*मांगरूळ गावांतील ज्येष्ठ नागरिकांचे आधारस्तंभ हरपले*
*मांगरूळ गावांतील ज्येष्ठ नागरिकांचे आधारस्तंभ हरपले*
*मांगरूळ गावातील, प्रतिष्ठीत व जेष्ठ नागरिक , पांडुरंग साधू खांडेकर (साहेब) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी दिनांक २३ रोजी रात्री १०.०० वाजता निधन झाले. ते ७५ वर्षाची होते. गावातील सामाजिक क्षेत्रात ते नेहमीच पुढाकार घेऊन काम करायचे, अनेक जण त्यांना (आण्णा) म्हणत, काही लोक त्यांना (साहेब) ही म्हणत*..
*अण्णांनी रिटायर झाल्यानंतर आपल्या मूळ गावी मांगरूळ येथे राहायचा निर्णय घेतला. छान असं घर बांधलं, आणि अनेकांना मदत करत गावात चांगलं काम कसं होईल या दृष्टीने ते कार्य करत होते. आण्णांनी गावातील ज्येष्ठ मंडळींना एकत्र घेऊन ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली. ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून अनेक वृद्धांना फायदा कशाप्रकारे देता येईल, या दृष्टीने त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले. अनेक वृद्धांना त्यांनी एसटीचे अर्धे तिकीटपास मिळवून दिले. त्याचबरोबर वृद्धांना असणाऱ्या अनेक सुविधाही त्यांनी मिळवून दिल्या*.
*आण्णा तसे राजकारणी कमी सामाजिक क्षेत्रात त्यांची जास्त धडपड असे. महाराष्ट्र शासनाने चालु केलेली योजना गाव तंटामुक्तीचे ते अध्यक्ष होते. अण्णांचं काम तंटामुक्त समितीच्या माध्यमातून खूपच जोरात चालू होते. अनेक तंटे त्यांनी गावातच मीटविले किंबहुना तंटामुक्त कमिटीला त्यांनी पहिल्या नंबरचं ३ लाख रूपयेचं बक्षीसही मिळवून दिलेलं होतं. आण्णा तसे गगनगिरी महाराजांचे भक्त ते नेहमी खोपोलीच्या गगनगिरी महाराजांच्या मठात जाऊन सेवा करत असे. त्याचबरोबर आण्णा ब्रह्मकुमारी ओम शांतीचेही ज्ञान लोकांना देत असे. दररोज महादेवाच्या मंदिरात आण्णा ओम शांतीची मुरली वाचत बसलेले असायचे*.
*गेली चार वर्षे झाली आण्णा आजारी असल्याने त्यांनी चालू केलेली सर्वच्या सर्व कामे जशीच्या तशी थांबली. आण्णांनी काढलेला ज्येष्ठ नागरिक संघ बंदच झाला, तंटामुक्त कमिटी ही शांत झाली, आणि आज आण्णाही आपणा सर्वांना सोडून गेले.... याचं कारण आण्णांसारखी प्रामाणिक माणसंच उरली नाहीत. समाजातुन चांगली माणसं जातात तेव्हा त्यांच्याबरोबर चांगलं कामही जाते हे मात्र नक्की. अण्णांनी स्वतः समाजसेवा केली त्यांचा समाजसेवेचा वारसा त्यांच्या तीनही मुलांनी आपापल्या क्षेत्रात चालू ठेवला आहे . आण्णांच्या जाण्याने संपूर्ण वृद्ध, तरुण , महिला, बाल या सर्वांनाच दुःख झाले . आण्णा आपल्याला सोडून गेले या घटनेने पत्नी मुलगा अभिजीत, विशाल, मुलगी मिनाताई, सुना, नातवंडे, व संपूर्ण खांडेकर कुटुंबियांवरती दुखःचा डोंगर कोसळला आहे त्या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो तसेच पवित्र आत्म्याला शांती देवो* हीच ईश्वरचरणी प्रार्थना*
*🌹भावपूर्ण श्रद्धांजली* 🌹🙏
*रक्षाविसर्जन गुरुवार दिनांक 25 8 2022 सकाळी दहा वाजता मंगरूळ येथे होणार आहे*
Comments
Post a Comment