Posts

Showing posts from May, 2022

महाराष्ट्र चाॅम्पियन पै. श्री अमर मस्के यांचा आज वाढदिवस पै. अमर मस्के हे सध्या ओडीसा येथे बि एस एफ मध्ये देशाची सेवा बजावत आहेत*.

Image
*महाराष्ट्र चाॅम्पियन पै. श्री अमर मस्के यांचा आज वाढदिवस पै. अमर मस्के हे सध्या ओडीसा येथे बि एस एफ मध्ये देशाची सेवा बजावत आहेत*.           १ जुन १९८५ ही तारीख देशातील अनेकांच्या वाढदिवसाची तारीख मानली जाते. आज अमर मस्के यांचा वाढदिस अमर मस्के यांचे बालपण व शिक्षण हे शिराळा तालुक्यातील मांगरूळ या गावी झाले. घरी आगोदर पासुनच वडीलांच्याकडून कुस्तीचे बाळकडू मिळाल्याने   पै. अमर मस्के यांना लहानपणापासुनच कुस्तीचा नाद आहे. शाळेत शिकत असताना तालुका, जिल्हा विभागीय पर्यंत मजल मारली. त्यानंतर मुंबई शहर येथुन महाराष्ट्र पोलीस मधुन महाराष्ट्राला मिडल दिले . त्यानंतर किर्ती काॅलेज मध्ये किर्ती केसरी मुंबई हा किताब घेतला .         पै. अमर मस्के सध्या बि एस एफ मध्ये देशाची सेवा बजावत आहेत.  बि एस एफ मध्ये  २००८ साली खेळाडू म्हणून ते भरती झाले. कुस्ती मध्ये सलग ११ वर्ष (बि एस एफ ) ला मिडल देणारा हा शिराळा तालुक्यातील एकमेव खेळाडू असावा असं मला वाटते. वडील कुस्ती खेळत , मोठे बंधु कुस्ती खेळत त्यामुळे या घराला कुस्तीचा ...

शाहुवाडी तालुक्याचे दानतदार व्यक्तीमत्व व दत्त सेवा उद्योग समुहाचे संस्थापक मा. *आनंदराव माईंगडे (दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त हा लेख

Image
शाहुवाडी तालुक्याचे दानतदार व्यक्तीमत्व व दत्त सेवा उद्योग समुहाचे संस्थापक मा. *आनंदराव  माईंगडे (दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त हा लेख *....................................................................* *शब्दांकन* :- *मनोज मस्के , पत्रकार* *....................................................................*    खऱ्या अर्थाने शाहुवाडी तालुक्यातील विकासाची माळ गुंफत असताना आनंदराव माईंगडे दादा यांच्या विना ही माळ पुर्णच होऊ शकत नाही हे तितकेच खरे आहे.        कोल्हापुर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यात अत्यंत डोंगराळ भागातील तुरूकवाडी हे दादांचे गाव. याच गावात दादा लहानाचे मोठे झाले. तुरूकवाडी विद्या मंदिर या शाळेत ते शिकले. घरची परिस्थीती तशि बेताचीच असल्याने पुढील शिक्षण त्यांना कामधंदा करत मुंबईत घ्यावे लागले. दिवसभर काम करायचे व रात्री डिलाईलरोड येथे रात्रशाळेत अभ्यास करायचा. तसं दादा परिस्थीती मुळे फार शिकले नाहीत जेमतेम १२ वी पर्यंतच त्यांनी शिक्षण घेतले .  १२ वी नंतर त्यांना जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा बांद्रा  यांचे कार...

विलासराव.. सोलापूर-लातूर प्रवासात आठवले तेवढे...!-

Image
विलासराव.. सोलापूर-लातूर प्रवासात आठवले तेवढे...! - मधुकर भावे आज 26 मे. विलासराव देशमुख यांचा आज 77 वा जन्मदिन. ते आज असते तर त्यांच्या वाढदिवसाचा हा कार्यक्रम केवळ लातुरातच नव्हे, तर महाराष्ट्रात गावागावात साजरा झाला असता. पक्षाच्या पलिकडे जावून सामान्य माणसाने स्वीकारलेले महाराष्ट्राचे हे नेतृत्व होते. त्यांचा चेहरा, त्यांचे वागणे-बोलणे हसणे, कोणाचाही मोबाईलवर (9821125000) फोन आला तर एका क्षणात उत्तर देणे... सगळेच काही विलक्षण होते. माझ्या पिढीला तर असे कधीच वाटले नाही की त्यांची जयंती साजरी करावी लागेल. त्यांचा वाढदिवस साजरा व्हावा, त्यांनी शंभर वर्षे पूर्ण करावीत, अशी मनोमन इच्छा बाळगणारे लाखो चाहते होते. पण नियतीच्या मनात काय असेल याचा पत्ता कोणालाच लागत नाही... ही तर निसर्गाची किमया आहे. जे जन्माला येणार ते कधीतरी जाणारच हे ठरलेलेच आहे. पण अकाली जाणारे इतके चटका लावून जाणाऱ्यात विलासराव, आर. आर. आबा, पतंगराव, गोपीनाथ मुंडे, केंद्रीय नेतृत्त्वात माधवराव शिंदे, राजेश पायलट. त्यात विलासराव आणखी वेगळे व्यक्तिमत्व. या व्यक्तिमत्वाशी मैत्री आयुष्यभर जपून ठेवावी, अशी होती. ...

दत्तसेवा विद्यालय व कुस्ती हेच जीवन आयोजित कुस्ती शिबिराला मा रामदास दिपक पाटील यांच्या कडून पैलवान मुलांसाठी केळी वाटप*...

Image
*दत्तसेवा विद्यालय व कुस्ती हेच जीवन आयोजित कुस्ती शिबिराला मा रामदास दिपक पाटील यांच्या कडून पैलवान मुलांसाठी केळी वाटप*... -----------------------  आज १६ मे काणसा वारणा फौंडेशन चे संस्थापक मा दिपक दादा पाटील यांचे सुपुत्र *श्री रामदास पाटील यांचा आज वाढदिवस आहे*, आणि त्यानिमित्ताने तुरुकवाडी येथे उन्हाळी कुस्ती शिबिराला पैलवान मुलांना खुराकासाठी पंचवीस डझन केळी वाटप केली आहे.    खर्या अर्थाने दिपक दादा पाटील यांचा सर्व परिवार कुस्ती या रांगड्या खेळावर प्रेम करतो. आज रामदास भाऊंचा वाढदिवस अनेक ठिकाणी साजरा केला जातो आहे पण रामदास भाऊंचे चुलते म्हणजे दिपक दादांचे छोटे बंधू युवा सरपंच मा कृष्णा पाटील यांनी सपत्नीक कुस्ती शिबिराला भेट देऊन पैलवानांना खुराक वाटप केले. गेल्याच आठवडय़ात मा दिपक दादा पाटील यांनी सुद्धा कुस्ती शिबिराला भेट देऊन पैलवानांना मार्गदर्शन केले शिवाय त्यांनी सुद्धा खुराक वाटप केले, अशा या दानतदार व्यक्तीच्या माध्यमातून कुस्ती शिबिराला अनेक लोकांच्या माध्यमातून खुराक उपलब्ध होत आहे.   १ मे रोजी कुस्ती तुरुकवाडी येथील *दत्त सेवा परिवाराचे...

शाहूवाडी तालुक्यातील विरळे गावचे सुपुत्र, समाजसेवक मा दिपक (दादा) पाटील देणार तुरुकवाडी येथे उन्हाळी कुस्ती शिबिराला भेट*.....

Image
*शाहूवाडी तालुक्यातील विरळे गावचे सुपुत्र, समाजसेवक मा दिपक (दादा) पाटील देणार तुरुकवाडी येथे उन्हाळी कुस्ती शिबिराला भेट*.....  ....................    काणसा वारणा फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष *मा दिपक दादा पाटील* हे आपला अमूल्य वेळ देऊन तुरुकवाडी येथे दत्त सेवा विद्यालय तुरुकवाडी व कुस्ती हेच जीवन यांच्या वतीने घेण्यात येणार्या उन्हाळी कुस्ती शिबिराला भेट देऊन शिबिरातील युवा मल्लांना मार्गदर्शन करणार आहेत.     कुस्ती वाढवण्यासाठी कुस्ती जपण्यासाठी शाहूवाडी तालुक्यातील या विरळे गावच्या सुपुत्राचे खुप मोठे योगदान असते किंबहुना आहे. स्वतः एक समाजसेवक आहेत. खरोखरच  समाजासाठीच जन्माला आलेल्या, दिपक दादा पाटील यांना महाराष्ट्रातूनच नव्हे तर अनेक राज्यातुन समाजसेवक म्हणून अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. अशा या भुमीपुत्राचा शब्दांचा अनमोल ठेवा युवा मल्लांना मिळणार आहे.  *विषय :  कुस्ती कशी वाढवावी*..  सदर व्याख्यान *कुस्ती हेच जीवन या युट्युब चॅनेल* वर लाईव्ह दिसणार आहे दिनांक 13/ 5/ 2022 सकाळी 9.00 वाजता ----------------------...

तुरुकवाडी कुस्ती शिबिर येथे पै.संपत दादा

Image
  शिराळा तालुक्यातील एक चपळ चित्ता उपमहाराष्ट्र केसरी चिंचोली गावचे सुपुत्र संपत दादा जाधव यांचे परखड व्याख्यान दत्तसेवा विद्यालय तुरुकवाडी कुस्ती शिबिर येथे होणार आहे.   विषय :- *पुर्वीची कुस्ती आणी  अलीकडील काळातील कुस्ती*  सदर व्याख्यान युट्युब चॅनेल वरती लाईव्ह दिसणार आहे दिनांक 11/ 5/ 2022 सकाळी 9.00 वाजता.

तीन शिबिरे... हजारो रुग्ण...!

Image
 तीन शिबिरे... हजारो रुग्ण...! *ज्येष्ठ पत्रकार- मधुकर भावे*  मानवी शरीरशास्त्र अघटित आहे. एक छान वाक्य आहे...  ‘देही आरोग्य नांदते... भाग्य नाही या परते....’ गरिब असो, श्रीमंत असो... व्याधी कोणाला चुकलेल्या नाहीत. प्रत्येकाच्या व्याधींचे स्वरूप वेगळे. पण प्रामुख्याने कंबरदुखी, पाठदुखी, मणकादुखी, सांधेदुखी, गुडगादुखी, हाताला मुंग्या येणे, हे सामान्यपणे जवळपास बहुसंख्य रुग्णांना होणारे आजार... जोधपूरला डॉ. गोवर्धनलाल पाराशर यांच्या रुग्णालयात जावून उपचार घेवून मी १० िमनीटांत ठणठणीत बरा झालो. त्यानंतर गेली १४ महिने पत्रकारितेच्या व्यापात  डॉ. पाराशर यांचे उपचार सामान्य रुग्णांना िमळाल्यानंतर काय फरक पडतो, हे डोळ्यांनी पाहिले. एक वेगळी अनुभती मिळाली. त्यानंतर ३१ जानेवारी २०२१ ला ‘दो अंगुठे की कमाल’ हा लेख महाराष्ट्रभर प्रसारित झाला. हा लेख वाचून हजारो रुग्ण जोधपूरकडे धावले. आतापर्यंत महाराष्ट्रातून जोधपूरला गेलेल्या रुग्णांची संख्या १५ हजारांच्या पुढे अाहे. सर्वांना जोधपूर गाठणे शक्य नाही... खर्चही परवडणारा नाही.... जाणे-येणे आिण तिथे राहणे हाच म...

कुस्ती शिबीर २०२२

Image
*दत्त सेवा विद्यालय तुरूकवाडी व कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शीबीर आज १ मे महाराष्ट्र दिन या दिवशी दुपारी ३.०० वाजता दत्त सेवा विद्यालय तुरूकवाडी मैदानावर भव्य उद्घाटन समारंभ  घेण्यात येणार आहे.  या समारंभाचे प्रमुख पाहुणे जागतीक कुस्तीच्या पदकांचा मानकरी पैलवान राहुलनाना आवारे येणार आहेत तसेच त्यांच्या सोबत अॉलंपीवीर बंडा मामा, आॉलईंडीया चाॉम्पीयन आनंदा धुमाळ सर , उपमहाराष्ट्र केसरी संपत जाधव, पै. कौतुक डफळे ,पांडुरंग पाटील आप्पा व इतर पैलवान मंडळी असणार आहेत. तरी आपण सर्वांनी वेळेत हजर रहावे हि वीनंती*.,.