नाशिकच्या काळाराम मंदिरात जातो तेव्हा...!

मधुकर भावे-
प्रख्यात कवी ना. धो. महनोर यांच्या कवितेतील दोन ओळींचा उल्लेख मुद्दाम करतो... त्या ओळी अशा आहेत की, 
कोणती पुण्ये येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे....
नाशिक येथील श्री. काळाराम मंदिर संस्थानच्या वासंितक नवरात्र महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला संस्थेचे आमंत्रण आले. नािशकचे माझे मानसपूत्र श्रीकांत बेणी यांनी हे नाव सुचविले असावे... महाराष्ट्राच्या अनेक गावांत अशी माझ्यावर मनापासून प्रेम करणारी अनेकजणांची नावे आहेत. नािशकला श्रीकांत बेणी, संगीता बेणी, पुण्याला सचिन ईटकर, सपना ईटकर, सचिन सगरे, रवी डोमाळे, कराडला जगदीश पाटील, अकोल्याला सुभाष गादीया,  अमरावतीला विलास मराठे, नागपूरला बाळ कुलर्णी, साधना कुलकर्णी, शिराळ्याला मनाेज मस्के, संदीप पवार अशांनी त्यांच्या त्यांच्या गावात गेले की, अनेक वर्षे मला काळजीपूर्वक जपले आहे. यासाठीसुद्धा कोणतेतरी पुण्य कामी यावे लागते. बापाला जेवढे जपावे, तेवढ्या प्रेमाने जपले आहे. मुंबईच्या बाहेर कार्यक्रमासाठी पडले की, याचा प्रत्यय येतो... मुंबईत माझा चालक तेजस साळेकर हाही असाच. वडिलांची काळजी घ्याची तसा काळजी घेणारा... .प्रशांत कुलकर्णी, मोहिनी कुलकर्णी.... हे ठाण्यातले. नाती कशी िनर्माण होतात आिण िटकतात... याचे उत्तर िमळत नाही. पण नाती िनर्माण होतात आिण या सर्वांनी हे नाते जपले आहे. मी त्यांच्याकरिता काहीच केलेले नाही. माणसं एकमेकांवर प्रेम करताना कारण लागत नाही. त्याचा प्रत्यय अशा नात्यांतून येतो.... काही नाती िटकतात... काही रंग बदलतात... जसे झाडं रंग बदलतात तसे... 
.....तर सांगत होतो..... नािशकच्या काळाराम मंदिराच्या कर्यक्रमाचे...रामनवमीपर्यंत हा उत्सव ९ दिवस असतो. गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाला त्या संस्थानाने माझे भाषण ठेवले होते. पण सांगितले होते की... ‘राजकारणावर बोलायचे नाही....’ मग कशावर बोलायचे? त्यांनी विषय िदला ‘राम’. मी त्यात बदल करून विषय कळवला.... ‘राम राम मंडळी...’ कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. नािशकचे प्रमुख  जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. अभयजी वाघवसे. पूर्वी ते आमच्या रायगड िजल्ह्यात सत्र न्यायाधीश होते. आता नािशकला आहेत. काळाराम संस्थानचे अध्यक्ष आर. आर. राठी आहेत. तेही अतिरिक्त सत्र न्यायाधीश आहेत. विश्वस्त मंडळात दहा सदस्य आहेत. त्यात दत्तप्रसाद िनकम, धनंजय पुजारी, डॉ. एकनाथ कुलकर्णी असे प्रमुख आहेत. कार्यक्रमाचे िनयोजन छान असते. समोर श्रोत्यांमध्ये िदग्गज रसिक होते. रामभक्त होते आिण बाजूला काळाराम मंिदर होते. हे मंदिर ५०० वर्षांपूर्वी बांधले. पेशव्यांनी सुरुवात केली, असा संदर्भ मिळतो. अख्खे मोठे दगड ज्याला म्हणतात... ते त्ाासून त्यातून हे संुंदर िशल्प तयार झाले... ५०० वर्षे झाली... एकही चिरा अजून हललेला नाही. (मी १९८० साली कलिना येथे रहायला गेलो... ४० वर्षांनंतर आमची इमारत एवढी मोडकळीला आली की, ती आता पुनर्वसनासाठी गेली. फक्त ४० वर्षांत... ज्यांनी काळाराम मंिदर बांधले असेल ते कारागिर िकती महान असतील. मंदिरात एक थेंबही पाणी गळत नाही. १५० वर्षांपूर्वी बांधलेले व्ही. टी. स्टेशन आजही िकती मजबूत आहे. आपल्या हौिसंग बोर्डाने बांधले असते तर पावसाळ्यात िकती िठकाणी बादल्या ठेवाव्या लागल्या असत्या. जुन्या काळी साधनं नसताना या मंडळींनी कामं कशी उभी केली असतील... छत्रपती िशवाजी महाराजांनी समुद्रात िकल्ले बांधले... काय स्थापत्य शास्त्र असेल.  सगळं काही थक्क करणारे आहे. आिण आज ती गुणवत्ता लोप पावल्यासारखी आहे.) 
राम हा विषयच समाजाच्या मनात ५००० वर्षे आहे... श्रद्धेने आहे. रामायण आण महाभारत या दोन ग्रंथांनी देश व्यापून टाकलेला आहे. त्यात रामायणाचा प्रभाव अधिक आहे. 
रामानंद सागर यांनी ‘रामायण’ मालिका टी. व्ही. वर सुरू केली तेव्हा दर रविवारी सकाळी ९ ते १० रस्ते सुनसान होते. एकदा गंमत झाली. वसंतदादा मुख्यमंत्री होते... नािशकचेच काही लोक त्यांना एका कार्यक्रमासाठी बोलवायला आले. दादांनी ते आमंत्रण घेतले.... मंडळी बाहेर पडली आिण दादांच्या लक्षात आले की, तो िदवस रविवार आहे. दादांनी यशवंत हाप्प्ो यांना सांिगतले की, ‘अरे, त्यांना परत बोलावून आण...’ ती मंडळी आली... दादा म्हणाले, ‘अरे, बाबा मला येता येणार नाही... कारण सकाळी रामायण आहे...’ रामायण मालिकेचा प्रभाव िकती होता... याचे हे उदाहरण आहे. म्हणजे हा रामाचाच प्रभाव. िशवाय मालिका करणारेही त्यांचे नावही रामानंद. त्यात राम आहेच. 
  रामाच्या या महान लोकप्रियतेमुळे भाजपा या हुशार राजकीय पक्षाने गेली ४० वर्षे प्रभू रामचंद्राला राजकारणासाठी पुरवून पुरवून वापरले. त्याचा त्यांना फायदाही झाला. परंतु ‘राम’ ही राजकीय वस्तू नाही हे खरेच. मला सांगण्यात आले की, ‘राजकारणावर बोलू नका.....’ सुरुवात करतानाच मी सांगितले... ‘राजकारणावर बोलायचे नाही... तर रामायणावर कसे बोलता येईल...? राजकारणाची सुरुवात रामायणापासूनच झाली....’ श्रोते आ वासून बघत राहीले. आता मी काय बोलतोय.... मग हळूच समिकरण मांडले.... असे बघा.... ‘रावणाच्या पार्टीतून िबभिषण रामाच्या पार्टीत दाखल झाला.... म्हणजे राजकारण आलेच....’ आिण पुढे सांिगतले की,... ‘नुसते राजकारण नाही.... तर एक पार्टी सोडून दुसऱ्या पार्टीत गेल्यावर अालेल्याला काहीतरी द्यावे लागते, प्रभू रामचंद्रांनी याची जाणीव ठेवून िबभिषणाला लंकेचे अख्खे राज्य देवून टाकले. केवळ एक मंत्रीपद िदले असे नाही.  राजकारणाची सुरुवात रामायणापासून झाली...’ आिण हे मी सांगतो असे नव्हे... तुलसीदासजींच्या ‘रामचरितमानस’ या १३१४ साली लिहिलेल्या ग्रंथात तुळशीदासजींनीच सांगून टाकले आहे... 
‘ क्या रघुनाथजी, तेरा खेल...
िबभिषण को िमली लंका....
हनुमानजी को तेल....’
प्रभू रामचंद्रांबरोबर शक्तीने-युक्तीने जो राहिला त्या हनुमानाला शनिवारी अर्धीवाटी तेल आिण रावणाची पार्टी सोडून आलेल्याला लंकेचे अख्खे राज्य असा याचा अर्थ.... आिण तो अर्थ तुळशीदासजींनी सांिगतला... म्हणजे राजकारण रामायणात हाेतेच आिण ते असायलाच हवे. िजथे युद्ध होतात तिथे दोन पक्ष असतात... आिण जिथे दोन पक्ष असतात तिथे राजकारण असतेच... 
‘रामायण’ हा २४००० श्लोकांचा असा ग्रंथ आहे की, ज्याचे गारूड या देशात गावागावात आहे. रामकथा म्हटली की, गर्दी आलीच. रामसप्ताह म्हटला की, गर्दी असणारच... बोलणारा वक्ता कोण.... याला महत्त्व नाही. ‘राम’हाच मुख्य नायक. नािशकच्या काळाराम मंिदरात भाषण चालू असताना अितशय शांतपणे श्रोते बसले होते. आिण तेवढ्याच शांततेत हजार माणसांची रांग दर्शनाकरिता चालूच होती. ‘राम नाम’ या शब्दातच मोठे सामर्थ्य आहे. प्रसन्न सकाळ झाली रे झाली की समोर दिसलेल्याला ‘राम-राम’ म्हणण्याची सुरुवात ज्यांनी कोणी केली... त्याला हे सूत्र बरोबर सापडले. राम कथा अनेक कथांना जन्म देवून गली. अनेक कवींना काव्यांचा विषय पुरवून गेली. रामावर िकती गाणी असतील... अगणित.... ग. दि. मांसारख्या महाकवीलाही अख्ख ‘गीत रामायण’  राम या विषयावरच लिहिता आले... एवढा हा विषय मोठा. आिण कवी वालि्मकींनी तो अितशय हुशारीने, बुद्धीमत्तेने असा काही रंगवला की, त्याची गोडी अवीट आहे. मग तुळशिदासजींचे ‘रामचरितमानस’, कालिदासांचे ‘रघुवंश’, भास आिण भवभूती यांच्या रामकथा... हा विषय असा अनेकांना पुरून उरला आहे. वाल्मिकेचे रामायण ५००० वर्षे मनात गारूड करून आहे. रामायणातील अनेक पात्रे विवाद्य आहेत किंवा वाल्मिकीने काहींवर अन्यायसुद्धा केला. खुद्द रामाने तो स्वत: नायक असताना, रामायणाची मुख्य नायिका सीता हिच्यावरही अन्यायच केला. पण बुद्धीमान सीता... ितच्यामध्ये स्त्रि्त्वाच्या सहनशीलतेचे अनेक गूण दाखवले आहेत. बुद्धीमत्ताही दाखवली आहे. ती कुठे िशकली, कोणाला मािहती नाही. जनकाला शेत नांगरताना ती िमळाली. नांगराचा फाळ एका पेटीला लागला. त्यात हे बाळ सापडले... म्हणून नाव सीता.... जनकाची खरी कन्या उर्मिला.... ितच्यावर सगळ्यात मोठा अन्याय झाला. जनकानेही केला आिण वालि्मकेने केला. रामाने तर फारच केला. पण तिने ‘बंडखोरी’ केली नाही. त्या काळाला अनुरूप ितचे वागणे.... तिचे चारित्र्य आहे. रामायणातील सर्वांत उपेक्षित उर्मिला आहे. तसे म्हटले तर दशरथाची पहिली पत्नी कौसल्या ‘पट्टराणी’ असे बिरूद असताना उपेक्षितच आहे. कौसल्येची सवत असलेली कैकयी ही दशरथाला पूर्णपणे ताब्यात घेवून आहे. आिण ितचे डोकं मंथरेने खराब केले आहे. मंथरा ही ितची दासी आहे. िकंवा आजच्या काळात ‘खासगी सचिव’ म्हणा... अनेक मंत्र्यांचे खासगी सचिव आजही मंथरेच्या भूमिकेत असतात. तारा आिण मंदोदरी ही दोन पात्रे वेगळ्या कारणाने रामायणात ठळक झाली आहेत. एक वालीची पत्नी आहे आिण दुसरी रावणाची पत्नी आहे. पण त्यांना प्रात:स्मरणात जागा िमळाली आहे. आिण उर्मिला मात्र प्रात: स्मरणापासून दूर राहिलेली आहे. आजही उर्मिलाची चर्चा कधी होत नाही. पण १८७० सालात भरतपूर येथे (राजस्थान) राजा बलवंतसिंगाने उर्मिलेचे मंदिर बांधले. उर्मिलेला उपेक्षित ठेवल्याची जाणीव या देशातील एका तरी पुरुषाला झाली आिण वाल्मिकींनी अन्याय केलेल्या उर्मिलेला काहीसा न्याय भरतपूरच्या राजाने िदला, असे म्हणता येईल. 
रामायणातील अनेक चरित्र नायकांमध्ये हनुमान हा ही जनतेच्या मनात ५००० वर्षे आहे. रामाची मंिदरे जशी गावागावात आहेत, तशी हनुमानाचीही मंदिरेे आहेत. हनुमान हे शक्तीचे प्रतिक आहे. स्वाभािवकच बुद्धीचे प्रतिक त्याला म्हणता येत नाही. पण त्याच्या बुद्धीची चुणूक त्याने एकाच कामाने दाखवून दिली... वाल्िमकी रामायणात प्रसंग आहे... लक्ष्मण युद्धात बेशुद्ध होतो तेव्हा एका डोंगवरील संजीवनी वनस्पती आणायला ऋषीमुनी हनुमानाची योजना करतात... वायुवेगाने हनुमान तो डोंगर शोधतो... पण त्याला संजीवनी वनस्पती सापडत नाही... भाषणाच्या ओघात एक विचार मांडला की, ‘समजा.... माझ्यासारख्या एका सामान्य बुद्धीच्या माणसाला, वनस्पती आणायला ऋषींनी पाठवले असते.. आिण मला वनस्पती िमळाली नसती तर मी रिकाम्या हाताने परत आलो असतो... आिण प्रांजळपणे सांिगतले असते... ‘सगळीकडे शाेधलं.... पण िमळालं नाही बाबा... काय करू... परत आलो....’ हनुमानाच्या बुद्धीमत्तेची कल्पना नेमकी इथंच येते. त्याला संजीवनी वनस्पती सापडली नाही... पण तो िरकाम्या हाताने परत आला नाही... अख्खा डोंगर त्याने उचलून आणला... युद्धभूमीवर ठेवला... गुरुवर्य आिण वैद्यांना सांिगतले... ‘वनस्पती काही िमळाली नाही... मी अख्खा डोंगर आणला.... आता संजीवनी वनस्पती तुम्ही शोधा...’ रमायणातील हा प्रसंग केवळ रोचक नाही... तर एक कामगिरी सोपवल्यवर ती िकती अचूक करण्याची बुद्धी असावी लागते... त्याचे हनुमान हे उदाहरण आहे. आजच्या काळात कामासाठी जावून िरकाम्या हाताने परत येणारे असे िकतीतरी जण असतील... 
शबरी हे असेच एक छान पात्र आहे. शबरी म्हणजे... िभल्लाची मुलगी... अापल्या महाराष्ट्रातील गडचिरोली िजल्ह्यात या ‘शबर’ जातीचे म्हणजे, भिल्ल जातीचे काही वंशज इटापल्ली भागात होते. शबरची मुलगी म्हणून तिचे नाव शबरी... ती सहाव्या वर्षी घरातून पळून गेली... कारण ितच्या लग्नात बकरीच्या छोट्या छोट्या बछड्यांना कापून ते मांस पाहुण्यांना जेवू घालणार होते. या लहान वयात तिला ही गोष्ट सहन झाली नाही. ती मातंग ऋषींच्या आश्रमात जावून राहिली.  मातंग ऋषींनी ितला सांिगतले की, ‘राम तुझा उद्धार करणार आहे....’ ती रामाची वाट पाहते आहे.... राम आल्यानंतर त्याला काय खायला द्यायचे.... रोज वनात िफरून ती ताजी फळे अाणते आहे. बोरं आणते आहे... चाखून पाहते आहे... आिण एका छान पत्रावळीच्या द्रोणात फळं भरून ठेवते आहे. त्याकाळात फ्रिज नव्हते. ितने िकती बुद्धीमत्तेने, ती फळं खराब होणार नाहीत, याची काळजी घेवून रामाकरिता जपून ठेवली आहेत. वाल्िमकीने ही अशी जी पात्रे रंगवली.... ती फार विलक्षण आहेत. ितला रामापासून काही िमळणार नाही... काही मागायचेही नाही. पण रंगवलेल्या या पात्रांची रामनिष्ठा विलक्षण आहे. रामाच्या भोवती जमलेल्ो सगळे असे िनष्ठेचे आहेत. त्यांना स्वत:ला काही मागायचे नाही... त्यापैकी कोणीही काही मागितलेले नाही. उपेक्षा वाट्याला आल्यानंतरही रामभक्तीत अंतर पडलेले नाही. 
सीतेची रामावरची िनष्ठा तर विलक्षण आहे.  हनुमान अशोक वनात गेल्यानंतर तो सीतेला घेवून येवू शकला असता... तसा विचार त्याने बोलावून दाखवला... पण सीतेने िदलेले उत्तर िवलक्षण आहे.... ितने सांिगतले... ‘प्रभू रामचंद्रांनी येवूनच माझी सुटका केली पाहिजे.’ सुटकेकरिता ती अधीर अाहे, असे तिने दाखवलेले नाही... आिण वालि्मकीने तसे चित्रणही केलेले नाही. जर वायूपुत्र हनुमान अशोकवनातून सीतेला घेवून येतो, असे कथानक वालि्मकेने िचत्रीत केले असते तरी, त्यावर लोकांचा विश्वास बसला असता. पण त्यात सीतेचे मनोबल िचत्रीत झाले नसते. 
रामायणात असे अनेक प्रसंग आहेत. आजच्या काळात रामायणाचा संदर्भ लक्षात घेतला तर ज्या मंडळींनी राजकारणाकिरता राम वापरला.... त्या मंडळींना रामाच्या काेणत्याच गुणाचे काहीही पडलेले नव्हते. निष्ठा नावाच्या गाेष्टीचा आिण त्यांचा काही संदर्भ नाही. अपल्याला काही िमळाले की, िनष्ठा... आिण जर काही राजकीय लाभ मिळाला नाही तर... नि...स...टा.... आजच्या राजकारणात सर्व पक्षातील लोकांना हा िसद्धांन लागू आहे. आिण तो त्यांच्या आवडीचाही आहे.  आजचे सगळे राजकारण पुराण, इितहास, भुगोल त्या काळातील महान व्यक्ती यांचा आपल्याला जेवढा उपयोग आहे... तेवढ्या पुरतेच त्यांना वापरायचे आहे आिण वापरून झाल्यानंतर फेकून द्यायचे आहे. रामरायालाही पुरवून पुरवून वापरले. वालि्मकीने रामाला देव मानले नाही... मनुष्यच मानलं... पण त्यांच्या हातून काही चुका झाल्या... अनेक सद् गुण होते. म्हणून वाल्िमकेने त्याला देवत्व िदलेले नाही. रामायणानंतर रामाला देवत्व प्राप्त झाले. आिण ‘राम नाम’च शेवटी ‘सत्य’ ठरले. 
रामायण आिण महाभारत आिण त्या महाभारतातील गीता हे आपले तीन मोठे ग्रंथ. जगात िहंदू-धर्म असा धर्म आहे की, ज्या धर्माला ‘धर्मग्रंथ’ नाही. जसे िख्रश्चनांचे ‘बायबल’, मुिस्लम धर्माचे ‘कुराण’.. तसा आपला अधिकृत धर्मग्रंथ नाही. आजच्या परिभाषेत तर अापली घटना हाच या देशाचा धर्मग्रंथ होवू शकतो. इतके तिचे पािवत्र्य आहे. कारण ती घटना सर्व धर्मांकरिता आहे.  पण िहंदू धर्मात गीता या ग्रंथाला धर्मग्रंथा एवढे महत्त्व आहे. कोर्टमध्ये शपथ घेताना गीतेवरच हात ठेवून शपथ घ्यावी लागते. तो हात ठेवून जी शपथ घेतली जाते.... ती िकती खरी असते. हे ज्याचे त्याला मािहती... कोर्टातील न्यायाधीशांनाही जाणीव असते की, साक्षीदार शपथ घेतो आहे... त्यातल्या िकती खऱ्या शपथा आहेत आिण िकत्ाी खोट्या.... खरे-खोटे दोघांनाही मािहती आहे. आिण शपथ कार्यक्रम चालूच आहे. तर अशी ही गीता श्रीकृष्णाने युद्धभूमीवर अर्जुनाला सांिगतली... १८ अध्याय आहेत. शेवटच्या अध्यायात खुद्द श्रीकृष्णाने अर्जुनाला विचारले... ‘माझे अध्याय संपले... आता १८ अध्यायानंतर तुला ज्ञाान झाले का?...’ अर्जुनाने स्पष्ट उत्तर िदले... ‘मला ज्ञाान झालेले नाही... ’ श्रीकृष्ण विचारतात... ‘अरे, मी एवढा खटाटोप करून गीता सांिगतली..., तुला ज्ञाान कसं झालं नाही.’ अर्जुन सांगतोय,... ‘ज्ञाान झालं नाही पण माझा मोह दूर झाला.... (मोहंम ् विगतो जाना: )’ त्यामुळे सर्व गीता भाष्यकारांनी ‘मोह दूर होणे म्हणजेच अज्ञाान दूर होणे’, असा अर्थ काढला... श्रीकृष्णाने प्रश्न विचारला होता... ‘ज्ञाान झाले का?’ त्या प्रश्नाचे उत्तर ना अर्जुनाला देता आले... ना भाष्यकारांना देता आले... त्यामुळे गीतीचा ज्ञाानाशी असलेल्या संदर्भाशी उत्तर कोणालाच मिळत नाही. रामायणाचे तसेच आहे. रामाचा िकतीही वापर केला तर खरा राम कोणाला कळला, याचेही उत्तर मिळत नाही. 
- मधुकर भावे

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*