आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राची कुस्ती तुम्हीच वाचू शकता

*आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राची कुस्ती तुम्हीच वाचू शकता*....

*महाराष्ट्राची कुस्ती देशात नेतृत्व करणारी हवी अशी योजना करावी.*
-----------------------
✍️ *मनोजकुमार मस्के* - पत्रकार 


  नमस्कार खरंच कुस्ती सुधारली का हे माझं आर्टिकल गेल्यावर्षी मी लिहिलं होतं. त्यामध्ये मी म्हणालो होतो की मुलांनी मैदाना पेक्षा स्पर्धा खेळणं खूप गरजेचं आहे. आणि ते खरेही आहे. खरं पाहिलं तर कुस्ती खेळणारे हे अनेक देश आहेत, त्यात महाराष्ट्रात कुस्तीचे बऱ्यापैकी आखाडे भरले जातात. *आज विचार केला तर १६ देश क्रिकेट खेळतात आणि 200 देश कुस्ती खेळतात. तरीसुद्धा भारतात कुस्ती पेक्षा क्रिकेटला जास्त पसंती दिली जाते*.
 पूर्वी कुस्तीला मान होता. शिवाय महाराष्ट्रातील मल्लांना देशात विदेशात मान  होता. *ज्या ज्या वेळी दिल्लीवरून पैलवान कुस्तीसाठी महाराष्ट्रात आला त्या- त्या वेळी महाराष्ट्रात मात्र चारी मुंड्या चीत होत होता*, हे कुण्या ज्योतिषाने सांगायची गरज नाही. महाराष्ट्राच्या मल्लांनी देशात नव्हे तर विदेशात सुद्धा कुस्ती मध्ये चांगलं नाव केलेलं होतं. महाराष्ट्राच्या पैलवानाची भीती दिल्ली हरियाणा पर्यंत होती. परंतु आज या महाराष्ट्राची कुस्ती कुठेही दिसेनाशी झाली.  या महाराष्ट्रात अनेक कुस्ती संघटना आहेत. अनेक कुस्ती प्रसारक आहेत, अनेकांचे फेसबुक अकाउंट आहे, अनेकांची युट्युब अकाउंट आहे, या माध्यमातून लाखो रुपये कमवत आहेत, पण या सगळ्यांचा परिणाम कुस्ती सुधरते असं तुम्हाला वाटतं का? या वर्षी झालेल्या ऑलम्पिक सारख्या खेळात महाराष्ट्रातले वेगवेगळ्या खेळातील आठ खेळाडूंची निवड झाली. त्यामध्ये कुठेही कुस्तीचा समावेश नाही. म्हणजेच महाराष्ट्रातील कुस्ती संपली की काय असं वाटायला लागलं!  १)राही जीवन सर्नोबत- कोल्हापूर ( शुटिंग मध्ये), २) तेजस्विनी सावंत -कोल्हापूर (शूटिंग 50 मीटर थ्री रायफल), ३) अविनाश साबळे- बीड (ॲथलेटिक्स 3000 मीटर),  ४) प्रवीण जाधव- सातारा (तिरंदाजी चिराग), ५) चंद्रशेखर शेट्टी- मुंबई (बॅडमिंटन),  ६) विष्णू सरवानन - मुंबई (रोलिंग), ७) स्वरूप महावीर उन्हाळकर - कोल्हापूर (पॅरा शूटिंग, 100 मीटर रायफल), ८) सुयश नारायण जाधव- सोलापूर (पेरा स्विमर 50 मीटर, बटरफ्लाय 200 मीटर). या मुलांनी ऑलम्पिक मध्ये आपल्या नावाचा डंका वाजवून महाराष्ट्राची मान उंचावली. परंतु जास्तीत जास्त लोकप्रिय असणारी कुस्ती यामध्ये कुठेही दिसली नाही. *कारण आमची कुस्ती ही महाराष्ट्र केसरी च्या बाहेर जायला मागत नाही. महाराष्ट्र केसरी हेच एकमेव ध्येय..  ?* कारण आमच्याकडील पैलवानांचं एकच स्वप्न महाराष्ट्र केसरी होणे आणि कुस्ती मैदानावर बक्कळ पैसा कमवणे. त्यांचं तरी काय चुकते म्हणा कारण देशासाठी मिडल मिळवणं किती मोठे काम असतं हे त्यांना कधी कुणी दाखवलंच नाही.   यामुळे कुस्ती पाठीमागे राहिली की काय असा सवाल कुस्तीप्रेमीतून होत आहे. कुठेतरी मनाला भास होतोय की काय! पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा पैलवान प्रसिद्धीच्या मागे धावताना पाहायला मिळतोय हे मात्र तितकसं खरं आहे.  मैदानात एकादी कुस्ती झाली रे झाली कि त्या कुस्तीचा इतका गाजावाजा करायचा, यूट्यूबला, फेसबुकला सगळ्यांना दाखवायची यात महाराष्ट्राचा पैलवान अग्रेसर असल्याचं वारंवार जाणवले आहे. महाराष्ट्रात दोन गदा, तीन गदा आणणारे महाराष्ट्र केसरी भरपूर आहेत. परंतु महाराष्ट्राच्या बाहेर जाताना *एकही पैलवान दिसत नाही यांच कारण आजुन महाराष्ट्राला उमगलं नाही*. महाराष्ट्राची कुस्ती ही फक्त मैदाना पुरतीच राहिली का? मैदानाच्या बाहेर का जात नाही याचा  विचार कुस्तीगीर परिषदेने  करणे गरजेचे आहे. 
         महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही जितकी ओपन गटासाठी महत्त्वाची आहे तितकीच खालील ईतर गटासाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. एकदा महाराष्ट्र केसरी झालेला पैलवान परत महाराष्ट्र केसरी साठी खेळणं त्यापेक्षा त्या पैलवाने पुढे काय करणं जास्त महत्त्वाचा विषय आहे. *खरं तर इतर राज्यात खेळाडूंने एकदा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मिडल घेतले की लगेच सरकारी सेवेत रुजू केले जाते*. परंतु आमचा महाराष्ट्र फक्त न फक्त लढवतो आणि बघत बसतो. या नादात कुस्तीचं वाटोळं होतंय हे जरा ध्यानात घ्या आणि चार पोरं किमान महाराष्ट्राच्या बाहेर तरी खेळू द्या. कारण आज या महाराष्ट्राच्या मातीतून कुस्तीला सुरुवात झाली ही गोष्ट जरी खरी असली तरी ज्या ज्या वेळेला महाराष्ट्राच्या बाहेरील मोठा पैलवान आला त्या त्या वेळेला या महाराष्ट्राच्या मातीने चारीमुंड्या चीत केला. परंतु आज याच महाराष्ट्रातल्या कुस्तीला पैसे या नावाची कीड लागलेली आहे‌. आणि खेळाच्या नावं बोंबाबोंब झाली आहे.  परंतु आज वस्तुस्थिती मांडली नाही तर पुन्हा कधीही कुस्ती जिवंत राहणार नाही. कुस्तीला जिवंत ठेवायची असेल तर मित्रांनो हे बाकीचे धंदे बंद करा! पैलवानांना खेळुदे, *पोरांना प्रोस्थान द्या, गरज आहे तिथे उभे रहा तो कसा खेळतोय त्याच्यापेक्षा तो कुठे पोहोचला आहे हे पहा*. आज महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रातल्या पैलवानांची जी हालत होते याला कारणीभूत महाराष्ट्रातले राजकारणी आहे.
   महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कुस्तीचे आखाडे असतील परंतु ऑलम्पिक पर्यंत जाणारे किती आहेत. *खाशाबा जाधव, बंडा मामा रेठरेकर, गणपतराव आंदळकर आबा, मारुती माने भाऊ हे ज्या वेळेला खेळले त्या वेळेला महाराष्ट्रात इतक्या तालमी नव्हत्या*.... आणि ज्या काही तालमी होत्या त्या नावासाठी काम करत होत्या कमाई साठी नव्हे. आता प्रत्येक तालीम कमवण्याचा आड्डा झालाय. आणि ज्या काही तालमी आहेत त्यांना वाली राहिला नाही. त्यात काही तालमी आहेत  त्यांना *अंतर्गत राजकारणाला सामोरे जावे लागते आहे. अशा परिस्थितीतून महाराष्ट्राची कुस्ती चाललेली आहे*. खऱ्या अर्थानं हे थांबने कुठेतरी गरजेच आहे. एक-एक प्लेअर जीव तोडून मन लावून घडवणे गरजेचे आहे. कितीही मोठे राजकारण पुढे असले तरी आमचा खेळ त्याला उत्तर देऊ  शकतो. आज महाराष्ट्राची कुस्ती ही संपूर्ण जगात प्रसिद्ध असताना ज्या खेळाची कुठेही प्रसिद्धी नाही संघटन नाही प्रसारमाध्यम नाही अशा खेळातील मुलं कोल्हापूर सातारा, बीड सोलापूर या ठिकाणावरून महाराष्ट्राचं नाव ऑलम्पिक पर्यंत पोहोचवतात त्या वेळेला वाटतं कुस्तीला प्रसिद्धी देऊन आपण काहीतरी चूक तर करत नाही ना? *आणि जर ते आपण करत असेल तर ती ताबडतोब थांबविनेही गरजेचे आहे*. मित्रांनो आज गावोगावी तालमी आहेत तालुका जिल्हा राज्यात जवळपास शाळा नसतील एवढे आखाडे आहेत. तरीही महाराष्ट्राची कुस्ती महाराष्ट्राच्या पुढे जाताना दिसत नाही. आम्ही इथेच डबल महाराष्ट्र केसरी,ट्रिपल महाराष्ट्र केसरी  म्हणून मिरवत राहिलो, *आणि खरी स्पर्धा कधी खेळलोच नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्राच्या कुस्तीची झाली आहे*. आमच्या पैलवानाच्या बापाचं स्वप्न पोरगं महाराष्ट्र केसरी बनवायचं ईथपर्यंतच राहील या महाराष्ट्र केसरी च्या बाहेर कधी गेलोच नाही.  याला कारणीभूत कुस्ती परिषद सह सर्व संघटना कुस्तीसाठी काम करणारे प्रसारमाध्यम यांनी तर फक्त दुकानदारी चालवली आहे. कुस्ती काय वडीलोपर्जित चालतच आली परंतु दुकानदारी मुळे ती महाराष्ट्रातच रुजली महाराष्ट्राच्या बाहेर जाणं तिला जमलच नाही. *हा चक्रव्युह तोडून एक पैलवान गेला त्याचं नाव राहुल आवारे (नाना)*.. महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय डावपेच यांना बगल देत महाराष्ट्राची मान उंचावण्याचे काम यांनी केले. परंतु आमच्या नेत्यांना राज्याच्या खेळाडूंकडे बघायला वेळ कुठे आहे. वाईट एवढंच वाटत कि, *आदरणीय शरद पवार साहेबांच्या सारखे खंबीर नेतृत्व कुस्ती परीषदेचे अध्यक्ष असताना महाराष्ट्रातील एकही पैलवान देशपातळीवर चमकताना दिसत नाही*. नुसते अध्यक्ष होऊन फायदा नाही तर *महाराष्ट्राच्या कुस्तीचा डंका जगभर वाजणे गरजेचेच आहे*. महाराष्ट्राच्या मातीतील पैलवान जगाला भारी आहे, साहेब फक्त त्याच्या पाठीवर थाप टाकून लढ म्हणण्याचा अवधी आहे. माझ्या महाराष्ट्रातील खेळाडू पुढे जात नाही यांचं कारण खेळ नव्हे तर खेळातील राजकारण आहे साहेब. नाहीतर आमचा राहुल आवारे आज ऑलंपिकचे सुवर्ण आणण्यास पात्र झाला असता.  *ऑलंपिक मध्ये भारताला पहिले कांस्य हे महाराष्ट्रातील खशाबा जाधव यांनी मिळवून दीले*, आणि त्यानंतर ३४ वर्ष लागली दुसरं पदक मिळवण्यासाठी. पवार साहेब सुवर्ण पदक सुद्धा महाराष्ट्रातीलच पैलवान देणार यासाठी तुम्ही वैयक्तीक क्रिकेट बाजूला सारून कुस्तीकडे लक्ष द्या, आणि ऑलिम्पिकला नेतृत्व करणारे खेळाडू महाराष्ट्रात घडू द्या. *महाराष्ट्राची कुस्ती जाणणारा एकच नेता म्हणून पवार साहेब तुमच्याकडे बघितलं जातं आणि तुम्हीच या कुस्तीला योग्य दिशा देऊ शकता*. 
------------------------
धन्यवाद 
*पै मनोजकुमार मस्के* - पत्रकार
९८९०२९१०६५

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*