाहीत. त्यांचं ब्रीद वाक्य नेहमीच एकच –
"आपलं काम भलं, आपण भलं!"
🤝 *सामाजिक कार्यातील मैत्रीतले सूर*...
भाजपचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्या काम करत आहेत. त्याचबरोबर सौ. रेणुकाताई देशमुख यांच्याशी त्यांची मैत्री ही त्यांच्या सामाजिक कार्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते.
✨ *खिसापासून काम करणाऱ्या 'सरपंच ताई*'
सरकारकडून निधी येण्याची वाट न पाहता, स्वतःच्या खिशातून निधी खर्च करून कामं करणाऱ्या स्मिताताई या आजच्या काळात खऱ्या अर्थाने आदर्श सरपंच ठरतात.
🙏 15 *ऑगस्टच्या दिवशी, संपूर्ण गावकऱ्यांच्यावतीने त्यांच्या कार्यास मानाचा मुजरा*!
*शिरशी गावाने एका खऱ्या हिरकणीला सरपंच केलं आहे...
ही हिरकणी गावाला घेऊन जाते आहे प्रगतीच्या कड्यावर*!
🌟 *वाढदिवसानिमित्त स्मिताताईंना हार्दिक शुभेच्छा!
आपल्या कार्याचा प्रकाश असाच पसरत राहो*… 🌺
Comments
Post a Comment