आपल्यातला आपला माणूस.. हाच खरा देव माणूस..
*आपल्यातला आपला माणूस.. हाच खरा देव माणूस..*
शिराळा विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या गटाचा मोठा पॅटर्न लोकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. अनेक जण शिवाजीराव नाईक यांचा गट हा निवडणूक कशी लढाईची ती कशी जिंकायची यामध्ये माहीर असल्याचे बोलले जात आहेत. अनेक ठिकाणी शिवाजीराव नाईक गटाची जणू काही धास्तीच घेतल्याचे चित्रही दिसत आहे. निवडणूक पूर्वी लोकांची कशी मुठ बांधायची, कोणत्या प्रकारे प्रचार करायचा, कशाप्रकारे मतदाराला बाहूक करायचं, आणि मतदार कसा आपल्या सोबत ठेवायचा याचं गणित तंतोतंत शिवाजीराव नाईक यांना माहीत असल्याने या निवडणुकीत शिवाजीराव नाईक गट फोडण्याचे अनेक विरोधकांनी प्रयत्न केले असले तरी सहजासहजी शिवाजीराव नाईक गटातील कार्यकर्ते फोडणे शक्य नसल्याने. बऱ्याच अंशी शिवाजीराव नाईक सांगतील ती पूर्व दिशा मांडणारे कार्यकर्ते असल्याने याचा मोठा फायदा या निवडणुकीत मानसिंगराव नाईक यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्ता नसताना, उद्योग समूह बंद असताना देखील आपला कार्यकर्ता कसा सांभाळायचा आणि तो कसा आपल्या सोबत ठेवायचा हे मात्र माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांना पक्क माहिती आहे. सध्या शिराळा तालुक्यात राजकारणातला तगडा अनुभव म्हटलं तर वावग ठरणार नाही. लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले हे नेतृत्व असल्याचे मानले जात आहे. कार्यकर्त्याचे एखादं काम नाही झालं तरी चालते परंतु कार्यकर्त्याला वेळ देणारा नेता म्हणून शिवाजीराव नाईक यांचं आदराने नाव घेतलं जातं. छोट्या छोट्या कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून त्यावरती काय करता येईल.. याचा सविस्तर अगदी शांतपणे त्याला त्याच्याच भाषेत समजेल असं उत्तर देऊन त्याचं सांत्वन करणारा नेता शिवाजीराव नाईक कार्यकर्त्याला आपलेसे वाटतात. आणि म्हणूनच आपल्या गोड वाणीने आणि सामान्यतल्या सामान्य व्यक्तीच्या खांद्यावर हात टाकून, त्याच्या शेजारी बसून चटणी भाकरी खाणारा हा नेता प्रत्येक गावात पाच-पन्नास कार्यकर्त्यांना नावानिशी हाक मारतो. म्हणूनच तर शिवाजीराव नाईक हे आपल्यातलेच आणि घरातले वाटतात असं अनेक कार्यकर्ते सांगतात.
Comments
Post a Comment