पैलवान अशोक सावंत - पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्ती मैदान*

*पैलवान अशोक सावंत - पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्ती मैदान*
*****************
कुस्ती हेच जीवन महासंघाच्या मार्गदर्शनाखाली आणि *सोंडोली गावच्या सहकार्याने* सोंडोली ता शाहूवाडी येथे सोमवार दि २ मे २०२२ रोजी दुपारी तीन वाजता *कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य शाहूवाडी तालुका अध्यक्ष पै अशोक सावंत-पाटील* यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. 
............... 
✍️पै मनोज मस्के पत्रकार 

*पैलवान अशोकभाऊ सावंत( पाटील)* सोंडोलीकर लाल मातीचा सच्चा ऊपासक....... *वाढदिवसानिमीत्त घेतले कुस्ती मैदान*

     आजच्या काळात कुस्ती क्षेत्रातील बरीच मंडळी अशी आहे जी कुस्ती निवृत्तीनंतर कुस्ती क्षेत्राशी काहीही संबंध ठेवत नाही. नोकरी ,ऊद्योग, लहान मोठे व्यवसाय ,शेती, प्रपंच,पैसा, राजकारण ,समाजकारण ,अशा विविध क्षेत्रात सक्रिय होतात.ज्या कुस्तीने आपली समाजात ओळख करून दिली, ज्या लाल मातीने जगवले वाढवले मोठे केले, निरोगी आनी धष्टपुष्ट शरीराची श्रीमंती मिळवून दिली, पैलवान या नावाची चंद्र सुर्य असेपर्यंत राहील अशी बिरुदावली मिळवून दिली, बर्‍याच पैलवानांना जन्माची भाकरी मिळवून दिली ,मान सन्मान मिळवून दिला असे पैलवान सुध्दा कुस्तीशी आपले काही घेणे देणे नाही अशा मनस्थितीत जगतात. परंतु *या वरील सर्व गोष्टीला अपवाद ठरले आहेत ते म्हणजे कुस्ती प्रेमी, कुस्ती संघटक पै अशोकभाऊ सावंत पाटील सोंडोलीकर होय*......... आज स्वतःच्या वाढदिवसानिमित्त जंगी कुस्त्यांचे मैदान त्यांनी आपल्या सोंडोली गावात भरवले आहे. ही छोटी गोष्ट नाही..... यासाठी पैसा नव्हे तर मन मोठं असावं लागतं. अनेक जण कुस्ती केलेल्या पैलवानाला १० -२० रूपये बक्षिसी देत नाहीत... परंतु अशोक सावंत सरांनी कुस्ती मैदान आयोजित करून, दोन वर्ष कोरोणांमध्ये झालेलं पैलवानांचे नुकसान डोळ्यासमोर ठेवून, *आपल्या वाढदिवसाचा खर्च हा कुस्ती मैदान घेऊन करायचा असा ठाम निर्णय घेतला*.
         नाही जमनार असा विचार करत बसण्यापेक्षा करूण बघू म्हणत केलेली सुरवात म्हणजे यशस्वी होण्याचे पहीले पाऊल आहे .आज अशोकभाऊंनी कुस्ती क्षेत्रात यशस्वी पाऊल टाकलेले आहे. दुसर्‍याला नेहमी मान द्यायचा व आपला आपमान सहन करायचा या तत्वाने अशोकभाऊंनी महाराष्ट्राच्या *कुस्ती क्षेत्रात आपले वेगळे व आदराचे स्थान निर्माण केलेले आहे*. कुस्ती क्षेत्रातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लाडके आज्ञाधारक बंधुतुल्य मित्र अशी ईमेज आज अशोकभाऊंनी कार्य कर्तृत्वाच्या जिवावरती केलेली आहे. आज अशा या बहुगुणी बहुआयामी व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस ......हा खऱ्या अर्थाने वाढदिवस नसून अशोकभाऊंनी *कुस्ती क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाचा गौरवसोहळाच आहे*. ऐका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने पोटासाठी मुंबईत हमाली करून आपल्या लेखनीच्या माध्यमातून व दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर केलीली क्रांतीच म्हनावी लागेल. ऐक दर्दी पैलवान ते शेतकरी, *शेतकरी ते माथाडी कामगार व माथाडी कामगार ते कुस्ती क्षेत्रातील जानी मानी हस्ती हा प्रवास थक्क करणारा आहे व ईतर तरूणांना प्रेरणा देणारा आहे*........ पैसा असून चालत नाही तो खर्च करायची दानत लागते.... आणि ते खऱ्या अर्थाने आपल्या गावी सोंडोली येथे आपल्या *वाढदिवसानिमित्त कुस्ती मैदान घेऊन अशोक भाऊनी दाखवले आहे. सलाम या कुस्तीप्रेमी अवलीयाला* .......

*विशेष उपस्थिती व विशेष सन्मान*

राष्ट्रपती पदक मिळाले बद्द्ल पोलीस उपनिरीक्षक, *अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मा डी आर जाधव आण्णा* यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. 

त्याचबरोबर सोंडोली गावातील *सैन्यदलात कार्यरत असणार्‍या जवानांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे*.. 

*नियोजित कुस्त्या खालील प्रमाणे* 

1️⃣ *पै प्रदिप ठाकुर* हांडे पाटील तालीम सांगली ❌ *पै कुमार पाटील* शित्तुर मोतीबाग तालीम कोल्हापूर

2️⃣ *पै अभिजित भोसले* शित्तुर ❌ *पै किरण मोरे* कुंभी कासारी

3️⃣ *पै दत्ता बाणकर* चिंचोली ❌ *पै सयाजी जाधव* कडेगाव

4️⃣ *पै सूरज पाटील* शित्तुर राजाराम बापु कुस्ती केंद्र इस्लामपूर ❌ *पै साईराज पवार* वारणा

5️⃣ *पै प्रथमेश गुरव* वारणा ❌ *पै विक्रम माळी* कडेगाव

⏩ *पै साहिल पाटील* सोंडोली ❌ *पै चेतन काळे* पुनवत 

यासह अनेक काटा कुस्तीचा थरार आपल्याला पहायला मिळेल

सदर मैदान *कुस्ती हेच जीवन* च्या अधिकृत युट्युब चॅनेल वर थेट प्रक्षेपित *(LIVE)* होणार आहे 

🎤कुस्ती निवेदक 
*पै सुरेश जाधव सर* चिंचोली

हलगी- मारुती मोरे आणि सहकारी कागल

⭕मैदान संयोजन
हनुमान व्यायाम मंडळ, सर्व ग्रामस्थ, पुणे आणि मुंबईकर मंडळ सोंडोली ता शाहूवाडी जि कोल्हापूर
~~~~~~~~~~~~~
*पै मनोज मस्के* पत्रकार
कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य, 
अध्यक्ष शिराळा तालुका

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*