गुरुवार दि २८ एप्रिल, २०२२ रोजी पेरीड येथे रंगणार राष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मैदान*...... -----------------------
*गुरुवार दि २८ एप्रिल, २०२२ रोजी पेरीड येथे रंगणार राष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मैदान*......
-----------------------
✍️ *पै अशोक सावंत पाटील*
--------सोंडोली - - - - - -
शाहूवाडी तालुक्यातील पेरीड या गावात *गोरक्षनाथ देवाच्या यात्रेनिमित्त ग्रामस्थांनी कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे*.
शाहूवाडी तालुक्यातील पेरीड म्हटलं की फक्त एकच गोष्ट लक्षात येते ती म्हणजे पैलवानकीतुन घडलेलं गांव कुस्तीवर श्रद्धा असणारे गाव, राजकीय वारसा लाभलेले गाव या गावाला अनेक वाड्या आहेत कडवी नदीच्या तीरावर वसलेल्या या गावाला सव्वाशे वर्षाची कुस्तीची परंपरा आहे ती आजही कायम आहे. कुस्ती वर प्रेम करणारी अनेक मंडळी या गावात असून वयक्तिक देणगीतून ही मंडळी हे मैदान पार पाडणार आहेत. *खासकरुन देणगीदारांच्या अमूल्य देणगीतून हे मैदान होणार आहे*.
पश्चिम महाराष्ट्रातील पेरीड गावचे हे अग्रगण्य मैदान असून सुंदर संयोजन आणि नियोजन केले जाते. चालु वर्षी आंतरराष्ट्रीय नियमानुसार मातीतील कुस्ती या मैदान मध्ये होणार आहे. ६ मिनिटात कुस्ती निकाली झाली नाही तर कुस्ती गुणावर घेतली जाणार आहे. *मैदानी कुस्तीतील गतीमानता वाढवण्यासाठी पेरीडकरांनी हा निर्णय घेतला आहे*.
कोरोणा मारीमुळे गेली दोन वर्षे कुस्ती मैदान झाली नाहीत,गोरक्षनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्ती मैदान भरवून *महाराष्ट्रातील पैलवान मुलांना पेरीडकरांनी प्रोत्साहित केले आहे*.
याच गावातील जुन्या काळातील सुप्रसिद्ध पैलवान, ज्यांना या पैलवानकीतुनच आपले आयुष्य पालटून समाजामध्ये एक *आदराचे नाव दिले ते म्हणजे डी वाय एस पी पै बाजीराव पाटील पेरीडकर*, पोलीस खात्यातील राष्ट्रपती पदक मिळाले ते म्हणजे *पै बाजीराव पाटील साहेब पेरीडकर*....
त्याचबरोबर पैलवानकीतुच राजकीय क्षेत्रात आपली छाप पाडली, जिल्हा परिषदेचे सदस्य, जिल्हा बॅंकेचे मा संचालक मा बाजीराव पाटील यांचे छोटे बंधू *मा सर्जेराव पाटील दादा.... खरंच खूप मोठे काम आहे त्या व्यक्तीचे.. भागातील अनेक कुस्ती मैदान ला त्यांची विशेष भेट असते*.
मा बाजीराव पाटील यांच्या सहकार्याने व मा सर्जेराव दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान होणार आहे.
त्याचबरोबर सरपंच मनिषा वाघ मॅडम , उपसरपंच शिवाजी पाटील, यात्रा कमिटी अध्यक्ष ए वाय पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मा आबाजी पाटील, ऑल इंडिया चॅम्पियन पै रंगराव पाटील, महाराष्ट्र पोलीस पै सचिन पाटील, ग्रा पं सदस्य, लोकसेवा सोसायटी चे चेअरमन, संचालक मुंबई कर आणि त्यांच्या वाडीवस्ती वरील सर्व ग्रामस्थांनी हे मैदान गेली अनेक दिवस राबुन आयोजित केले आहे.
हे मैदान यशस्वी पार पाडण्यासाठी पेरीड या गावाने कंबर कसली आहे. आणि लाखोंच्या संख्येने या मैदान साठी उपस्थित राहण्याचे आवाहन मा सर्जेराव पाटील पेरीडकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने केले आहे.
🎥 सदर मैदान *कुस्ती हेच जीवन* या अधिकृत युट्युब चॅनेल वर थेट प्रक्षेपण *(लाईव्ह)* होणार आहे
*नियोजित कुस्त्या खालील प्रमाणे*
1️⃣ *पै आशिष हुड्डा* राष्ट्रीय विजेता छत्रसाल आखाडा दिल्ली ❌ *पै महेंद्र गायकवाड* राष्ट्रीय विजेता, काका पवार तालीम पुणे
2️⃣ *पै रोहित खत्री* राष्ट्रीय पदक विजेता दिल्ली ❌ *पै भैरु माने* गंगावेश तालीम कोल्हापूर
3️⃣ *पै अक्षय मदने* धुमछडी पंजाब ❌ *पै अरुण बोंगार्डे* मोतीबाग तालीम कोल्हापूर
4️⃣ *पै कर्तार कांबळे* पेरीड ❌ *पै अतुल हिरवे* कुंभी कासारी
5️⃣ *पै नितिन माने* वाकुर्डे ❌ *पै सचिन महागावकर* पेरीड
कुस्ती निवेदक
*पै सुरेश जाधव सर* चिंचोली
हलगी- सुनिल नागरपोळे, कागल
मैदान संयोजन
पेरीड ग्रामस्थ, पुणे आणि मुंबईकर मंडळी
--------------------------
धन्यवाद
*पै अशोक सावंत पाटील*
कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य
शाहूवाडी तालुका अध्यक्ष
9702984006
Comments
Post a Comment