*मा.केतन रंगराव पाटील (पेरीडकर) वाढदिवस विशेष लेख*........

*मा.केतन रंगराव पाटील (पेरीडकर) वाढदिवस विशेष लेख*........ 
------------------------------
*लेखन पै अशोक सावंत/ पाटील* सोंडोलीकर.. 
----------------------------------
    शाहुवाडी तालुक्यातील पेरीड गावचे सुपुत्र *मा. केतन पाटील यांचा आज वाढदिवस आहे*... 

     काही माणसं जन्मताच भाग्य घेऊन जन्माला येतात तर काही माणसं स्व कर्तृत्वावर भाग्य निर्माण करतात तर काही माणसे कर्तृत्वाविना दुखापत, दारिद्र्यात मरतात परंतु स्वकर्तृत्वावर आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर भाग्य घडवणारे *साधारण माणसातील असाधारण व्यक्ति मत्व म्हणजे मा केतन पाटील होय* 
    असं म्हणतात की करणी करेगा तो नर का नारायण बन जायेगा हे वाक्य केतन पाटील यांच्या जीवनात तंतोतंत खरे ठरले. अगदी जन्मताच सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले एका प्रतिष्ठित कुटुंबात जन्माला आलेले *लहानपणापासून आई, वडीलांचे लाडके केतन पाटील*.......... 
त्यावेळी काहीही मागावे आणि ते कुटुंबाने ध्यावे काहिच केले नसते तरी आहे ते आयुष्य भर संपले नसते अशा वातावरणात केतन पाटील यांचा जन्म झाला. लहानपणापासून फार मोठा मित्र परिवार आणि फार मोठा नात्यागोत्यांचा जिव्हाळा, *आई वडिलांनी केलेले संस्कार आणि आदर्श*..... 
  केतन पाटील यांचे वडील रंगराव पाटील यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर ते मुंबई मध्ये ठाणे या ठिकाणी *ठाणे महानगरपालिकेचे पैलवान होते, तसेच ते ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कुस्ती कोच तसेच मार्गदर्शक होते किंबहुना आहेत*. त्यामुळे त्यांना वाटायचे की आपला मुलगा सुद्धा पैलवानच व्हायला पाहिजे, साहाजिकच आहे की एका पैलवान बापाला आपला मुलगा पैलवान व्हावा असंच वाटणार... त्याप्रमाणे त्यांचा कुस्तीचा सराव घ्यायला त्यांनी सुरूवात केली.रोज नित्यनेमाने रंगराव पाटील त्यांचा सराव घेऊ लागले. चांगले वजन, चांगली तब्येत सुद्धा झाली आणि ठाणे जिल्हा संघातुन महाराष्ट्राच्या अधिवेशनात ते सहभागी झाले.. 
  शिक्षण आणि कुस्ती सरावाचा काही मेळ बसेना, त्यानंतर त्यांनी कुस्ती थांबवली. शिक्षणावर भर देण्याचे ठरवले. मुंबई मध्ये उच्च शिक्षण पूर्ण करुन सिव्हिल इंजिनियर झाले. गावाकडे *इस्लामपुर येथे आय आय टी कॉलेज मध्ये कंन्ट्रक्शन मॅनेजमेंट या विषयाची 'एम टेक' ही पदवी मिळवली*. शैक्षणिक क्षेत्रात त्यांना त्यांच्या आईची मोठी साथ मिळाली, आईची म्हणजे *सौ वर्षा रंगराव पाटील आणि के डी सी चे संचालक मा सर्जेराव दादा* यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे शैक्षणिक क्षेत्रातील मोठे यश मिळवले. 
 त्यांच्या आईसाहेब *सौ वर्षा रंगराव पाटील ह्या गुरुकुल अकॅडमी च्या तत्कालीन संचालिका होत्या*. 
   एम टेक ही पदवी प्राप्त झाल्यानंतर मलकापूर ता शाहुवाडी याठिकाणी ते *दिसान इन्फ्रास्ट्रक्चर* या कंपनीचे  संचालक आहेत. या कंपनीच्या माध्यमातून *जि प सदस्य मा सर्जेराव दादा आणि मा संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गरजु युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे एक मोठे काम करत आहेत*. हे सर्व करत असताना केतन पाटील यांची शिक्षणावरची श्रद्धा, 
 जिद्द, मेहनत, चिकाटी ही खरंच खुप मोठी आहे. 
 खरोखरच आभाळाला हात टेकले तरी पाय जमिनीवर असणारी ही व्यक्ती अगदी प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर , प्रसिद्धी च्या शिखरावर पोहचुन सुद्धा साधी राहणीमानी आणि उच्च विचारसरणी असणारे हे व्यक्ती मत्व खरोखरच कार्यकर्तृत्व संपन्न आहे असं मला याठिकाणी म्हणावे लागेल.  
    लहानपणापासून लाभलेली अलौकिक बुद्धिमत्ता, दुर्दम्य इच्छाशक्ती, मोठा आशावाद, त्याग करण्याची वृत्ती, कष्ट करण्याची प्रचंड ताकत, शिक्षणावरची श्रद्धा या जोरावरती आज *केतन पाटील यांनी आपल्याला सिद्ध केले आहे*. 
   केतन पाटील हे आता मलकापूर चे माजी नगराध्यक्ष, नगरसेवक दिसान इन्फ्रास्ट्रक्चर चे मुख्य प्रवर्तक आदरणीय दिलीप पाटील यांच्या सोबत दिसान इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीत ते काम करत आहेत. ही कंपनी आता *उत्तुंग भरारी घेत आहे आणि तालुक्यात आदर्शवत ठरते आहे*. 
अशा या बहुगुणी, बहुआयामी, अभ्यासु व्यक्ति मत्वाचा आज वाढदिवस त्यांना *कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य कडून जन्म दिनाच्या लाख लाख शुभेच्छा*..... 
-----------------------------
धन्यवाद
*पै अशोक सावंत/पाटील*  कुस्ती संघटक
*कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य*
अध्यक्ष शाहुवाडी तालुका
मो. 9702984006

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*