शिराळा कोकरूड मार्गावरील पावलेवाडी
मनोजकुमार मस्के - चिखली शिराळा कोकरूड मार्गावरील पावलेवाडी घाटात गेल्या दोन-तीन महिन्यापुर्वी दरड कोसळले असुन अजून पर्यंत ढिगारा हटवला नसल्यामुळे या ठिकाणी एकेरी वाहतूक करावी लागत आहे. चालकांना मोठी वाहने तर मोठ्या कसरतीने चालवावी लागत आहेत. हे करताना वाहनचालकांना घाटातून जीवघेणे कसरत करावी लागत आहे. शिराळा पश्चिम परिसरात नेहमीच जोरदार पाऊस पडत असल्याने पावलेवाडी घाटात मोठ्या मोठ्या दरडी कोसळल्या आहेत. अती पावसामुळे दरवर्षी भूस्खलन व दरड कोसळण्याच्या घटना पावसाळ्यात वारंवार घडत असतात. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही व ठोस उपाययोजना करत नाही. आता तर घाटांमध्ये दरडी चा मोठा भाग रस्त्यावर कोसळला असून मातीचा ढिगारा तसाच पडून असल्यामुळे मोठ्या वाहनांना कसरत करावी लागत आहे. दरड कोसळते वेळी वाहतूक कमी असल्याने कोणतीही हानी झाली नाही. सध्या शिराळा कोकरूड रस्त्याचे काम सुरू आहे पावलेवाडी ते शांतीनगर काम ठेकेदाराकडून संथ गतीने नियोजनशून्य व निकृष्ट दर्जा ने सुरू असल्याचा फटका घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना बसतो आहे. ठेकेद...