पेरीड च्या मैदानात नंबर एकला ठरली अव्वल दर्जाची कुस्ती*....

 

*पेरीड च्या मैदानात नंबर एकला ठरली अव्वल दर्जाची कुस्ती*..... 
------------------
  शाहूवाडी तालुक्यातील पेरीड या गावात २८ एप्रिल रोजी कुस्ती मैदान होणार आहे, आणि या मैदानात महाराष्ट्रातील तगडी कुस्ती ठरली आहे. *चालु वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सातारा याठिकाणी उपमहाराष्ट्र केसरी ठरला तो पै विशाल उर्फ प्रकाश बनकर  विरुद्ध पै महेंद्र गायकवाड पुणे*.... 
  विशाल बनकर हा सोलापूर जिल्ह्य़ातील अकलूज चा पैलवान असून कोल्हापूर येथे गंगावेश तालमीला विश्वास हारुगले सरांच्या कडे सराव करतोय तर महेंद्र गायकवाड हा सुद्धा सोलापूर जिल्ह्य़ातील च पंढरपूर जवळच्या एका छोट्याश्या गावातला असून आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे येथे अर्जुनवीर काका पवार यांच्या कडे सराव करतोय. दोन्ही पैलवान खट्ट आणि काटा जोडीतील आहेत. विशाल बनकर हा अनुभवावे, वयाने, मोठा आहे तर महेंद्र गायकवाड हा वयाने थोडा छोटा आहे पण दोनच वर्षांच जोड तोडीत चाललेला पैलवान आहे.
  पेरीड च्या ग्रामस्थांनी ही कुस्ती ठरवून कुस्ती शौकिनांना एक पर्वणीच निर्माण केली आहे. ही कुस्ती काटा होणार यात शंका नाही यासंह अनेक काटा कुस्त्या होणार आहेत. 
  पेरीड गावचा हा कुस्ती आखाडा १५ ते २० हजार लोकं बसतील आणि त्यांना कुस्ती आरामात दिसेल असा बांधीव आखाडा आहे. 
पेरीडच्या या ऐतिहासिक कुस्ती मैदानात नंबर एकला हे दोन्ही मल्ल लढणार आहेत. तर बघुया या पेरीड च्या मैदान मध्ये कोण विजेता ठरतोय.... *पश्चिम महाराष्ट्रातील सर्व कुस्ती शौकिनांच्या या कुस्तीकडे नजरा लागल्या आहेत*.
  -------------------------
धन्यवाद
*पै अशोक सावंत-पाटील*
कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य
अध्यक्ष शाहूवाडी तालुका

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*