*साहेब...! एक देवमाणूस*...
*साहेब...! एक देवमाणूस*... *लेखन – मनोज मस्के, मांगरूळ, 9890291065* शिराळा तालुक्याच्या मातीतील एक तेजस्वी सूर्य... प्रभावी नेतृत्व, समाजाभिमुख विचार, कार्यकर्त्यांच्या पाठिशी असणारा आधारस्तंभ... चेहऱ्यावर कायमस्वरूपी एक निर्व्याज हास्य असलेला, मनाच्या शुद्धतेने भारलेला नेता – स्व. शिवाजीराव देशमुख साहेब. *आज साहेबांची जयंती आहे... आणि मन भरून येतंय*. जसं आम्हाला एकेकाळी त्यांच्या वाढदिवसाची आतुरतेने वाट बघायची, तशीच आज त्यांच्या जयंतीला त्यांची आठवण प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात दाटून येते. त्यांचे जीवन म्हणजे खरं तर एक प्रेरणास्रोत! एक असा नेता, ज्याने पद, पैसा, प्रतिष्ठा यापेक्षा लोकांचा विश्वास जपला. ज्यांचं नाव घेताना आजही गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर समाधान दिसतं – असं किती जणांबद्दल आपण म्हणू शकतो? शिराळा तालुक्याच्या राजकीय इतिहासात जेव्हा ‘साहेब’ म्हणायचं, तेव्हा ते नाव होतं – शिवाजीराव देशमुख. आजवर महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांना जसे ‘साहेब’ ही आदराची पदवी लाभली, तशीच ती आपल्या देशमुख साहेबांनाही लाभली – ती त्यांच्या माणुसकीच...