Posts

Showing posts from April, 2022

पैलवान अशोक सावंत - पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्ती मैदान*

Image
*पैलवान अशोक सावंत - पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्ती मैदान* ***************** कुस्ती हेच जीवन महासंघाच्या मार्गदर्शनाखाली आणि *सोंडोली गावच्या सहकार्याने* सोंडोली ता शाहूवाडी येथे सोमवार दि २ मे २०२२ रोजी दुपारी तीन वाजता *कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य शाहूवाडी तालुका अध्यक्ष पै अशोक सावंत-पाटील* यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.  ...............  ✍️पै मनोज मस्के पत्रकार  *पैलवान अशोकभाऊ सावंत( पाटील)* सोंडोलीकर लाल मातीचा सच्चा ऊपासक....... *वाढदिवसानिमीत्त घेतले कुस्ती मैदान*      आजच्या काळात कुस्ती क्षेत्रातील बरीच मंडळी अशी आहे जी कुस्ती निवृत्तीनंतर कुस्ती क्षेत्राशी काहीही संबंध ठेवत नाही. नोकरी ,ऊद्योग, लहान मोठे व्यवसाय ,शेती, प्रपंच,पैसा, राजकारण ,समाजकारण ,अशा विविध क्षेत्रात सक्रिय होतात.ज्या कुस्तीने आपली समाजात ओळख करून दिली, ज्या लाल मातीने जगवले वाढवले मोठे केले, निरोगी आनी धष्टपुष्ट शरीराची श्रीमंती मिळवून दिली, पैलवान या नावाची चंद्र सुर्य असेपर्यंत राहील अशी बिरुदावली मि...

जय हनुमान कुस्ती संकुल शाहुवाडी संचलीत, कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने

Image
*जय हनुमान कुस्ती संकुल शाहुवाडी संचलीत, कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने* •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• *{ उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण  शिबिर २०२३ }*  •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• जय हनुमान कुस्ती संकुल शाहुवाडी यांच्या वतीने उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शीबीर  घेण्यात येणार आहे. या शिबीराचा मुख्य उद्देश म्हणजे बदललेल्या युगात  आंतरराष्ट्रीय पातळीवर बदललेली कुस्ती . पुर्वीची मैदानी कुस्ती आणी अलीकडील स्पर्धात्मक कुस्ती यातील फरक समजुन घेऊन योग्य दिशा देण्यासाठी व महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुलांना आंतरराष्ट्रीय कुस्तीचे नियम माहित होण्यासाठी हे शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीरासाठी  अनेक अनुभवी प्रशिक्षक असणार आहेत. तसेच मुलांना राहण्यासाठी प्रशस्त रुम , चांगल्या प्रतीचे जेवण, दुध, केळी, थंडाई आदी व्यवस्था वेळच्या वेळी असणार आहे.         खेळण्यासाठी मॅट, मातीचा आखाडा, प्रशस्त ग्राउंड, झोपण्यासाठी स्वतंत्र सुविधा, जेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असल्याने मुलांना आनंदात या शिबी...

गुरुवार दि २८ एप्रिल, २०२२ रोजी पेरीड येथे रंगणार राष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मैदान*...... -----------------------

Image
*गुरुवार दि २८ एप्रिल, २०२२ रोजी पेरीड येथे रंगणार राष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मैदान*......  ----------------------- ✍️ *पै अशोक सावंत पाटील*  --------सोंडोली - - - - - -   शाहूवाडी तालुक्यातील पेरीड या गावात *गोरक्षनाथ देवाच्या यात्रेनिमित्त ग्रामस्थांनी कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे*.    शाहूवाडी तालुक्यातील पेरीड म्हटलं की फक्त एकच गोष्ट लक्षात येते ती म्हणजे पैलवानकीतुन घडलेलं गांव कुस्तीवर श्रद्धा असणारे गाव, राजकीय वारसा लाभलेले गाव या गावाला अनेक वाड्या आहेत कडवी नदीच्या तीरावर वसलेल्या या गावाला सव्वाशे वर्षाची कुस्तीची परंपरा आहे ती आजही कायम आहे. कुस्ती वर प्रेम करणारी अनेक मंडळी या गावात असून वयक्तिक देणगीतून ही मंडळी हे मैदान पार पाडणार आहेत. *खासकरुन देणगीदारांच्या अमूल्य देणगीतून हे मैदान होणार आहे*.   पश्चिम महाराष्ट्रातील पेरीड गावचे हे अग्रगण्य मैदान असून सुंदर संयोजन आणि नियोजन केले जाते. चालु वर्षी आंतरराष्ट्रीय नियमानुसार मातीतील कुस्ती या मैदान मध्ये होणार आहे. ६ मिनिटात कुस्ती निकाली झाली नाही तर कुस्ती गुणावर घेतली...

पेरीड च्या मैदानात नंबर एकला ठरली अव्वल दर्जाची कुस्ती*....

Image
  *पेरीड च्या मैदानात नंबर एकला ठरली अव्वल दर्जाची कुस्ती*.....  ------------------   शाहूवाडी तालुक्यातील पेरीड या गावात २८ एप्रिल रोजी कुस्ती मैदान होणार आहे, आणि या मैदानात महाराष्ट्रातील तगडी कुस्ती ठरली आहे. *चालु वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सातारा याठिकाणी उपमहाराष्ट्र केसरी ठरला तो पै विशाल उर्फ प्रकाश बनकर  विरुद्ध पै महेंद्र गायकवाड पुणे*....    विशाल बनकर हा सोलापूर जिल्ह्य़ातील अकलूज चा पैलवान असून कोल्हापूर येथे गंगावेश तालमीला विश्वास हारुगले सरांच्या कडे सराव करतोय तर महेंद्र गायकवाड हा सुद्धा सोलापूर जिल्ह्य़ातील च पंढरपूर जवळच्या एका छोट्याश्या गावातला असून आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे येथे अर्जुनवीर काका पवार यांच्या कडे सराव करतोय. दोन्ही पैलवान खट्ट आणि काटा जोडीतील आहेत. विशाल बनकर हा अनुभवावे, वयाने, मोठा आहे तर महेंद्र गायकवाड हा वयाने थोडा छोटा आहे पण दोनच वर्षांच जोड तोडीत चाललेला पैलवान आहे.   पेरीड च्या ग्रामस्थांनी ही कुस्ती ठरवून कुस्ती शौकिनांना एक पर्वणीच निर्माण केली आहे. ही कुस्ती काटा होणार यात शंका...

आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राची कुस्ती तुम्हीच वाचू शकता

Image
*आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राची कुस्ती तुम्हीच वाचू शकता*.... *महाराष्ट्राची कुस्ती देशात नेतृत्व करणारी हवी अशी योजना करावी.* ----------------------- ✍️ *मनोजकुमार मस्के* - पत्रकार    नमस्कार खरंच कुस्ती सुधारली का हे माझं आर्टिकल गेल्यावर्षी मी लिहिलं होतं. त्यामध्ये मी म्हणालो होतो की मुलांनी मैदाना पेक्षा स्पर्धा खेळणं खूप गरजेचं आहे. आणि ते खरेही आहे. खरं पाहिलं तर कुस्ती खेळणारे हे अनेक देश आहेत, त्यात महाराष्ट्रात कुस्तीचे बऱ्यापैकी आखाडे भरले जातात. *आज विचार केला तर १६ देश क्रिकेट खेळतात आणि 200 देश कुस्ती खेळतात. तरीसुद्धा भारतात कुस्ती पेक्षा क्रिकेटला जास्त पसंती दिली जाते*.  पूर्वी कुस्तीला मान होता. शिवाय महाराष्ट्रातील मल्लांना देशात विदेशात मान  होता. *ज्या ज्या वेळी दिल्लीवरून पैलवान कुस्तीसाठी महाराष्ट्रात आला त्या- त्या वेळी महाराष्ट्रात मात्र चारी मुंड्या चीत होत होता*, हे कुण्या ज्योतिषाने सांगायची गरज नाही. महाराष्ट्राच्या मल्लांनी देशात नव्हे तर विदेशात सुद्धा कुस्ती मध्ये चांगलं नाव केलेलं होतं. महाराष्ट्राच्या पैलवानाची भीती दिल्...

नाशिकच्या काळाराम मंदिरात जातो तेव्हा...!

Image
मधुकर भावे- प्रख्यात कवी ना. धो. महनोर यांच्या कवितेतील दोन ओळींचा उल्लेख मुद्दाम करतो... त्या ओळी अशा आहेत की,  कोणती पुण्ये येती फळाला जोंधळ्याला चांदणे लगडून जावे.... नाशिक येथील श्री. काळाराम मंदिर संस्थानच्या वासंितक नवरात्र महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला संस्थेचे आमंत्रण आले. नािशकचे माझे मानसपूत्र श्रीकांत बेणी यांनी हे नाव सुचविले असावे... महाराष्ट्राच्या अनेक गावांत अशी माझ्यावर मनापासून प्रेम करणारी अनेकजणांची नावे आहेत. नािशकला श्रीकांत बेणी, संगीता बेणी, पुण्याला सचिन ईटकर, सपना ईटकर, सचिन सगरे, रवी डोमाळे, कराडला जगदीश पाटील, अकोल्याला सुभाष गादीया,  अमरावतीला विलास मराठे, नागपूरला बाळ कुलर्णी, साधना कुलकर्णी, शिराळ्याला मनाेज मस्के, संदीप पवार अशांनी त्यांच्या त्यांच्या गावात गेले की, अनेक वर्षे मला काळजीपूर्वक जपले आहे. यासाठीसुद्धा कोणतेतरी पुण्य कामी यावे लागते. बापाला जेवढे जपावे, तेवढ्या प्रेमाने जपले आहे. मुंबईच्या बाहेर कार्यक्रमासाठी पडले की, याचा प्रत्यय येतो... मुंबईत माझा चालक तेजस साळेकर हाही असाच. वडिलांची काळजी घ्याची तसा काळजी घेणारा....