*पै मनोज मस्के यांच्या साई निसर्ग पान शॉप या नवीन व्यवसायास सदिच्छा भेट*...

*पै मनोज मस्के यांच्या साई निसर्ग पान शॉप या नवीन व्यवसायास सदिच्छा भेट*...
--------------------
     मांगरुळ गावचे सुपुत्र पत्रकार पै. मनोज मस्के यांच्या *साई निसर्ग पान शॉपला भेट देण्याचा योग आला*.
     मनोज मस्के यांनी शेडगेवाडी - कोकरुड रोडवर मोरवाडी या ठिकाणी त्यांच्याच मेहुण्याच्या साई निसर्ग हॉटेल समोर आपला छोटासा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत शिवाय *येत्या काही दिवसांत पैलवानांचं आवडतं पेय बदामाची थंडाई सुद्धा अल्प दरात उपलब्ध होणार आहे*. 
     मनोज मस्के हे शिराळा तालुक्यातील मांगरुळ गावचे असून ते कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य, शिराळा तालुका अध्यक्ष म्हणून त्यांच्या कडे कार्यभार आहे. अनेक काटेरी वाटेवर मात करून आज पै. मनोज मस्के इथपर्यंत पोहचले आहेत. खूप छान सुंदर असे  वातावरण हॉटेल साई निसर्ग येथे आहे. फॅमिली साठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था ही या हॉटेलमध्ये करण्यात आलेली आहे. कोकरूड शेडगेवाडी मोरेवाडी येथे मुख्य रस्त्यालगत असलेले हे साई निसर्ग हॉटेल अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. उत्कृष्ट शाकाहारी आणि मांसाहारी जेवणासाठी प्रसिद्ध असलेले व जेवणानंतर तोंडाला खमंग असे पान देणारे  त्याच हॉटेल समोर प्रशस्त असे साई निसर्ग पान शॉप या दुकानाची स्थापना झाली आहे, आणि याच्या माध्यमातून *मनोज मस्के एका छोट्याश्या व्यवसायाच्या माध्यमातून आज पुढे येत आहेत*. ग्रामीण भागातील मुलांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा व्यावसाय करावा. असं मनोज मस्के यांचं मत आहे. 

    मांगरुळ गावाबरोबर शिराळा याठिकाणी सुद्धा त्यांचे टुमदार घर आहे. घरातील एकत्र कुटुंबाचे प्रमुख म्हणून मनोज मस्के यांच्या कडे पाहिले जाते. आई वडिलांचा आशिर्वाद आणि दोन छोट्या भावांचा मनोज मस्के यांना पाठींबा आहे. सासु-सासरे,मेहुणे यांचीही मनोजरावांना तितकीच साथ आहे. 
       
    आज छोटासा असणारा हा व्यवसाय उद्या मोठा होणार किंबहुना होईल यात शंका नाही. कारण तेवढं कौशल्य मनोज मस्के यांच्यात आहे.
    आमचे मार्गदर्शक, मित्र पै मनोज मस्के यांना त्यांच्या *पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा*..
   
------------------------
धन्यवाद
*पै अशोक सावंत/पाटील*
      कुस्ती हेच जीवन

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*